"लागली सवय?
लवकर लागली म्हणायची!
मग ती सवय, वाईटच असणार.
कारण वाईट सवयच लवकर लागते म्हणतात."
"हो.
तुझी सवय लागली.
तुझ्याशी गप्पा मारायची सवय लागली.
तुझी वाट बघायची सवय लागली."
"सांगितलं नं!
सवय लागणेच वाईट.
आणि वाईट सवयच लवकर लागते म्हणतात!"
"ठीक आहे.
मोडेन मी ही सवय.
व्यसनांच्या आहारी जाण्याची माझी सवय तर नाहीच आहे.
आणि जगण्याचा आव आणण्याची तर माझी पक्की सवय आहे!"
7 comments:
मस्तच.... खरचं आहे हां हे... कसलीही सवय लागणे हे वाईटच... कारण लागलेली सवय मोडणे कधीही अशक्यच असते. कशी मोडायची ही सवय ?
सवयींचेही व्यसनच. ज्याला जगात लोकं व्यसनं म्हणतात त्याही पेक्षा भयानक सवय म्हणजे " वाट पाहण्याची ’.
" जगण्याचा आव आणण्याची तर माझी पक्की सवय आहे!" ही कशी मोडायची???
पोस्ट मस्तच.
फार छान अनघा ,
छान लिहतेस ... आणि रोज लिह्तेस ते अजुन चांगला ... भविष्यात असले चांगले पोस्ट बघायला आवडतीले |
माझ्या कडून शुभेच्छा !
~ शांतनु पाध्ये , इंदौर
शंतनू,
माझ्या ब्लॉग वर तुझे स्वागत असो.
आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
माझा प्रयत्न नक्की राहील तुझ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी.
पुन्हा भेट दिलीस तर आनंदच वाटेल.
:)
अनघा
मानसी, बऱ्याच दिवसांनी आलीस नं?
आनंद झाला. अशीच येत जा हं.
:)
भागुबाई,
वाईट सवयी मोडायचा प्रयत्न चालू आहे...
पण म्हणतात नं, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही!
:)
तुझी निरीक्षण शक्ती खूप छान आहे ! मनोव्यापारांवर खूप योग्य भाष्य असते तुझे !
not all 'savay' are bad na??? you have a savay of getting up early....being painstakingly meticulous....following u and finishing whatever you started despite all hurdles. Are they bad? i call them your habits coz no matter what comes in way, you will do them. Sometimes they give your heart and head aches but you still do them. And if you don't or are not able to do them, it bothers you. Just like a 'savay would'.
You really feel all habits are bad??
Post a Comment