असा कसा एखादा रस्ता असू शकतो जसा एखादा कथासंग्रह. रात्री उघडावा तर करुण रंगीबेरंगी. मिणमिणता. आणि दिवसा लख्ख सूर्यप्रकाशात लाखोंची उलाढाल करणारा. विचित्र हे रूप. म्हणजे कोणी प्रतिभावंत लेखकाने कहाण्या लिहाव्या...मिश्र व्यक्तिचित्र रंगवावीत आणि सरळ एकत्र छापून टाकावी. लेखक गोंधळलेला आणि वाचक भरकटलेला. एक पान रडवेल...तर दुसरं मेंदूला झिणझिण्या आणेल...तर तिसरं किळस येऊन पुस्तक भिरकवायला भाग पाडेल.
ही गल्ली जर बोलायला लागली तर काय बोलेल? तिला स्वत:ला तिचं कोणतं रूप आवडत असेल? दिवसाचं कि रात्रीचं? कुठलं खरं? का असं वाटतं कि ते रात्रीचंच तिचं रूप खरंखुरं? आणि सकाळचं लख्ख प्रकाशातलं ढोंगी? जसं चकचकीत वेष्टनातील म्हणून एखादं चॉकलेट उघडावं आणि त्यातून वळवळणारे किडे हातावर चढावे?
सूर्य इथे भसकन येतो. मग बायका आया बनतात...जेवण करू लागतात...धुणीभांडी करतात. नागड्या उघड्या शेंबड्या मुलांबरोबर हसताना, ओरडताना दिसतात. कधी त्या लेकीच्या वेण्या घालत असतात...तर कधी लेकाला धपाटे घालत अंघोळ घालत असतात. लांबलचक गाडीतून बाजूच्या उंचच उंच इमारतीत शिरणाऱ्या बायका हेच तर घरी करून आलेल्या असतात.
चंद्र वेडा आहे. तो कधी चोरून येतो तर कधी सगळ्यांवर चंदेरी उजेड टाकतो. मग सकाळच्या आया रस्त्यावर उभ्या रहातात. प्रामाणिकपणे धंदा करतात. लांबलचक पुरषी गाड्या आता तिथेही थांबू लागतात. एखादी रस्त्यावर वाट बघत असते...गिऱ्हाइक अजून का आलं नाही...सकाळी पोरांना आता काय खायला घालू ह्याची तिची चिंता, बंद काचेतून थंड हवेत देखील मनाला भिडते. जशी कधी एकदा तो पगार खात्यात जमा होईल अशी मला चातकासारखी आस असते.
त्यादिवशी तिथून जाताना एक सहकारी म्हणाला," आता ही गल्ली अजून develop होईल. अजून मोठ्या मोठ्या कंपन्या येतील. आणि मग ह्या बायका आपोआपच इथून नाहीश्या होतील!" मला का हताश वाटलं? का मनात आलं...आता ह्या, त्यांचं हे ऑफिस कुठे थाटतील? कुठून त्यांच्या हातात आता ते गांधीजींचा फोटो असलेले हिरवे तुकडे येतील?
एकदा नजरानजर झाली. अनोळखी माणसाशी नजरानजर झाली तरी एक स्मित चेहेऱ्यावर झळकावं असा हा नवीन कॉरपोरेट नियम. मग तिच्याशी झालेली नजरभेट आणि हलकंच स्मित माझ्या चेहेऱ्यावर. पण ती लागण तिच्या चेहेरयावर नाही उमटली. आणि मग मला अपराधी करून गेली. कधीकधी असं वाटतं ना कि केलं ते चूक की बरोबर? तसं.
त्या दिवशी उजव्या हाताला मी बघितलं ते काय होतं? सात आठ जणींनी काळोखात फेर धरला होता. आपल्यातच मश्गुल टाळ्या वाजवत गोल गोल फिरत होत्या. आम्ही नाही का नवरात्रीत भोंडला खेळत...तश्याच. काय होते ते? काय गाणे होते ते? ऐलमा पैलमा...गणेश देवा...माझा खेळ मांडिला करीन तुझी सेवा...?
त्या आणि मी. गाडीची बंद काच...आणि थंड हवा. हा भकास दुरावा. जात तर एकच. स्त्री जात.
मधुर भांडारकर+गुलजार+डेविड धवन+हिचकॉक+स्पीलबर्ग = हनुमान गल्ली, लोअर परेल.

18 comments:
मला काय ह्यावर प्रतिक्रिया द्यायची खरंच काही सुचत नाहिये. पण मला अचानक काही सुचलं ते इकडे टाकतोय.
सूर्य मी, चंद्र मी, दिवस जसा तशी रात्र मी...
हस्तक्षेप ना कुणात माझा, नं माझ्यात कधी आले कोणी...
मी उगवतो, मी रहातो, मी पहातो, मी मावळतो...
पृथ्वीवरच्या सर्व बदलांस तरी का सर्वथा जबाबदार मी...
भंगते ती, भिजते ती, उजाडते ती, सजते ती...
फेर धरुनी फिरते ती, स्वतःच सर्वाचे कारण ती....
भविष्य घडवण्या तुच समर्थ, तुजमध्ये ना कधी लुडबुडलो मी...
तुझ्या नशिबाच्या कुंडलीपंचांगांमधे तरी कसा बरे फसलो मी...
सुंदर सौरभ...
@ saurabh --
anagha + 1
आभार राजीव. :)
शेवटची ओळ एकदम खास! :)
धन्यवाद राज. आहे खरी ही गल्ली तशी! :)
anagha tu kai lihishil tyacha kahi name nasto ,i am here after 7 days of gap tu shabdanshi kheltes ka shabd tujashi khelatat he mala kadhich kalle nahi, atyant apratim lihile ahes tu , aplya saglyancha bhavana saglyansamore far sunder ritine pohchavtes. kharach pratekache ayush kiti veg veglya ranganche aste na. thanks u very much for this post
अप्रतिम! विचारांची मांडणी, उजळणी आणि मग त्यांची पोचवण सारेच कसे चपखल व नेमके भिडणारे... आणि मग त्यातून सुरू होणारी विचारांची मालिका...
अनघा, का कोण जाणे सौरभने लिहीलेल्या ओळीतली ही ओळ पुन्हा लिहाविशी वाटतेयं... तुझ्या नशिबाच्या कुंडलीपंचांगांमधे तरी कसा बरे फसलो मी... :)
आभार ग भाग्यश्री. :) आहे खरं सौरभच काव्य प्रभावी...:)
:D सौमित्र, वेळात वेळ काढून वाचतोस ना तू माझ्या पोस्ट?! आभार रे! :)
निःशब्द ! अवचटांच्या पुस्तकांची आठवण आली !
:)
अनघा, तुझे असे लेख वाचल्यावर माझ्या सारख्या दगडालाही खिन्न व्हायला होतं :)
hmmmm
याला जीवन एसे नाव. जगण एक, मार्ग अनेक. एक
काचेचा इकडे, एक पलीकडे. ती एक,ग्राह्क अनेक.ती
पुरुषत्वा चा मान राखते - पण ती जीवन भर--, मी आपला सज्जन!लजास्पद.मला याचा तिरस्कार आहे.
श्री. राम, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
:(
विद्याधर, बऱ्याच गोष्टी अश्या नजरेसमोर येऊन जातात...काही क्षणांसाठी. मग आपण आपल्या वाटेला चालू तर लागतो...पण कुठेतरी मनात ते असं रुतूनच बसतं. :(
Post a Comment