स्वस्थ घरी बसवेना. सगळं जग जागं...मग का जाऊ नये...सचिनचं शिवाजी पार्क काय करतंय, का बघू नये?!
त्या उत्साहाच्या भरात अंगातील विसराळू विनूने तशीच एक डुलकी मारली आणि कॅमेरा घरीच विसरले! पण मग मोबाईलच्या कॅमेरावर फोटो काढलेले आहेत..मला माहित आहे की फोटोत अंधार नुसता माजलाय! पण लक्षात घ्या...मध्यरात्र झालेली होती.....परंतु जगभराचा प्रत्येक भारतीय जागा होता...आणि तोच मूड त्या फोटोमध्ये आहे...अंधाराकडे कानाडोळा करा...आम्हां शिवाजी पार्कवाल्यांच्या भावना समजून घ्या!
आणि कदाचित तुमचं सचिनवरील प्रेम तुम्हांला त्या मिट्ट अंधारात देखील दृष्टी देईल...आणि रात्री एक वाजता खचाखच बहरलेले टक्क जागे, नाचणारे, गाणारे शिवाजी पार्क तुम्हांला दिसून येईल.








16 comments:
लवकरच तलावपाळीवरच्या जल्लोषाचेपण दर्शन करवतो... :)
दाखवा दाखवा! तरीही आमच्या शिवाजी पार्कचं दर्शन हे खासच! :p
आमच्या इंडियन स्ट्रीटलाही झालं बरं का सेलिब्रेशन !! ;)
होsssss! पण हे 'सचिनचं शिवाजीपार्क' आहे! फरक है भाय! :p
अनघा, दिसतोय बरं का... त्या अंधारात ही दिसतोय तो जल्लोष
जाम मजा आली बघ त्या शनिवारी... मी डोंबिवलीला मित्राकडे गेलेलो match बघायला :)
कसल मिस करते मी सगळ...त्यादिवशी नुस्त आरुश्ला घेऊन घरभर धावाधावी केली...आमची धाव तेवढीच ...
सही ना श्रीराज?! कसला जल्लोष माजला होता!
हो ना अपर्णा?! चला परत या! :)
असं मी माझ्या बहिणीला पण सांगत असते नेहेमी! :)
यायचंय गं....फ़क्त पार्काएवढे पैसे (पैसे कसले पेटी/खोके असलं काही म्हणायला हवं) जमत नाहीएत गेली कित्येक वर्षे.....:(
ह्म्म्म! हे बरिक खरं गं! ह्या चढत्या भावामुळे आपण आपल्याच परिसरापासून दूर जातोय ना?! :(:(
आम्ही सुध्दा फ़ुल २ मजा केली...अविस्मरणीय क्षण आहे आयुष्यातला... :) :)
:) एकदम एकदम! :)
आभार योगेश!
हाहा सचिननं घराबाहेर काढलंच की ;)
जगातले सर्व भारतीय त्यारात्री जागे होते .. १००%
अगदी अगदी आनंद ! किती ही एकीची भावना ! नाही का ?
आम्ही मिलानमध्ये पार्टी केलेली! :D
विद्याधर, कस्सली मज्जा आली नाही का रे ? कस्सली जिवंत रात्र होती ती ! अख्ख्या जगातील भारतीय एकच क्षण जगत होतो आपण ! मस्त ! :D
Post a Comment