नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 30 July 2010

नायजेला!

'ट्रॅवल अँड लिविंग' वरची नायजेला. आणि टीव्ही समोर भारावून बसलेली माझी मोठ्या मोठ्या डोळ्यांची लेक. ही अतिशय सुंदर दिसणारी, सुंदर केसांची बाई कापत काय होती तर कोंबडी आणि चिरत काय होती तर कांदा! त्यात एव्हढं भारावून बघण्यासारखं काय होतं?!
दुसऱ्या दिवशी....
"अगं, इथे ये. स्टूल घेऊन बस. मी मासे करतेय. जरा बघ मी कसे करते ते!"
"आई!"
" का? अगं, मी पण छानच करते ना स्वयंपाक?"
"हो....पण!"
"अरे! हवं तर मी पण करते न तश्याच हालचाली! माझे केस काही लांब नाहीयेत.. पण मान वेळावून वेळावून तुला दाखवते ना कसे मासे कापायचे, कसे साफ करायचे ते!"
"बरं ग बाई! ओरडू नकोस!"
बाईसाहेब स्टूल घेऊन बसल्या.
नायजेलाचा शो अर्ध्या तासाचा असतो. माझा लांबला. कष्टांनी जमवलेला एकुलता एक प्रेक्षक, शो अर्धवट ठेऊन उठून गेला.

जेवण झाल्यावर...
"अगं, नायजेलाचा शो बघून तुला जेवण करावसं वाटतं आणि माझा शो बघून तशी तुला स्फूर्ती का मिळत नाही?"
"आई, मी नाहीतरी लग्न झाल्यावर दर रविवारी जेवायला तुझ्याचकडे येणार नं?"

घ्या! आता ही माझ्या स्वयंपाकातील नैपुण्याची तारीफ होती की माझा 'फूड शो' फ्लॉप झाला होता?!

21 comments:

Saurabh said...

मा.चि.म. (मासे, चिकन, मटण) अशी मेजवानी होणार असेल तर मी प्रेक्षक म्हणून तयार आहे, अगदी रोज, दोन टाईम... :) :D :P

अनघा said...

अरे सौरभ! येच तू!!नायजेलापेक्षा मस्त जेवण करून घालेन बघ तुला!! :)

Raindrop said...

hello me nahi ka baghitla man laun...kase kartes egg fry??? ani tashech karun majhya navrya la khayla ghatle...now they are his favourite (many a times my saviour when I don't wanna cook a meal :)

mastach kartes tu swaypak...ani atta tar masala queen pan zhali aahes :)

note-sorry about the mistakes but I just wanted to reply in marathi :)

श्रीराज said...

तुझ्या मुलीला प्रेक्षक बनवायचं असेल तर माझ्याकडे एक कल्पना आहे - तु नायजेलाचा मुखवटा चढव ;)

भानस said...

"आई, मी नाहीतरी लग्न झाल्यावर दर रविवारी जेवायला तुझ्याचकडे येणार नं?" हा हा... तुझ्या लेकीची आणि माझी गट्टी. मी लग्न झाल्यानंतर दहा-बारा वर्षे दर शनी व रवीवारी आईकडे जात होते. :D

अनघा said...

वंदू,
अगं, भटीण!
तू अशी मराठीत लिहायचा प्रयत्न करू लागलीस ना कि मला एकदम आनंद होतो!
मराठी वाचायला लागलीस आणि लिहितेयस देखील!
काकांना सांग हं हे! आणि आजीला पण! ते एकदम खूशच होतील माझ्यावर! नाही का?
:)

अनघा said...

श्रीराज,
बघ ना! खरोखर असंच काही तरी केलं पाहिजे मला! तेव्हढाच सुंदर दिसायचा एक प्रयत्न!
:)

अनघा said...

भाग्यश्री,
आज खरंतर मस्त लाल लाल माश्याचं कालवण नाहीतर तिसऱ्या खायचं डोक्यात होतं!
पण एक शूट अटेंड करायचं असल्यामुळे स्वतःला करायला वेळ मिळाला नाही आणि ह्या माझ्या गधडीने, बाहेर जेवायला यायला दमलीय म्हणून नकार दिलाय!!
आणि मला भूक लागलीय!
:(

अनघा said...

सौरभ,
मला न तुझा हा शॉर्टफॉर्म खूपच आवडला! मा.चि.म.!
आणि ह्यातलं एकतरी निदान मला आत्ता खावंसं वाटतंय!!
:D

Saurabh said...

:D :D बास बास, आलोच मी. नायजेला कोण, बाई का बाप्या ते माहित नाही, पण तिच्यापेक्षा तुम्ही नक्कीच रुचकर बनवाल अशी खात्री आहे. आणि मला आमंत्रण देऊन तुम्ही आफतच ओढवून घेतलिये. आता स्वयंपाकघरातून तुमची सुटका नाही. :P

अनघा said...

हो हो! 'आम्ही' जेवण खूप चांगले बनवतो असे 'आमच्या' मित्रमैत्रिणींचे मत आहे!
:D :D
'आम्ही आम्ही. कुत्र्याचे स्वामी!'

sujata said...

Wow maitreyee, Thats like a perfect daughter......
Love u...

Saurabh said...

?!? बाप्पा, शेवटली लाईन झेपली नाय राव!!! उंचीचा फायदा झाला नाही, बाऊंसर गेला (O_O)

अनघा said...

सुजाता, मी दिला माझ्या लेकीला तुझा निरोप! :) अशीच मधून मधून ही माझी पाटी वाचत जा हं.

रोहन चौधरी ... said...

आम्ही सुद्धा 'मा.चि. म.' साठी हजेरी लावू इच्छीतो... :D

Pankaj - भटकंती Unlimited said...

मी एका पायावर तयार आहे तुझा हा शो पहायला. कधी येऊ?

अनघा said...

पंकज, सर्वप्रथम त्रिवार स्वागत! :)
आणि मला आता कळलंच आहे कि मला एक जंगी मांसाहारी भोजन सोहळा करायला हवा आहे! तारीख ठरवली की सांगतेच!! सौरभला आणि भाग्यश्रीला पण विचारायला हवं....ते मायदेशी कधी परतायत म्हणून! :D

संकेत आपटे said...

तुम्ही व्हेजही बनवता का हो? ज्या दिवशी शाकाहारी जेवण बनवणार असाल तेव्हा येतो मी प्रेक्षक म्हणून तुमचा शो बघायला... (म्हणजे मला खाताही ये‍ईल ना. मांसाहारी शो बघायला आलो तर फक्त प्रेक्षकाचीच भूमिका निभावता ये‍ईल... ;-) )

अनघा said...

संकेत, बनवते मी शाकाहारी पण! पण त्यावर एकदम आत्मविश्वासाने प्रेक्षक जमवण्याइतकं नाही! :(

संकेत आपटे said...

श्या... म्हणजे आम्हाला काही चान्स नाही तर

अनघा said...

:) संकेत, ठराविक ( म्हणजे मोजून ३/४ ! ) काही शाकाहारी ठेवू शकते बाबा मी पुढ्यात! ;P