Monday, 2 August 2010
बाबा
माझे बाबा विश्वास पाटील.
महाराष्ट्रात प्रसिद्ध असे दोन विश्वास पाटील. एक 'पानिपत' कार आणि दुसरे 'नवी क्षितीजे' कार.
'नवी क्षितिजे' हे त्रैमासिक चालवणारे पाटील, माझे बाबा. इतिहास, मानसशास्त्र, कला, धर्म, तत्वज्ञान ह्या विषयांवर ते लिखाण करत असत.
'पद्मगंधा' प्रकाशनाचे श्री. जाखडे ह्यांनी 'कार्ल मार्क्स' ह्या विषयावरील बाबांचे लेख चार दिवसांपूर्वी, एकत्रितरीत्या प्रकाशित केले आहेत. 'कार्ल मार्क्स- व्यक्ती आणि विचार' ह्या पुस्तकाद्वारे.
माझ्या बाबांसारखे बाबा मला मिळाले हे माझं भाग्य.
वर जलरंगातील जे व्यक्तीचित्र आहे ते माझ्या चित्रकार नवऱ्याचे बाबांवर असलेल्या प्रेमाचे आणि आदराचे द्योतक आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
25 comments:
त्यांना व दोघांच्याही कलाकृतीस प्रणाम !
Thanks a lot Anagha :)
पोट्रेट सुंदरच आहे.
तुझ्या प्रकाशकांना ह्या पुस्तकाची online विक्री करण्यात स्वारस्य असेल, तर ग्लोबलमराठी.कॉम ला contact करायला सांग.
am sure both of them are reading this piece by you and saying 'hamari anagha'.....
Tuze BABA ani Tuzya Muliche BABA ya Doghanchya Kartutwala Maze Lakh Lakh Salam.....
अनघे, असे बाबा व नवरा मिळायला भाग्य लागते. आणि ते तुझ्यापाशी आहेत. :)
बाबांचे काही लिखाण मी वाचलेय.( बराच काळ गेलाय वाचून...आता पुढच्या भेटीत आपण भेटलो की उजाळा देईनच )
जलरंग माझे आवडते. अगं, तुझ्या नवर्याने काढलेले बाबांचे चित्र अप्रतिमच उतरलेयं. ही आदरांजली मला खूप भावली.
काय सुरेख चित्र आहे!!! व्वाह... will try to get this book...
मित्रमैत्रिणींनो, तुमचे मनःपूर्वक आभार. :)
सौरभ, बाबांचे पुस्तक दादरच्या आयडियल मध्ये मिळेल असे मला श्री.जाखडे म्हणाले.
सौरभ ने हा ब्लॉग सुचवला!
आता पर्यंतचे सगळे पोस्ट वाचले.
अगदी नेमक्या शब्दात कमाल वर्णन आहेत!
लई वेळा भारी!
आकाश, तुझं माझ्या ब्लॉगवर स्वागत असो. असाच येत रहा. आशा आहे, तुला कंटाळा येणार नाही. :)
त्या दोघानिही कला , विचार यांचा पूरेपूर साठा देवून गेलेत, त्या दोघांनाही प्रणाम, चित्रकार एक चित्रकार होता पण चांगला माणुस होता अणि माज़ा एक ख़ास मित्र......
हे पुस्तक सहज उपलब्ध झालेले आहे का??? वाचेन म्हणतोय...
रोहन, बाबांचं पुस्तक तुला आयडियल मध्ये मिळेल. वाचलंस की सांग. आणि नाही मिळालं आयडियल मध्ये तरी सांग.
:)
अग कसलं अप्रतिम चित्र काढलंय ग !! खुपच सुंदर. इतके दिवस हा फोटो मी तुझ्या ब्लॉगवार बघत होतो पण कधी क्लिक केलं नाही.. म्हणजे तिथे क्लिक केल्यावर एक पोस्ट ओपन होईल हे माझ्या डोक्यातच नव्हतं. आत्ता क्लिक करून बघितलं तेव्हा डोक्यात प्रकाश पडला..
बाकी, तुझ्यातल्या एवढ्या सुंदर लेखनकौशल्याचं रहस्य आज उलगडलं :)
हेहे! हेरंब, मला ना आत्ताच सुचलीय ही आयडीया! म्हणजे बाबांच्या फोटोला लिंक जोडायची! धन्यवाद रे! :)
अप्रतिम दोन्हीही!
आज पॉप्युलर पोस्ट्समध्ये दिसल्यावर मी ह्या पोस्टवर आलो..
आभार विद्याधर. मला हे ब्लॉग मधील नवनवीन प्रकार हल्लीच माहिती होऊ लागलेत!!:)
अनघा, खूपच सुंदर पोस्ट. मी पण त्या फोटोला कधी क्लिक नव्हत केला पण आज त्यावर क्लिक केला तर ही उत्तम पोस्ट वाचायला मिळाली. मी पुस्तक नक्की वाचेन आणि परत इथेच कॉम्मेंट देईन...
चित्र एकदम सुरेख रेखाटलय..खूप खूप खूप आवडल.
>>>>अप्रतिम दोन्हीही!
आज पॉप्युलर पोस्ट्समध्ये दिसल्यावर मी ही ह्या पोस्टवर आले..
हेरंबच्या आयडियाशी सहमत .... फोटोलाच लिंक दे!!
सुहास, आभार रे! :)
तन्वी, मला ना काय वाटतंय माहितेय? बाबा आणि नवऱ्याने केलेलं काम आहे...आणि मी ना इथे बसून भाव खातेय! :p :)
नमस्कार. तुमचा ब्लॉग नुकताच - म्हणजे २ मिनिटांपूर्वी - पाहिला. आवडला.
तुमच्या वडीलांबद्दल प्रचंड कुतुहल आहे. मी प्रदीप कर्णिक (बहुदा हेच नाव असावे) यांचा त्यांच्याबद्दलचा लेख वाचला. प्रचंड आवडला होता.
कार्ल मार्क्स बद्दलचे पुस्तक मागवतोच. तुमच्या वडलांचे इतर कुठले साहित्य प्रकाशित आहे याबद्दल थोडे सांगाल का ? प्रकाशित नसेल तर ते कुठे आर्काईव्ह केलेले आहे ते सांगू शकाल काय ?
मुक्ता, नमस्कार. सर्वप्रथम प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)
आणि नाव बरोबरच आहे....प्रदीप कर्णिक. ते रुपारेल कॉलेजचे लायब्ररीयन आहेत. आणि बाबांचे खूप जवळचे स्नेही. बाबा गेल्यानंतर त्याची दोन पुस्तके आम्ही संपादित करू शकलो आहोत. १. कार्ल मार्क्स-व्यक्ती आणि विचार आणि २.मानसोपचार पद्धतीचे आद्य प्रणेते-सिग्मंड फ्रॉइड. जर कुठे नाही मिळाली तर तसं मला कळव. मी तुला मिळवून देऊ शकेन. मला खूप आनंद झाला, तू बाबांच्या पुस्तकांबद्दल चौकशी केलीस म्हणून. अस्तित्ववादावरील बाबांचे लेख असेच प्रकाशित करण्याचा मानस आहे...बघू
कधी जमून येतं ते. :)
छान लिहिता तुम्ही. ब्लॉगवर आजच येणे झाले. लिस्टमध्ये अजुन एक ब्लॉग वाढला.
:) आभार सिद्धार्थ.
Post a Comment