"ताई, तुमच्यामुळे सगळं आयुष्य सांभाळू शकलो मी. मुलगी शिकली. इंजिनियर झाली. नोकरीला लागली. आता काही चिंता नाही. आम्ही दोघं कधी जेवलो, कधी उपाशीपोटी झोपलो. पण सगळ्याचं मुलीने चीज केलं. आता आम्ही रोज जेवतो. कधी गोडधोड करून खातो. हे सगळं तुमच्यामुळेच झालं ताई."
फुटपाथावर बसणारा, एका डोळ्याने अधू असलेला फुलवाला. माझ्या मैत्रिणीचे आभार मानत होता. बोलता बोलता मोगऱ्याचा गजरा तयार झाला. सोनचाफ्याच्या पुड्या बांधल्या गेल्या. दहा रुपयांना तीन फुले. आम्ही तीन पुड्या घेतल्या. त्याचे तीस रुपये आणि गजऱ्याचे मला वाटतं पाच रुपये.
"केव्हढी आहे तुमची मुलगी काका?" मी विचारलं.
"चोवीस असेल ताई."
अर्थशास्त्र मला कळत नाही पण, अंदाजे त्यांची मुलगी जेंव्हा शाळेत शिकत असेल त्यावेळी चाफ्याचा भाव पाच रुपयांना तीन असावा.
चाफ्याची तीन फुले...
एका घरात सुवासिक संध्याकाळ.
आणि दुसऱ्या घरात चवीला खीर.
फुलं, मौनातून मौलिक कामे साधतात.
5 comments:
hey anagha
chaan lihile aahes. you are very sensitive person. Mhanun tula itke changle lihita yete. interesting aahe. Mala tuzi lihinyachi style aawadate. Tu aata short storiesche pustak lihi.
Padam
" फुलं, मौनातून मौलिक कामे साधतात."
नक्कीच.:) पोस्ट छानच.
लेख: सत्यम् शिवम् सुंदरम् !
कमेंटः पद्माचं आणि माझं मत या बाबतीत अगदी तंतोतंत जुळतं !
पदम, तू ब्लॉग वर आलीस आणि लिखाण वाचलंस ह्याचा मला खूप आनंद झाला. त्यातून हा अनुभव घेतला तेंव्हा तूच तर होतीस बरोबर! अशीच येत जा.. :)
श्रीराज आणि भाग्यश्री, ही आपली लिखाणातली साथ, रोज माझा दिवस खूप छान सुरु करून देते. :)
फुलं, मौनातून मौलिक कामे साधतात...
फारच छान ..
छान ब्लॉग आहे तुमचा ...
Post a Comment