मंगळूर विमानतळावर अपघात झाला. विमान आतल्या माणसांसकट जळून गेलं.
जळलेली शरीरे, जळलेलं सामान, जळलेले अवशेष...जाळताना आग लहानथोर नाही बघत.
दोनतीन वर्षांपुर्वी बाली, इंडोनेशिया मधील बतूर ज्वालामुखीच्या माथ्यावर पोचलो तेंव्हा लाव्हारसाने जाळलेल्या, निसर्गाच्या काळ्या आठवणी बघितल्या होत्या. सरळसोट उभी काळी खोडं, वरून खालपर्यंत पसरलेला काळा डोंगर.
तिथेही आगीनेच रुद्र रूप धारण करून तांडव नृत्य केलं होतं.
इथेही खेळ आगीचाच होता.
परंतु निसर्गाच्या त्या थैमानात, निर्माण दडलेला होता.
ह्या दुर्घटनेत मात्र अंत आणि अंतच.
भाजलेल्या पृथ्वीने तिथे हिरवा रंग धरला होता.
आगीचा इतिहास ते चित्र सांगत होतं तरी देखील त्याचा रंग हिरवागारच होता.
जागोजागी झाडांनी पुन्हा जीव धरला होता. डोंगर पुन्हा हिरवा झाला होता. पोपटी, गडद हिरवा तर कुठे मंद हिरवा. खाली निळी नदी वहात होती. दूर उंच उंच डोंगर ढगात शिरले होते. हिरवंगार जीवन परत एकदा सुरु झालं होतं.
मानवी चूक नाश करून जाते, निर्माण नाही.
का माणसासाठी नसतो तो हिरवा कोंब?
2 comments:
पृथ्वीचे निर्माण हेच विनाशातून झालेले असल्याने कदाचित पृथ्वीवरील निसर्गाने केलेल्या नाशात तिला निर्माण अभिप्रेत आहे .
पण मानव नाश करतो तो विनाशासाठी ! म्हणून कदाचित निसर्ग मानवाला माफ न करता त्याच्या चुकीतून झालेल्या नाशातून निर्मिती होऊ देत नसावा!
धन्यवाद राजू.
Post a Comment