एका आठवडाभरच्या प्रवासाला निघणार आहे मी आज रात्री. हिंदी चिनी भाई भाई मनात धरत. लेक आधीच पोचलीय. आणि तिने हुकूम दिलाय इंग्लिश- चायनिझ शब्दकोश घेऊन येण्याचा. आता पुढचा आठवडा 'चिनीमकाव' डोळे सगळीकडे दिसणार आहेत आणि सकाळ संध्याकाळ फ्राइड राइस आणि नुडल्स खाणार आहोत. आणि मग एकदोन दिवसांतच माझी लेक प्रत्येक मिनिटाला सिटिलाईटच्या मासळी बाजाराची आठवण काढेल! बघू, वेगवेगळ्या चवी नेहेमी मोठ्या आवडीने घेणारी माझी लेक आता किती साप आणि झुरळं खाते! :)
आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, जेंव्हा जमेल तेंव्हा तुमच्याशी गप्पा मारेनच. मराठीतच मारेन, चिनी भाषेत नाही!
:)
8 comments:
नक्की हा.. तिकडून सुद्धा पोस्टा टाक... नाहीतर गायब होशील... :) तुझ्या 'डेली डोस'ची सवय झाली आहे आता... :D
नक्की रोहन... मला देखील सवय झालीय तुमच्याशी रोज गप्पा मारायची! :)
Hmmm, 'इसाप' अगोदरच पोहचलाय काय तिथे! :)
बरं. Anagha, Wish you happy journey. काळजी घे!
धन्यवाद श्रीराज! हो, इसाप आधीच पोचलाय. आणि आता तिथून हुकूम सोडतोय!
:D
祝您旅途愉快... 照顧 :)
यंजॉव गं... साप, झुरळं... आणि चिनीमकाव.... बये, तू मासे हाणतेस तेवढंच कर हो.... उगाच या भलत्याच वाटेला नको बाई जाऊस.... मला का दिसते आहेस.... सापा-झुरळाच्या पाटीचे भाव करताना.... :))
भाग्यश्री, ही तुझी प्रतिक्रिया वाचून न मला परत परत हसू येतं!! आणि मग मला, मी चीनच्या बाजारात बदकं, झुरळं, पाली बेडूक विकत घेताना दिसते!! ईईईईईईईईईए! :D
सौरभ, तिथे ना एकदा माझी लेक चिनी भाषेत मारे 'शें शें' (धन्यवाद) म्हणायला गेली आणि अशी फसली ना! मॅडम तेव्हढं एकंच शिकून आल्या होत्या! ती चिनी बाई पुढची १० मिनिटे हिच्याशी चिनी भाषेत फाडफाड बोलू लागली! तिला आवरता आवरता माझ्या लेकीला पाळता भुई थोडी झाली!! :D
Post a Comment