इंदुरी गोधडी.
मऊ, मांजरीसारखी.
उबदार, बाबांसारखी.
उलटी घ्या. सुलटी घ्या.
ती उब नाही जायची.
जेव्हा कधी...
आसमंतात थंडी असेल.
गर्दीत उब नसेल...
असं का कोणी नाही...
ज्याची उब नाही जायची...
अगं,
पेटारा उघड.
आठवणींची दोहड उलगड.
उष्ण अश्रूंची लड ओघळून जाईल.
बघ,
ती दोहड सावरून घेईल.
5 comments:
नक्कीच ! त्या डोहाडीमध्ये खूप उब असते अग ! ती आपल्या अश्रूंची पण वाफ करून आपल्याल ती उब मिळवून देते .....!
thanks for explaining it to me. hugss. hope that will add a bit to the oob :)
thanks for explaining it to me. hugss. hope that will add a bit to the oob :)
Love you Vandu. :)
काय म्हणू? आजीची खूप आठवण येतेय गं...
Post a Comment