नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 10 July 2010

चढउतार


आमच्या जिन्याला अकरा पायऱ्या. जसजसा आईबाबांचा हात सुटला तसंसं जिन्यावरून खाली उतरताना, सुरुवातीला एक पायरी चुकवत, हळहळू मी नऊ पायऱ्या एकत्र चुकवण्याचे कौशल्य आत्मसात केले होते. ह्या शिक्षणाला मला वाटतं, मी पाच वर्षांची असताना सुरुवात केली आणि पुढच्या वर्षभरात दहाव्या पायरीवर उभे रहाणे आणि पुढच्या क्षणाला धाडकन खाली जमिनीवर अवतीर्ण होणे जमून गेले. अशोक वृक्षावरून, हनुमानाने सीतेसमोर अचानक मारलेल्या उडीसमान. जिना चढताना मात्र एकदम चौथ्या पायरीवर पाउल ठेवणे फक्त शक्य झाले. पाचव्या पायरीपर्यंत पाय ताणणे काही जमले नाही.

आयुष्याची घसरण बऱ्याचदा वेगातच होते नाही का?
आणि प्रगतीची चढण...कष्टांची...वेळखाऊ.

1 comment:

Dhaval said...

nicee connect :)