आजचा तास आहे चित्रकलेचा ! :)
कॉलेजच्या दिवसांत, माझ्या नवऱ्याने (शरदने) काढलेली स्केचेस इथे टाकते आहे.
त्याने केलेले जलरंगातील माझ्या बाबांचे पोर्ट्रेट तर तुम्हीं रोज बघताच.
इंग्लिश मुळाक्षरे घेऊन स्केचेसची एक सिरीज त्याने बनवली होती. १९७९ साली 'इंटरनॅशनल इयर ऑफ द चाईल्ड'साठी तयार केलेली...ह्या स्केचेससाठी त्याने वापरले आहे रोट्रींग पेन आणि थोडेसे पोत असलेले त्याचे स्केचबुक. जे कॉलेजच्या दिवसांत सतत त्याच्या बरोबर असे. आणि कधीही कुठेही बसून त्याचे स्केचिंग चालू होत असे. त्यातील 'H' वर उभे असलेले दोघे, आम्हीं आहोत ! चौकडीची टोपी घालून तो आणि दोन शेंड्यांवाली मी ! मी माझा नवरा म्हणून सांगत नाही आहे, पण त्याच्या तोडीचा चित्रकार, मेमरी ड्रॉइंगवरील त्याचा कमांड हा त्यावेळी देखील खूप कमी प्रमाणात बघावयास मिळत असे...सध्या तर कोणी हे अशा पद्धतीची स्केचेस करतं की नाही कोण जाणे. मला तासंतास लेक्चर्स झोडून त्याने मला थोडे सुधारले होते...परंतु, चित्रकला अंगात असावी लागते, शिकवून येत नाही...ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मी आहे !
:)
मला आशा आहे, तुम्हांला त्याची वही बघण्यात आनंदच मिळेल...

45 comments:
मस्त आहेत सर्व.. चित्र जरी जमत नसले विशेष तरी अक्षरं (फॉण्टस) आणि त्यांच्या सावल्या, डायमेंशन्स जमायची आधी...
aa yum Loving it!!! :D :D :D
प्रत्येक चित्रातल्या कॅरॅक्टर्सच्या ऍक्शनमागे खुप बारिक निरीक्षण आहे हे दिसून येतय...
बालभारतीचं पुस्तक डोळ्यासमोर आलं एकदम. :)
अफ़लातून !
अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यापूर्वी एक वर्ष अभिनवला काढले होते पुण्यात त्या दिवसांची आठवण झाली. कमर्शिअल आर्ट्सला होतो.नंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेतला आणि सगळं मागे पडत गेलं. पण तिथेही आकर्षण होतं ते इंजिनीअरींग ड्रॉईंग या विषयाचं. आयसो, ऑर्थो म्हणजे जिव की प्राण होतं त्या काळात. गेले ते दिन गेले..... :)
अनघा, अप्रतिम आहेत सर्वच्या सर्व चित्र :)
अप्रतिम ..
फार भारी ..
सहीच...... खरंच हल्ली पाहायला मिळत नाहीत अशी स्केचेस....
मस्तच गं अनघा :)
चित्रकला (आणि गणित ) हे उपजत यायचे विषय आहेत हे माझेही मत आहे :)
अप्रतिम...
chitre khup avadli.
मस्तच ! जाम आवड्या !! :)
चित्र मस्तच आहेत अनघा! खूप आवडली.एका वेगळ्याच वातावरणात घऊन गेली.चित्र इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
आनंद, अरे, मला आणि उगाच वाटायचं..की आपल्याला जमते..चित्रकला! म्हणून गेले ना मी जे जे ला! :p
आभार रे. :)
हो ना सौरभ! त्याचं मेमरी ड्रॉइंग म्हणजे एकदम बाप!
:)
विशाल, खरं तर स्केचिंग हे असं आहे की ते आपण आयुष्यभर चालू ठेवू शकतो! नाही का? मी फिरते अशी उगाच माझी स्केचबुक घेऊन! :)
आभार रे. :)
श्रीराज, धन्यवाद! माझा विचार आहे त्याच्या चित्रांचा एक ब्लॉग लवकरात लवकर सुरु करायचा...एक क्षण उसंत मिळेल तर ना! :(
बंड्या! धन्यवाद रे! :)
इंद्रधनू, आभार ग! :)
तन्वी, एकदम जिवंतपणा आला ना ब्लॉग ला ? :)
आभार हं ! :)
सिद्धार्थ, धन्यवाद. :)
सुरेश, आजच्या ह्या चित्र प्रदर्शनाला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार! :)
दीपक, छान आहेत ना खूप ?! धन्यवाद रे ! :)
विनायक, इतकी सुंदर सुंदर चित्र आहेत ना त्याने काढलेली! सगळी एकापेक्षा एक सरस. :)
धन्यवाद हं. :)
निव्वळ अप्रतिम... टोप्या उडवल्या (आपलं Hats Off :))
:)
:) सुहास, आज ना मला कॉलेजमध्ये असल्यासारखं वाटतंय! त्याच्या चित्रांचं प्रदर्शन असलं की मी अशी त्याच्या जिवावर भाव खात असे !! :)
या चित्रांमध्ये नक्की एक वेगळेपण जाणवतंय.. एकदम फ्रेश, उत्साही, खोडकर असे भाव आलेत. आणि अक्षरंही कशी मस्त वळणदार आणि रेखीव !! खरंच अप्रतिम !! त्यांची अजून चित्रं बघायला आवडतील !!
anagha
Shaarad nehmich aamchyasathi inspiration hota, junior aslyakarnane to nehmich mothhha watayacha
हेरंबा, त्याला अहो जाहो नाही केलंस ना तर त्यालाच खूप बरं वाटेल. :)
नक्की...प्रयत्न चालू आहे...त्याची चित्र जालावर टाकण्याचा. :)
गुरू, मला खूप आनंद झाला तू इथे येऊन त्याच्या चित्रांना दाद दिलीस! खूप खूप आभार! :)
कल्पना छान आहे! :)
जबरदस्त! आवडलं मला! inspirational आहे! thanx for sharing! :)
मस्तच आहेत. मी आपली अजून ८ हेड क्रोकी ते १० हेड मधेच आहे. :)
असो तुला आवडेल कदाचित म्हणून आमच्याघरी पायधूळ झाडणे http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/2011/04/blog-post.html
chayan chitra aahet ...baryach devsani sahebache kam bakhitele dhanywad
भिशूम! आभार..आणि ब्लॉगवर स्वागत! :)
अगं नीरजा! पायधूळ कसली! मी कालच बघितलाय तुझा लेख! फक्त नीट वाचायला नाही ना मिळाला म्हणून काही प्रतिक्रिया नाही दिलेली! :)
संदीप, कदाचित तू नसशील बघितलेली ही स्केचबुक...नाही का?
हळू हळू करून साहेबांची काही चित्रं इथे टाकण्याचा विचार आहे...टाकली की कळवेनच.
आभार प्रतिक्रियेबद्दल.
sharad chya barobar kaam kartana evdha kaahi shikaila milala, aaj aayushyat pratyek weli tyachi aathwan yete... barach kaahi devoon gela...
माहितेय मला अखलक...मीही आज जी स्वत:च्या पायावर उभी आहे त्याचे श्रेय त्यालाच जाते...
मस्तच !!!! अतिशय सुरेख. याच्या १ % सुद्धा आम्हाला जमत नाही हो..काय म्हणतात ते..."दिल garden garden हो गया"
आणि हो, अनघा madam, आपले अभिनंदन...bolg followers चे शतक झाल्याबद्दल !!!
पंकज! अरे आपल्याला जमत नाही हे पक्कं माहित असणं बरं नाही का? नाहीतर माझ्यासारखं! आपल्याला जमतं असं समजून 'जे जे' च्या दिशेने चालू पडायचं! आणि मग हे असे शरदसारखे चित्रकार भेटले ही एकदम खाडकन डोळे उघडणे बिघडणे ! :)
हो ! शंभरी गाठली !! मज्जा ! धन्यवाद हं ! :)
loved them all...especially the last one :)
सगळी चिल्लीपिल्ली जगभर साजरा केल्या जाणाऱ्या त्यांचा वर्षात चाललीयत गटारात ! सगळी ही चित्र मला एकत्र आडवी लावता आली असती ना वंदू, तर कदाचित ती अधिक परिणामकारक ठरली असती. नाही का ?
कल्पना आणि सादरीकरण प्रचंड कल्पक आहे... कैच्याकै... :)
धन्यवाद रोहन ! :)
चित्रकलेवर मी कमेंटणं म्हणजे आयुष्यभर कबड्डीपलिकडे खेळ माहित नसणार्यानं बास्केटबॉलवर कमेंटणं आहे.. तरी
रोहन +१
अरे विद्याधर, चित्र बघताना आनंद मिळाला ना ?! मग बस्स झालं ! :)
Post a Comment