नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 6 March 2011

मूळव्याध

"I'll tell you!"
"What?"
"त्याचं काय आहे माहितेय का आई तुला?"
"कसलं काय आहे...?"
"म्हणजे मुली सुधारल्यात...शिकल्या...पैसे वगैरे कमवायला लागल्या...सगळं झालं!"
"मग? बिनसलं कुठे?!"
"अगं, पण ज्या वेगात मुली सुधारल्या ना...? त्या वेगात मुलं नाही ना सुधारली!"
"म्हणजे?"
"अगं, मी बघते ना...माझ्या मैत्रिणी, त्यांचे बॉयफ्रेण्डस...आणि त्यांची भांडणं! म्हणजे त्यांच्या भांडणांचे विषय!"
"अं?"
"अगं, अजूनही ना आई, ह्या मुलांना ना आपली बायको तशीच हवीशी असते! म्हणजे तिने करावी काय ती करियर बिरीयर! पण बाकी सर्वच बाबतीत तिचे विचार घरगुतीच हवेत!"
"अगं! नाही गं! सुधारलेत गं ते!"
"मुली ज्या वेगात आई त्यांच्या विचारात mature झाल्यात ना तेव्हढी ही मुलं नाही झालेली! त्यामुळे फक्त भांडणं वाढलीयत! आणि divorce वाढलेयत!"
"ह्म्म्म! हे तर आमच्या पिढीचं जुनं रडगाणं!"
"अहं! काहीही बदललेलं नाहीये! अजूनही परिस्थिती जैसे थेच आहे! आणि ह्यांना सुधारायला अजून चार पिढ्या जाणार आहेत! They are slow learners!"
"पण ह्याचा अर्थ, आमच्या पिढीने आपल्या मुली त्यांच्या पायावर उभ्या तर केल्या, पण त्याचवेळी ह्या स्वावलंबी मुलींसाठी आपल्या मुलांची मानसिकता तयार नाही केली! असाच नाही का अर्थ होत?"
"Of course! You guys need to be blamed!"

टॅक!! आसूड आसूड!

"काय? गप्प काय बसलीस?"
"मग माझे आई, आपण आशा करू की तुझे दोन छोटे मावसभाऊ मोठे होऊन सुधारलेले असतील!"
"काय माहित?! हे तरी कसे होणार आहेत कोण जाणे!"
"अगं तू नको काळजी करू! ते बघतायत ना त्यांची ताई करियर करताना!"
"I hope so! I hope त्यांच्या डोक्यात शिरेल तोपर्यंत!"
"हम्म्म्म"

तर मंडळी, काय म्हणणं आहे? तक्रार तर अजूनही मूळ धरूनच आहे की!
भारतीय तरुणांविषयी असलेली ही भारतीय तरुणींची प्राचीन तक्रार म्हणजे जुनी मूळव्याध आहे की काय?

तुमच्या मते कुठे बसतात आपली तरुण पुरुष मंडळी? सुधारित? पुरोगामी? की.....
:)

36 comments:

सौरभ said...

व्यक्ती तितक्या प्रकृती...

Anagha said...

काय झालं सौरभ बुवा, गंभीर झालात?! :)

Gouri said...

न सुधारणं सोयीचं आहे ग त्यांना ;)

Anagha said...

हो गं गौरी! एकदम खरं! उगाच सुधारा आणि पायावर धोंडा कशाला पाडून घ्या! हो ना?! :D

Shriraj said...

ताई, तुझी मुलगी म्हणते ते बर्याच अंशी खरं आहे ; पण शेवटच्या प्रश्नाचे उत्तर देणे खूप कठीण आहे. सरसकट सर्व तरुण सुधारित म्हणणे चुकीचे ठरेल :P

हेरंब said...

मी कुठल्याही प्रकारच्या *जनरलायझेशन* च्या तीव्र विरुद्ध आहे. !!!

भानस said...

उगा काय चे काय अपेक्षा करायच्या म्हणजे... :D :D :D

बाकी, सरसकट हे सगळ्यांना लागू करता येणार नाहीच...

Anagha said...

:) हेरंब, निषेध निषेध आहे का हा? अरे, तुझं म्हणणं खरं आहे. परंतु, ही सुधारणा आणि समन्वय हे गरजेचे आहे. बदललेल्या गरजा ह्या समोरच्या व्यक्तीने (स्त्री/पुरुष) लक्षात घेणे जरुरीचे आहे..असे वाटते.
लेकीचा सध्या ह्या विषयावर अभ्यास चालू आहे बहुतेक! चांगलं आहे ना...डोळे उघडे ठेवून निवड केलेली? :)

Anagha said...

भाग्यश्री, मला आपलं वाटतं की इथे मुलांना त्यांची वर्षानुवर्षांची रुतलेली मानसिकता बदलावी लागते, आणि मुलींना आपल्या वाढत्या जबाबदारीतील समतोल सांभाळावा लागतो.
ह्याचा अर्थ, परिस्थितीच्या गरजेनुसार बदल दोघांनाही करावा लागतो.
:)

Anagha said...

श्रीराज, बरोबर. :)

rajiv said...

कुंपणावर बसलेले असताना `सुधारित', कुंपणाबाहेर असताना `पुरोगामी' व कुंपणाच्या आंत असताना `प्रतिगामी' !! :)

Anagha said...

राजीव, कठीणच म्हणायचे की मग! 'ना घर का ना घाट का!' :p

BinaryBandya™ said...

उगाच सुधारा आणि पायावर धोंडा कशाला पाडून घ्या!!!
असाच विचार करत असतील :D

तरीही निम्मे अर्धे तरी सुधारलेत असे वाटतंय मला ..

Raindrop said...

sometimes women grow up faster...says who???? Hubby's got soooo many grey hai and me have none he he he :)

shweta pawar said...

हाय अनघा,
मी तुझ्या मुलीच्या मताशी पूर्ण सहमत आहे.
मी स्वतः ते अनुभवतेय...
मला अस वाटत १०० पैकी ९० जनी हे अनुभवत असतील....

Anagha said...

'जावे त्याच्या वंशा,...!' हो ना गं श्वेता?! :)

shweta pawar said...

अगदी खर
आपल्याला स्वतःला कळत नाही कि आपण कधी बदलत जातो ते..

shweta pawar said...

हल्ली ऑफिसला आल्या आल्या तुझा ब्लॉग वाचायची सवय लागलीय...
खर सांगू तर तुझे ब्लॉग वाचूनच आता मला सुद्धा लिहावस वाटतंय...
लवकरच माझा सुद्धा ब्लॉग सुरु करीन

Anagha said...

श्वेता, लवकर सुरु कर! आणि मला पाठवून दे लिंक! :)

Anagha said...

:) बंड्या, बाजू घेतोयस वाटतं तमाम पुरुषवर्गाची? ;)

Anagha said...

ह्म्म्म...वंदू, हे मात्र एक बरंच झालंय! पण पार्था लवकर मोठा होतोय का?! ;)

इंद्रधनु said...

तुमच्या मुलीचं म्हणणं अतिशय पटलं.... काही मुलं सुधारली असतीलही.... पण पाहण्यात तरी नाही आली.... ;)

Yogesh said...

अनघा ताई...प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात..सरसकट सर्वांना एका चष्म्यातुन पाहण चुकीच आहे अस मला वाटतय...पुर्वीची अन आत्ताची परिस्थिती यामध्ये फ़रक पडत आहे....हे सगळ Mutual Understanding चा पार्ट आहे.

Anagha said...

योगेश, खरं आहे....एका चष्म्यातून बघणे चुकीचेच...परंतु, निदान ४०% मुलींच्या नजरेतून चित्र बदललेलं दिसलं असतं तर किती बरं वाटलं असतं... :)

THEPROPHET said...

अरारा... आलं का आमच्यावर! ;)

Anagha said...

हेहे! तुमच्यावरच येणार बुवा! परीक्षेला तुम्हीं देखील बसणार आहात ना?! ;)

Anagha said...

इथे सगळे माझे मित्र 'डिफेन्स मोड' मध्ये का बरं गेलेत?! :p

हेरंब said...

>> :) हेरंब, निषेध निषेध आहे का हा?

नाही निषेध असं नाही पण.... तू शेवटच्या वाक्यात प्रश्न विचारला आहेस त्याचं उत्तर देत होतो मी. थोडं सविस्तर लिहून (माझ्या प्रतिक्रियेबद्दल. तुझ्या लेखाबद्दल नाही) एक पोस्ट टाकतो ब्लॉगवर लवकरच.

BinaryBandya™ said...

पुरुषवर्गाची बाजू कोणीतरी मांडलीच पाहिजे ना :)
आमच्यासारखे खंदे वीर अजून लढत आहेत

देवदत्त said...

शितावरून भाताची परीक्षा हा नियम सगळीकडेच नाही लागू होत :)

Anagha said...

ह्म्म्म...देवदत्तजी खरं आहे तुमचं....
एक तर लेक अजून लहान आहे...आणि बघायला गेलं तर जास्ती करून स्त्री वर्ग सहमत झाला आहे तिच्या मताशी! :)

Unsui said...

सर्व देशांमध्ये, समाजांमध्ये सर्व प्रकुतीची लोकं असतात, सगळ्यांना एकाच फुटपट्टीने मोजणे अन्यायकारक नाही का.
शिकणे सवरणे, नोकरी करून स्वत:च्या पायावर उभे राहणे म्हणजे प्रगल्भ होणे नव्हे. स्त्रिया प्रगल्भ झाल्यात म्हणजे नेमक्या कोणत्या बाबतीत. "मी, माझ, माझी सोय, माझी गैरसोय " हा विचार तर "तथाकथित पुरुषप्रधान" समाजात पुरुष सुद्धा करत होते. प्रगल्भ होणे म्हणजे आजवर पुरुष ज्याप्रमाणे "स्वयं केंद्रित" विचार करत होते, तसाच विचार आता शिकल्या सवरलेल्या स्त्रिया करतात तर त्यांच्या विचारांना त्यांच्या जोडीदाराने, मित्राने पाठींबा देणे म्हणजे त्यांच्या जोडीदाराची प्रगल्भता का?
इथे योग्य शब्द ठरेल "समंजसपणा"... आणि समंजसपणा हि देखील कोणत्या जाती धर्म राष्ट्र, लिंग ह्यांची मिरासदारी आहे का? समंजस पणा, प्रगल्भता, संवेदनशिलता काही लोकांना उपजत असतात, काही लोकांना आयुष्यभराच्या अनुभवाची शिदोरी गाठीला बांधल्यानंतर देखील येत नाही.
स्वामी विवेकानंदानी एके ठिकाणी म्हटले आहे "अनुभव हा जर खरच ज्ञानीपणाचा आरसा असेल, तर खिरीतल्या चमच्याला खिरीच्या चवी बद्दल सगळ्यात जास्त समजले असते" .
तद्वत आई-वडील मुलांवर "आपल्या वागण्यातून" संस्कार करू शकतात इतकेच, त्यातून ज्याच्यात जितकी पात्रता असेल तितके तो घेईल मग त्यात त्याच्या मुलगी वा मुलगा असल्याने काही फरक पडत नाही.
आपल्या उदाहरणातील मुलीने जसे सर्वत्र मुलांबाबतीत एकच निरीक्षण नोंदवले त्याप्रमाणे एखादा मुलगा देखील भरपूर उदाहरणे देऊन मुली कश्या स्वार्थी, आपल्या पुरता विचार करणाऱ्या, चांगली जीवन शैली, छानछोकी, फ्याशन, टीव्ही मालिका, पार्ट्या आदीच्या आहारी गेलेल्या आहेत असे निरीक्षण नोंदवेल आणि त्यावरून समस्त मुली ह्या अश्याच आहेत, शिक्षण आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणाऱ्या आहेत असा निष्कर्ष नोंदवू लागला तर ते योग्य ठरेल का?

Anagha said...

उन्सुल, तुमचे म्हणणे अगदी बरोबर. ह्यातील मुलीने तिच्या अनुभवातून जे विचार मांडले आहेत त्याला ते तसे पुष्टीकारकच ठरू शकतात. कारण...ती ज्या असमतोलतेबाबत बोलत आहे, त्याच एका गंभीर विषयाविषयी, त्यातील असमतोल समजून घेऊन आपण बोलत आहात.

आता आपल्या देशातील मुली शिक्षण घेऊन अधिकाधिक क्षेत्रात पुढे आल्या आहेत व येत आहेत. परंतु, काही दशके पूर्वीपर्यंत ही परिस्थिती अजिबात नव्हती. मुलींना शिक्षणासाठी मुळात परवानगी नव्हती. व त्यामुळे ह्या आपल्या पुरुषप्रधान देशातील पुरुषांवर, कळत वा नकळत ह्याचा पगडा आहेच. व त्यामुळे 'माझी पत्नी वा माझी गर्लफ्रेंड ही खूप शिकली आहे, कमावती आहे, ही जरी अभिमानाची गोष्ट वरवर मुलांना वाटत असली तरी देखील मग त्याचबरोबर आता जर आपण सर्व जबाबदाऱ्या वाटून घेतल्या नाहीत तर आपल्यात वादविवाद होतील, सुसंवाद होणार नाही..हे समजून घेण्याच्या 'टक्के'वारीत बऱ्याचदा ते कमी पडतात. वर्षानुवर्षे जी मानसिकता घडून गेली आहे, ती बदलण्यासाठी मुलांना परिश्रम करावे लागत आहेत व त्यामुळे जोडप्यांमध्ये असंतुष्टता निर्माण होत जाते. 'मुलींची आता बदललेली समज व मुलांची कित्येक शतके जुनी अशी मानसिकता' ह्यात असमतोल आढळतो. मग वादविवाद वाढतो, 'ब्रेकअप्स' वाढतात, घटस्फोट वाढतात.
अर्थात सामंजस्याने रहाणारी जोडपे काही अस्तित्वातच नाहीत असा गैरसमज करून घेणे हे चुकीचेच.

तुम्ही इथे येऊन ही पोस्ट वाचलीत व त्यावर आपले विचार मांडलेत ह्याबद्दल मी आपले आभार मानते.

रोहन... said...

हे जरा गंभीर वळण आहे... :) वर चांगले मुद्दे आलेत... मुली जास्तच चढत आहेत (डोक्यावर नव्हे कारकिर्दीत :D) का ते माहित नाही... पण मुले कमी पडत आहेत हे मात्र अगदी नक्की... :D

Anagha said...

सेनापतींना पटलं ? :p

Shriraj said...

उन्सुईची प्रतिक्रिया वाचून विचारात पडलोय