सरळ. बसकं. फताडं
तरतरीत. चाफेकळी. अपरं.
रडकं.
गळकं.
मुरडणारं.
उडवणारं.
मत मांडणारं.
खिजवणारं.
वर्तुळाकार.
अर्धवर्तुळाकार.
चकाकतं.
शेंबडं. शिंकरणारं.
नाकाबंदी झालेलं.
चोचीसारखं.
उग्र. नाजूक.
फुगरं. धर्मेंद्रासारखं.
दोन भिंगांची घसरगुंडी करणारं.
थरथरतं.
जिवंत.
धारधार.
बाबांचं.
शांतताप्रिय बाबा कापसाचे बोळे कानात घालत असत.
तासंतास पुस्तकांत मान खुपसून बसत.
दोन कापसाचे बोळे...
त्यांच्या सावळ्या नाकात चांगले नाही दिसले.
वस्तू तीच...इंद्रिय वेगळं.
मग तेच नाक हृदयात घुसून राहिलं.
पुढचं आयुष्य पोरकं.
7 comments:
what a visualization you've... अगदी छाताड फोडून हृदय भेदणारं...
एकदम जिवंत चित्रण! जसे काही तू ब्रश हातात घेऊन कॅनवास वर काढतीयस.
आणि अचानक दोन पांढऱ्या रंगाच्या ठिपक्यांनी ते सगळे चित्रच स्तब्द्ध करून टाकलेस!
तुझं ७ दिवस येथे नसणं जाणवलं ...
sundar
ही कविता माझ्या डोक्यातून कधीच जाणार नाही. माझ्या शब्दकोशातले सर्व शब्दं थिटे पडतील, जर मी या कवितेची स्तुति करायला गेलो तर.
तुझ्या लिखाणामुळे तुझ्या वडिलांबद्दल खुपच कुतूहल वाटतं, अनघा...म्हणजे त्यांचं लिखाण कसे असेल वगैरे वगैरे.
श्रीराज,
तुझ्या बाबांबद्द्लच्या प्रश्नाचं उत्तर मी उद्या नक्की देईल.
:)
श्रीराज प्रमाणे मला देखील उत्तर हवं आहे.... देशील का???
Post a Comment