चला, आज आपण स्थिरचित्रण करू.
बघा, काय ठेवलंय तुमच्यापुढे?
त्या वस्तूकडे तुम्ही, आज निरखून बघा.
त्यावर पडलेला प्रकाश अनुभवा.
चालू असलेला छायाप्रकाशाचा खेळ पहा.
समोर असलेली वस्तू करडी, गडद आहे म्हणता?
मग बरोबर.
खिडकीतून आलेला प्रकाश, त्यावर विशेष नाही खेळणार.
ती तीव्र काटकोनी देखील आहे म्हणता?
नजरेला बोचरी आहे?
मग, तुम्ही त्याचे बदलते रूप पकडा.
त्या करड्या रंगाची आपलीच एक गंमत आहे.
ती गंमत अनुभवा.
चला. सुरु करा.
तुम्हांला कितीदा सांगितलं?
दुखः समोर ठेवून त्याकडे बघायला शिका!
5 comments:
अनघा, बघत बसल्याने त्याची धार बोथट नाही होत :( .
उलट त्या छायाप्रकाशाच्या खेळाने, नजरपण काळोखी होत जाते
नजर बाजूला वळवून इतर वस्तूंकडे बघावे, म्हणजे ती काळोखी दूर होते
( जरी नजर एका कोपऱ्यातून त्याकडे असली तरी )
विश्वामध्ये जे गुणोत्तर प्रकाशाचे आणि अंधाराचे आहे तेवढेच बहूदा माणसाच्या जगात सुखाचे आणि दुःखाचे असेल.
श्रीराज, मला मित्रमंडळी सांगत असतात न...कि दुखः थोडं बाजूला ठेव... त्याचा प्रयत्न करताना हेच डोक्यात आलं! :)
जर दु:ख विसरलो तर सुखाचा आनंद कसा घेता येणार? जो पर्यंत मरण्याच भय वाटत नाही तोपर्यंत जगण्याची किंमत तरी कशी समजणार!
तात्पर्य हे की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा :)
" दु:ख समोर ठेवून त्याकडे बघायला शिका!" माझी आजी - आईची आई नेहमी म्हणे," अगं,तिसाव्या वर्षी विधवा झाले. पदरात ८ पोरं. दु:खाला कवटाळून बसले असते तर तू जन्मालाही आली नसतीस." माझी आई फक्त वर्षाची होती त्यावेळी.:(
जीवन जगण्यासाठी नितांत गरजेचा विचार.बरेचदा अनेक लोक/कधी कधी आपणही कल्पनेतल्या दु:खांना कवटाळून बसतो. त्यापायी आजूबाजूला असलेला उजेड दिसतच नाही.:( दु:खाचा त्रयस्थाच्या नजरेतून आढावा घेता आला पाहिजे... अशाने उपायही चटदिशी सापडतील.
Post a Comment