नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 29 July 2010

बाहुल्या

कार्यालयाच्या अत्याधुनिक परिसरात शिरलं की सभोवताली बाहुल्या दिसू लागतात. त्या जगाला ना चेहरा. ना रंग. तेथील इमारत आजुबाजूच्या हालचालींबद्दल बेदरकार. तिथल्या मेणाच्या बाहुल्या स्वतःभोवती अभेद्य वलय घेऊन वावरणाऱ्या. Hi , hellooo म्हणतील. मिठ्या मारतील...वलयाला सुईएव्हढ देखिल छिद्र पडणार नाही.

ह्या अश्या वेगळ्या कॉर्पोरेट विश्वातील, निळ्या गणवेषातील बाहुल्या. पुरुष बाहुल्या. असंख्य बाहुल्या. दिसतात कचरा काढताना. एखादी लहानशी फरशी आणि त्यावरचे कोणाचे लाल ओंगळवाणे नक्षीकाम पुसताना.
इथला दिवस एखाद्या अनोळखी ग्रहावरच्या अनोळखी वेगाने फिरतो.
इथे swipe कार्डाला ओळखतात. प्रत्येकाला एक कार्ड. गाडीला वेगळं कार्ड.
गाडी तळघरात लावायची असेल तर ओळखपत्र दाखवा. वेस उघडण्यात येईल.
स्वागताला एक निळी बाहुली. नावगाव नसलेली.
आज अश्याच एका निळ्या बाहुलीशी नजरभेट झाली.
मी हसले.
बाहुली चमकली.
तिच्या हालचाली बदलल्या.
रोज तिच्या समोर गाड्या येतात. गाड्यांत बसून मेणाच्या बाहुल्या येतात. आज तिच्या विश्वातील बाहुल्यांचं जग हललं.
संख्यातील एक मेणाची बाहुली हसली.
समोरचा माणूस आहे हे त्या एका नजरानजरेतून कळलं.

तळघराकडे जाणारं रोजचं काळोखं बोळ, आज थोडं उजळलं.

10 comments:

rajiv said...

अनघा, तुझी काकदृष्टी खूप तीक्ष्ण आहे ग ! सभोवतालचे बारकावे टिपायची कला, विलक्षण आहे!
प्रत्येकात एक माणूस दडलेला असतोच, त्याला जागे करायची क्लुप्ती आपल्याजवळ हवी !
आणि तुझ्या प्रत्येक लिखाणातून तू आमच्यातल्या माणूस पणाच्या जाणीवांना एकेक पैलू पाडत असतेस
व त्यांना सजीव करत्येयस........ ! ज्योतीने ज्योत लावायचा प्रयत्न आम्ही नक्की करू !

Raindrop said...

ur one smile can light up someones whole day...so true :)

i realised this when I used to call the 3rd floor security guys by their names in stead of screaming 'security...ac on karo' etc. people desrve to be treated like people.

Raindrop said...

ur one smile can light up someones whole day...so true :)

i realised this when I used to call the 3rd floor security guys by their names in stead of screaming 'security...ac on karo' etc. people desrve to be treated like people.

Anagha said...

Hey Vandu!!
I know this! I know you knew all of them by name! Am so proud of you!!

Gouri said...

ऑफिसमध्ये २ मिटिंग्जमधल्या पाच मिनिटात वाचते आहे हे, तरीही प्रतिक्रिया दिल्यावाचून राहावलं नाही. मलाही अश्या बाहुल्या भेटतात रोज. सगळ्या गोतावळ्यात फक्त एकच सिक्युरिटी गार्ड हसून ‘गुड मॉर्निंग मॅम’ म्हणतो आल्यावर - गाडीच्या आत कुणा हाडामासाचं आहे याची तेवढीच नोंद. रोज ऑफिसला पोहोचताना उगाचच त्याची ड्युटी असावी बाहेरच्या दारावर असं वाटतं!

भानस said...

समोरचा हसत नाही तोवर मी कशाला हसू... यातून जो पहिला बाहेर पडला तो सर्वांचा झाला.

अनघा, बाहुल्यांनाही सजीव व्हावेसे वाटतेच. नेमके टिपलेस अन हातही पुढे केलास. आता ही वाट नक्कीच उजळेल.

Anagha said...

मित्रमैत्रिणींनो, मी रोज लिहिते. तुम्ही रोज वाचता. बऱ्याचदा माझी गाडी रुळावरून घसरते. पण तुमच्या रोजच्या आधाराने ती सावरते.
धन्यवाद. मनःपूर्वक आभार.
:)
अनघा

Anagha said...

गौरी,
वेळात वेळ काढून वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
अशीच डोकावत जा गं अधून मधून...
आणि कुठे तुझ्याबरोबर फेरफटका देखील मारून आणलास तर आनंदच होईल!
:)

Anagha said...

भागुबाई,
खरं तर चेहेऱ्यावर थोडं हसू आणलं तर आपलाच चेहेरा जरा तरी पहाण्यालायक होतो नाही का?
:) (म्हणून हे हसू!)

Anagha said...

राजू,
माझ्या लिखाणाला असं एकदम दिशादर्शक केलंस कि मला घाबरून जायला होता हं!
मी आपली आहे तशीच बरी आहे!!
इतकी मोठी झाले तरीही चुका करत करत शिकणारी!
:)