नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 28 April 2011

पुनर्ओळखीची गोष्ट...

प्रेम, माया ह्या काही मोजण्याच्या गोष्टी नव्हेत. त्यांचे अस्तित्व हे सुखद आठवणी घेऊन येते. जसा एखादा वृक्ष. प्रेम ही त्याची खोल रुजलेली मुळे वर डवरलेला त्याचा फुलोरा ही त्या प्रेमाचीच दृश्य चित्रे. नव्हे काय ?

माझा असा एक पेटारा ओसंडून वाहतो आहे. अगदी लिहिता वाचता यावयास लागले तेव्हापासूनची एकेक पाने...एकेक फुले. कोणाची पत्रे, कोणाची चित्रे, कोणी दिलेल्या चिमुकल्या भेटवस्तू तर कोणी दिलेला एखादा टपोरा लाल गुलाब. काय तो सुकला ? काय तो कोमेजला ? नाही. तो काळापरत्वे काळसर झालेला गुलाब ज्या ज्या वेळी समोर येतो त्या त्या वेळी तो नाजूक क्षण ताजा टवटवीत डोळ्यांसमोर जिवंत उभा रहातो.

असेच...त्याच भावनेने त्या दिवशी माझ्या आठवणींच्या पोतडीत एक हिरा ठेवला.

"आज तुमचा काय कार्यक्रम आहे ?" सौरभ.
मैत्री म्हणजे अगदी नेहेमी समोरच बसून गप्पा मारता याव्यात अशी माझी भ्रामक समजूत कधी नव्हतीच. त्यालाच दुजोरा देणारी अशी माझी नवी मैत्री. मैत्रीला काही वय नसते. पण तरी देखील ही माझी एक वर्ष जुनी मैत्री.

त्यावेळी एका मैत्रिणीने काँन्सिलरकडे जाण्याचा प्रेमळ सल्ला दिला होता. अशी काँन्सिलर, जिने तिच्या कठीण काळात तिला बाहेर यावयास मदत केली होती. मी गेले. काँन्सिलर बाईंनी उपाय सांगितला. १००० रुपये फी. उपाय ? तर पत्र. पत्र लिहिण्यास सांगितले. पहिले पत्र बाबांना. दुसरे आईला. तिसरे नवऱ्याला. ह्या तीन व्यक्तींना जे काही मनापासून सांगावेसे वाटते ते त्या प्रत्येक पत्रातून व्यक्त करावयाचे होते. लिहिली. अगदी वाईट भाषेतच बोलायचे झाले, तर 'भडास काढली.' बाबांचा कधी आलेला राग, आईच्या कधी पटलेल्या गोष्टी, नवऱ्यामुळे मला माझ्यामुळे नवऱ्याला झालेला प्रचंड मनस्ताप. त्या पत्रांतून सगळे लिहिले. मग ? मग पुढील खेपेस ज्या वेळी काँन्सिलर बाईंकडे गेले, त्यावेळी ती तिन्ही पत्रे माझ्याकडून तिने वाचून घेतली. अगदी नाट्य प्रवेशच झाला काहीसा तो. म्हणजे आवाज वर खाली. पत्रातील मजकुरास शोभेसा. १००० रुपये झाले. म्हणजे १००० + १००० = २०००. आता ? आता पुढील वेळेस येशील त्यावेळेस ह्या व्यक्ती, तुझ्या पत्रांना काय उत्तरे देतील हे लिहून काढ, असे सांगण्यात आले.

परंतु, माझा हा पत्रव्यवहार इथेच थांबला.
मात्र लिहायला जी सुरुवात झाली, ते नाही थांबले. रेस्टइजक्राईमची पाने भरू लागली. दिवसागणिक एक.

पुढे ? पुढे सातासमुद्रापलीकडे माझ्यापेक्षा खूप छोटाश्या एका मुलाच्या हाती देवाने ही माझी पाने सुपूर्त केली. सौरभ. सौरभ नुसता वाचून थांबत नव्हता. प्रत्येक वेळी वाचलं की त्यावर त्याची प्रतिक्रिया देत गेला. कधी विचार करावयास भाग पाडणारी. तर कधी खोखो हसवणारी. म्हणजे मी एकदम काही लिहिलेलं असे...भावनांचा उद्रेक वगैरे...आणि हे बुवा त्यावर अशी काही प्रतिक्रिया देत असत की हसू फुटलेच पाहिजे ! आणि हा उपाय माझ्यासाठी एक जीवदान ठरला. एक कोमात गेलेला जीव. हळूहळू हालचाल करू लागला. काय हे मी उगाच बोलते आहे ? नाही. पूर्ण सत्य. माझ्या दुसऱ्या जन्माचे...

मुंबईत येऊन ठेपलेल्या सौरभचा त्या दिवशी फोन आला.
"आज तुमचा काय कार्यक्रम आहे ?"
"का रे ?"
"मी दादरला आलोय. आपण भेटू शकतो का ?"
"हो तर. का नाही ? अर्ध्या तासात शिवाजी पार्क सीसीडीत भेटूया काय ?"
"चालेल."

आणि मग पुढे ?
पुढे जे काही घडलं ते म्हणजे माझ्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचेच होते ! म्हणजे हे कधी माझ्या डोक्यातच आलेले नव्हते !

काही महिन्यांपूर्वी, सौरभच्या डोक्यात आयडीयेची कल्पना आली. मग आकाशच्या मदतीने रेस्टइजक्राईममधील त्यांना आवडलेले लेख दोघांनी निवडले. श्री फलटणकरांच्या मदतीने ते एकत्रित करून त्याचे एक पुस्तकच छापले !
पाटी माझी पटेल काय ?

ह्या धक्क्यामधून बाहेर यायला मला जवळजवळ एक महिना लागला. ते पुस्तक काही दिवस मला हातात धरता येत नव्हते. उघडून बघणे तर दूरचीच गोष्ट ! म्हणजे मला नक्की काय वाटते आहे हेच मला कळत नव्हते !

आजपर्यंत अगदी लहानपणापासून मी 'विश्वास पाटलांची मुलगी अनघा' असे अगदी खणखणीत आवाजात सांगते. नंतरच्या काळात 'शरद निगवेकरची बायको अनघा' हे मी सांगत आले.
आणि आज ज्यावेळी मी माझी ओळख, 'अनघा निगवेकर' म्हणून जाणून घेऊ शकले त्यावेळी कधीही माझ्या स्वप्नात देखील ते नव्हते !

सौरभ, आकाश आणि राजीव...
प्रेम, माया ह्या काही मोजण्याच्या गोष्टी नव्हेत.
त्यांचे अस्तित्व हे सुखद आठवणी घेऊन येते...
हे पुस्तक...ही माया...ही आठवण...
सुकत चाललेल्या पिंपळावरचे हे हळूच उगवलेले एक नाजूक गुलाबी पान.
:)

61 comments:

Deepak Parulekar said...

मस्त मस्त !!
हार्दीक अभिनंदन !!
बायदवे ! आमची प्रत आमच्यापर्यंत पोहचली नाही अजुन !

rajiv said...

अनघा , `पाटी'चे खंड व आवृत्त्या आम्हांस प्रकाशित करायला मिळण्यासाठी ब्लॉग वर असेच लिखाण करीत राहा !!

हेरंब said...

जब्बरदस्त जब्बरदस्त !!!!!

ऐसा फॅन फॉलोइंग मंगताय.. !!

आय एन्व्ही यु :)

Anagha said...

:p खरंच! दीपक भाऊ, पुढील भेटीत देण्यात येईल ! :)

Anagha said...

राजीव, बरं बरं....आपल्या विनंतीस मान देऊन आमची बॅटिंग चालूच राहील ! :p

Anagha said...

हेरंबा ! :) आभार रे !

Unique Poet ! said...

क्या बात................ :) अभिनंदन ... ! प्रत कुठे मिळेल... ? प्रकाशक ?

इंद्रधनु said...

मनापासून अभिनंदन अनघाताई :)

सौरभ said...

आँ!!! ईश्श्य... ऊँम्म्म्म ऑम्मी नॉई जाऽऽऽ कस्ससच, काहीतरीच बाबा तुमचं... हाय रे दैय्या... ऊईमाँ... gishhh!!! blush blush!!!
माझ्या माहितीतल्या सगळ्या भाषांमधे लाजून झालंय. आता ह्यापलिकडे जमणार नाही.

मला ना कसं गदगदल्यासारखं झालंय. म्हणजे आई सकाळी गदगदा हलवून जागं करते तसं नाही. वेगळंच...

(आता ईमोशनल सिन... बॅकग्राउंडला पिपाणीचे विचित्र बारीक हॄदयाच्या ऐवजी कान चिरत जाणारे स्वर)
असं कोणी कधी माझ्याबद्दल बोललं नाही हो... (लक्षात घ्या स्वर कापरा झाला आहे. कुमार सानूच्या तालात जशी कंपन असतात तसंच. डोळे पाणीपुरीसारखे भरुन आलेत.)

(आता थोडा माज) ह्या ब्लॉगवर नाना पाटेकर आणि गुलजार ह्या दिग्गज व्यक्तिंनंतर आपलं नाव आलेलं आहे. ह्याचा आम्हास गर्व आहे. ह्याचेच निमित्त करोनी आम्ही आता आमचे "आत्मचरित्र" नव्हे "आत्मस्तुती" लिहिण्याचा मनोदय व्यक्त करतो आहोत. :D

-----------------------

असो... बरिच फुटकळ बडबड केली. now seriously... हे पुस्तक छापिल स्वरुपात येण्यात मोठ्ठा वाटा राजीव काकांचा आहे. छपाईच्या बऱ्याच तांत्रिक गोष्टींची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. time management गंडलेलं. कोणताही पुर्वानुभव नसताना केलेला हा प्रयत्न गोड मानुन घ्या.. (कसलं typical वाक्य आहे हे!!!)... ह्यानंतर ह्या पुस्तकाच्या अधिक आकर्षक अनेक आवृत्त्या येतिल. पण तरी काही का असेना. हि पुस्तकाची प्रथम आणि अगदी दुर्मिळ अशी आवृत्ती आहे. आणि "अनघा निगवेकर" ह्यांच्या उपस्थितीत त्यांच्या स्वाक्षरीसकट ती आम्हाला मिळालेली आहे.
I'm so lucky and so proud about it. :) :D

cheerzz!!!

हेरंब said...

सौरभची कमेंट सुपरडुपरबंपर लाईक :D

Anagha said...

समीर, आभार.... प्रकाशक ना ? सौरभ, आकाश आणि राजीव !
आणि प्रत माझ्याकडे मिळेल !
कधी भेटतोस सांग पाहू ? :)

Anagha said...

इंद्रधनू, आभार गं ! :)

Anagha said...

सौरभा ssssssssssssssssssssssssss !!!!!
मी तुझ्यापुढे काहीही म्हणजे काहीही बोलू शकत नाही !!!!!!! फक्त हसू शकते ! :D :D :D

Anagha said...

बघितलंस ना हेरंबा ! हे असंच कमेंटत असतो तो नेहेमी ! कंत्राट घेतलंय त्याने हसवायचं ! :D

panda said...

अभिनंदन अनघा मैडम!!! आणि हो... सौरभ, आकाश आणि राजीव....Hats of you guys !!! एकदम सॉलिड. आपल्याला तर बुवा पुस्तकाची "आयडीयेची कल्पना" जाम आवडली. मस्तच !!!

तृप्ती said...

हार्दिक अभिनंदन अनघा :)

ह्या निमित्ताने: तुझे सगळेच लेख मी (जेवणाच्या सुट्टीत) वाचते. आज काल ऑफिसमधून कमेंट देण्याची सोय नसल्याने काही प्रतिक्रिया देण्याची राहून जातेय. छान लिहितेस, अशीच लिहिती रहा.

Anagha said...

पंकज ! किती मेहनत घेतलीय अरे ह्या तिघांनी ! खूपच बाबा ! :)
आभार रे प्रतिक्रियेबद्दल ! :)

Anagha said...

तृप्ती आभार ग ! :)

Anagha said...

राजीव, माझ्या आत्ता एकदम डोक्यात आलं....की 'पाटीचे खंड' म्हणजे 'मी पाट्या टाकतेय' असा होईल काय ? :p

Shriraj said...

@ सौरभ!!! आता काय बोलू... हसू आवरत नाहीये... खरंच नवल वाटतं तुझं.. तुझं थोडं डोकं मला दे ना :P

shweta pawar said...

हाय अनघा,
खूप दिवसांनी तुझ्या ब्लॉगला विझिट दिली
मला नेहमीच आवडलाय तुझ लिखाण
बऱ्याच दिवसांनी काहीतरी चांगल वाचलं
तुझ्या पुस्तकासाठी तुझे खूप खूप अभिनंदन
आयुष्यात अशी मानस खूप कमी असतात.
श्वेता

Anagha said...

श्वेता ! अगं आहेस कुठे ? एकदम नाहीशी झालीस आणि काळजी देऊन गेलीस !
:) ठीक आहेस ना ? गुड !
आणि खरं आहे अगं, अशी माणसं खूप कमी असतात...माझं भाग्य की तुम्हीं सगळे मला भेटलात ! खरंच ! :)
आणि आभार ग... :)

Anagha said...

हसवलं ना श्रीराज तुला पण ह्या पठ्ठ्याने ! :)

Suhas Diwakar Zele said...

हाबिणंदन.... :)

बाय द वे..पुन्हा एकदा....
कॉपी माझी मिळेल काय ;-)

खुप खुप शुभेच्छा गं..लिहत रहा !!

Anonymous said...

सौरभ तुझी बायको खूप नशीबवान असेल बघ! मुलींना सरप्राइजेस् खूप आवडतात

Anagha said...

सुहास, अरे मुद्दाम तुझ्यासाठी एक प्रत गाडीत ठेवलीय ! पण नेहेमी विसरूनच जाते मी तुला द्यायला ! :( आता पुढल्यावेळी नक्की ! :)

Anagha said...

प्रिया ! :D बायको शोधायला सौरभ साहेब निघतील तेव्हा त्याच्या CV मध्ये हे एक टाकूया आपण ! :D

neela said...

हार्दिक अभिनंदन!!!!

Anonymous said...

अनघा अगं ही पोस्ट तीन वेळा वाचली मी... दर वेळेस वाचते मग अजून छान वाटतं :)

तूझा तो आश्चर्यचकित फोटो पाहिला की मस्त मस्त वाटतं एकदम.... असेच आनंदाचे धक्के बसू दे हो ना... :)

पुस्तक हवय आम्हाला ओ बाई... भारतात आले की गाठतेच तूला...

बाकि हेरंबा हो रे खरच हेवा वाटू द्यावा का जरासा हिचा... की नकोच मस्त खुश होऊया... :)

Hemant Adarkar said...

When do I get my copy?

BinaryBandya™ said...

लय म्हणजे लय म्हणजे लयाच भारी ...
आम्हाला पण हवंय पुस्तक ...

आणि अनघा अभिनंदन :)

@सौरभ, आकाश, राजीव
जिंकलं तुम्ही ...

Anagha said...

नीला, धन्यवाद ! :)

Anagha said...

हेहे ! अगं तन्वी, मला जेव्हा आकाशने फोटो मेल केले ना तेव्हा तो आश्चर्याच्या झटक्याचा जो फोटो आहे ना, तो पाहून मला एकदम ते विश्वसुंदरी घोषित झाल्यावर ते त्या बायका असं काहीतरी करतात ना...तोंडावर हात ठेवून बिवून...त्याचीच आठवण झाली ! :p :D

आणि नक्की ! आलीस मायदेशी की नक्की फोन कर ! भेटूच मग ! कधी येतेयस पण ??? न भेटताच गेलीस तर बघ ! :)

Anagha said...

हेमंत, आपण भेटलो की नक्की नक्की !!!! :)

Anagha said...

बंड्या, भारी ना ?! कस्सलं गिफ्ट आहे अरे हे ! आई माझी बिचारी चकितच झाली....मला म्हणे, हे एव्हढं लिहिलंस तरी कधी तू ?! :p

Trupti said...

sahi..ch abhinandan!! Anaghaji,
mala hi ek copy havi ahe ..kuthe available hoil ti?...asa mitra parivar labhane hey kiti mothe bhagya ahe na...
me saurab ani akash yancha hi blog wachte...khup chaan lihitat te...
tumachya maitri che thode se kshan amaha la hi labho...hi sadichha .
trupti:)

sanket said...

जब्बरदस्त !! अभिनंदन ! ही पोस्ट वाचतांना मलाही जबर आनंद होत होता. २ दा वाचून काढले. तुझ्या चेहऱ्यावरचे ते भाव ना अगदी-अगदी बोलके आहेत ताई !!
अरे हो, एक प्रत मला पण !!
सौरभ, आकाश, राजीवजी, मानले बुवा !!! जेव्हा तुम्ही पुस्तक भेट दिले, मी तो क्षण डोळ्यांसमोर आणायचा प्रयत्न करतोय !!
सौरभ -आकाश हे दोघे अगदी भन्नाट आहेत. माझा ब्लोग कबरेतून बाहेर काढणारा आकाशच !! रजनीकांतच्या आरतीने सफर परत एकदा सुरु झाला आणि ती कल्पना देणारा आकाशच !
आणि आकाशने सौरभची ओळख करून दिली. हा अजून एक औलिया निघाला.
सौरभ म्हणजे चैतन्याचा झुळझुळणारा झराच आहे गं ! बर्फाहून थंड आहे अगदी !! हास्याचे कारंजे फुलवायचे काम इतके सहज करतो की जणू हा माळी होता मागच्या जन्मात हास्यबागेचा !(म्हणजे आपला च्याप्लीनांचा चार्ली हो !!)
बाबाकांता, तू खरेच एक ग्रेट काम केलंस ! या भन्नाट कल्पनेसाठी तुला सलाम रे !!
आता थाटामाटात प्रकाशन समारंभ उरका बघू ! महाराष्ट्राच्या प्रत्येक दुकानात हे पुस्तक पोचले पाहिजे !( माझ्या गावी ते पोचले म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचले असे समजेन मी.:D )

"पाटी माझी पटेल काय?"
लेखिका "अनघा निगवेकर "

आयला, कित्ती कित्ती मस्त वाटतंय !!!

नीरजा पटवर्धन said...

मस्त मस्त मस्त...
अभिनंदन...

तुला अभिनंदन म्हणून हे आवताण...
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/2011/04/blog-post.html

Anagha said...

:p कसलं वाटतं ना संकेत ?! एकदम शेल्फवर ! 'पाटी माझी पटेल का ?!! :p
अरे संकेत, पण जर सगळं इथे वाचायला मिळतंय ते आपलं पुस्तक विकत कशाला कोण घेईल ?!!! :( तुम्ही सगळे घ्याल...प्रेमापोटी ! पण पुढे ??!! :) :)

आणि हो ! सौरभ आणि आकाश म्हणजे आहेत खरे ! एकदम भन्नाट ! आणि आता आलास की राजीवना पण एकदा भेटूनच घे ! ते असे, कल्पना एकदम उचलून धरणारे आणि सर्वतोपरी मदत करणारेच आहेत !! :)

आभार रे ! :)

Anagha said...

नीरजा, अगं, आभार ! :)

Anagha said...

तृप्ती, अगं, असं वाटतं की मित्रमैत्रिणी हीच तर खरी आयुष्याची पुंजी नव्हे काय ? :)

वाचतेस ना तू पण त्या दोघांचे ब्लॉग्स ? त्यांनी आता एकत्र एक ब्लॉग केलाय....तो बघितलास का ?

अगं, आपण हे इथे भेटतो, गप्पा मारतो...आनंदाचे वा दु:खाचे क्षण एकत्र अनुभवतो....आणि मग नवशक्ती घेऊन पुढे सरकतो...हो ना ?

खूप खूप आभार गं ! :)

रोहन... said...

अरे वा... अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा... :) कमालच केली सौरभने... :)

Anonymous said...

मस्त मस्त !!
हार्दीक अभिनंदन !!

Anagha said...

सेनापती ! किती दिवसांनी अवतीर्ण झालायत !! :)
आभार रे ! :)

Anagha said...

राज, मंडळ आभारी आहे ! :)

रोहन... said...

आता आलोय... मोहीम पूर्ण करूनच जाणार... तुम्ही मात्र टांग दिलीतच...गेल्या शुक्रवारी...

Unique Poet ! said...

भेटू भेटू...! अनघाताई !
यासाठी तर नक्कीच भेटू :)

अपर्णा said...

अनघा पुन्यांदा हबिनंदन ........ तुझ्याकडे तुझ्या स्वाक्षरी (च्यायला गटणे आठवला बघ मधेच....) सहित वाल्या आवृतीची मागणी मी कधीच नोंदवली आहे आहे न लक्षात??
सौरभ ची कमेंट जबरा आहे...त्यावरून थोड टी शर्ट टाईट करते.... माझं पण नाव या ब्लॉगवर यक डाव येऊन गेलाय म्हूनशान ....:)
तुझे फोटू खरच विश्वसुंदरी झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया असते तसेच आहेत.....मस्त मस्त मस्त....

Anagha said...

अगदी अगदी ग अपर्णा ! मस्त अगदी महत्वाचा उल्लेख आहे गं तुझा ! :D
खूप खूप आभार गं ! मला पडता पडता सावरल्याबद्दल ! :)

shweta pawar said...

अग काळजी नको करूस
थोडी डीस्टर्ब होते
म्हणून लांब होते सगळ्यांपासून
पण खरच तुझी आठवण येत होतीच
थोड शांत राहायचं होत
आता ठीक आहे मी
आता रेगुलर वाचेन

THEPROPHET said...

मी हे फोटो फेबु वर आधीच पाहिलेले!!
मस्त वाटलं असेल ना एकदम!!! :):) अभिनंदन गं पुन्हा एकदा!

Anagha said...

:) धक्का धक्का ! कसला धक्का होता तो विद्याधर !
आभार रे ! :)

भानस said...

जबरीच!

बयो, अगं हे मला माहीतच नव्हते. आणि गधडे तुही म्हणालीस नाहीस. घाबरलीस होय एक प्रत द्यावी लागेल म्हणून. आता दामदुप्पट वसुली होणार बरं.

मस्त! मस्त!जियो!!!

तुम लिखती रहो हम पढते रहें... :)

Anagha said...

अगं शहाणे, त्या दिवशी तुला भेटायला म्हणून निघाले तेव्हा तुझ्यासाठी म्हणून एक प्रत गाडीत घेतली होती ! पण तू मला टाकून सिनेमाला गेलीस ना ! :( :( :(
:)

भानस said...

अगं, नाय गं बयो. भाच्या सोडेतचना. मग बालहट्टापुढे सपशेल शरणागती. अनघे, फार चुटपुट लागली बघ मला. आपली भेट नाही झाली. आता कधी योग येईल कोण जाणे... :(

Anuja said...

हार्दिक अभिनंदन

भानस said...

अनघे, अगं किती भरभरून तुझे कौतुक केले होते गं बयो. पण या दुष्ट ब्लॉगराने डाव साधलाय. :(

खूप खूप अभिनंदन! इतका आनंद झाला हे वाचून. लगे रहो तुम हम है पढनेकु... :)बये, माझी प्रत नीट ठेव. आणि पुढल्या भेटीत घेऊन ये.

जियो बहाद्दर!

राजीव, सौरभ, आकाश यांचे खूप आभार. :)

Anagha said...

अनुजा बाई, आभार आभार ! आणि प्रतिक्रियेबद्दल देखील धन्यवाद ! :)

Anagha said...

नक्की गं बयो ! तू आता काढ काहीतरी कारण आणि ये परत ! :) :)
मजाच आली गं मला भाग्यश्री ! पण हे असं काही अपेक्षित नव्हतं ना..त्यामुळे धीरच नव्हता होत...पुस्तक उघडून बघण्याचा ! :p

Dhaval Ramtirthkar said...

pustak!!! aaila sahi... totellisalsocrime ha naveen blog kadhi publish karnar?

लिना said...

Copy kadhi milel?