नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 20 December 2010

सिंड्रेला

अँ अँ ssss मला ना आईने कडेवर घेतलंय. मी ना मघापासून आईला सांगतेय आणि ह्या माझ्या आईला काहीच कळत नाहीये!! मी बाळ आहे ना अजून! पण म्हणून काय झालं? आई आहे ना ती माझी? मग तिला कळायला नको मी काय बोलतेय ते!!?? अँ अँ SSSSSS मी का रडतेय? अहो, जरा माझ्या पायाकडे बघा? दिसतोय ना तुम्हांला माझा पाय? हा नाही! मागचा बघा! कुठेय माझा शू?! पुढच्या पायात आहे? आहे ना? मग? मागचा शू कुठेय?? तेच तर मघापासून सांगतेय ना हिला! मघाशीच पडलाय! मी कित्ती तिला पाय मारून सांगितलं! पोटात कित्ती लाथा मारल्या! पण ह्या बाईला ना काही कळतच नाही! आणि ती...आईबरोबर आहे न ती...ती माझी मावशी! तिला तर काहीच कळत नाही! दोघी ना नुसत्या बडबड करत बसतात! मगाशी ना...मी पाय हलवत होते...तिला मी सांगत होते मला खाली ठेव म्हणून! मला त्या दुकानात धावायचं होत ना! इकडे तिकडे! ही बाई ना सारखी मला कडेवरच घेऊन ठेवते! मग मला काहीच करता येत नाही ना! मी अशी धावते ना सगळीकडे? आणि मी ना सगळ्यांशी बोलते...गप्पा पण मारते...पण ही माझी आई ना, काहीच ऐकत नाही माझं! वेडी नुस्ती! म्हणून मी तिला पोटाला पाय मारत होते! तर मग माझा एक शू पडला ना! मी बघत होते त्याच्याकडे! आणि तो पण बघत होता माझ्याकडे! तो पण रडायला लागला मग! माझ्याकडे बघून! पण हिला काहीच कळत नाही! मी कसं उचलून घेणार त्याला? ही मला खाली ठेवेल तर नाsss! म्हणून ह्या दोन बायकांना सांगत होते मी! अँ अँsssss खाली बघा...तिच्या पायात आहेत चपला! मावशीच्या पायात बघा? आहेत! मग माझ्याच पायात का एकंच शूsss? बाबा असता तर त्याला कळलं असतं...मी कशाला ओरडतेय ती!! पण माहित नाही! तो असता तर आई बाबा आणि ही मावशी... गप्पा मारत बसले असते! वेडे नुस्ते! सारखे हसत असतात! तरी नशीब, माझी दुसरी मावशी नाहीये आत्ता आमच्याबरोबर! म्हणजे ना...हे सगळे ना माझ्याच मागे मागे असतात! माझे आई बाबाच नाही नुसते माझे वेडे! माझे आजोबा...माझी आजी...सगळं घर माझ्यामागे धावतं!!! हसताय काय! आता तुम्ही नका आणि हसू!! माझा शू पडलाय न? माझ्या एकाsssच पायात शू आहे! कधी कळणार ह्या बाईला? तसंच नेतायत ह्या मला घरी! वेड्या नुस्त्या!! अँssss

"अगं! अगं, हिचा एक शू कुठे गेला?"
"अय्याsss! कुठे पडला?"
"अगं, तसंच आणलं आपण तिला? कधीपासून फिरवतोय हिला आपण असं?"
"बावळटच आहोत ना आपण! म्हणून ओरडत होती कि काय ही?"

"अय्याssss!! एक दिवस मी तुमच्या बरोबर आले नाही तर काय हा गोंधळ! कशं ग माझं बाळ! पल्ला तुझा शू? आईला आणि ह्या तुझ्या मावशीला ना काsssही कळत नाही!"

व्वा! उगाच बोलतेय हां ही माझी दुसरी मावशी! ती तर अजूनच वेंधळी!
आले! माझे आजी आजोबा पण आले! आता हे सगळे मिळून न...माझे ना लाड करत बसतील!
पण माझा शूऊऊऊऊऊऊऊऊऊऊ? शूऊऊऊऊऊऊऊऊऊऊ कुठेय माझा?

23 comments:

सौरभ said...

हाहाहाहा... कसला ग्वाड पोस्ट आहे हा... पुर्ण वाचेपर्यंत आणि वाचुन झाल्यावरपण एक मोठ्ठं हसू होतं माझ्या चेहऱ्यावर. :) :)

Soumitra said...

hahahahahaha atyant sunder varnan, agdi khare ahe 2 kiva 3 bahini ektra alya ki he honarach bichare bal hahahaha khoop chaaan aajcha divas mast janar thanksssssss

रोहन... said...

बूट पडला ते तुला कळलेच नाही.... हे हे ... :D

Anagha said...

आभार सौरभ! मज्जा! :)

Anagha said...

सौमित्र, काय रे आम्हां गरीब बिचाऱ्या बहिणींना चिडवतोस?! आणि बाळ कसलं बिचारं?! डँबिस आहे ते नुस्तं!! :D आभार रे प्रतिक्रियेबद्दल.

Anagha said...

नाही ना कळलं रोहन! तश्शीच आणली आम्ही सिंड्रेला घरी! :) प्रतिक्रियेबद्दल आभार! :)

Shriraj said...

कसं ग जमतं तुला दुसर्याच्या बुटात जायला!!!! मला तुझा हेवा वाटतो :)

Raindrop said...

cindrella ka boot jise mila wo kahaan hai??? i think the dropping of the shoe was planned by aai....so the prince comes running after ;)

Anagha said...

हेहे! श्रीराज, इथे लेकीच्याच तर बुटात जायचं होतं! :)

Anagha said...

वंदू! :D देख मैं कितनी दूर की सोचती हूँ! :)

Deepak Parulekar said...

सूचना: एका परीच्या एका पायातला सुंदर शू सापडला आहे! ओळख पटवून घेउन जाणे!

Anagha said...

:D दीपक, परीला तुमचा निरोप देण्यात येईल! तिचा शू! तिनेच ओळखावा आणि घेऊन जावा! नाही का?! :)

BinaryBandya™ said...

मस्त झाली आहे पोस्ट

हेरंब said...

शूऊऊऊऊऊऊऊऊऊऊ

शूऊऊऊऊऊऊऊऊऊऊ

शूऊऊऊऊऊऊऊऊऊऊ

शूऊऊऊऊऊऊऊऊऊऊ


कसली क्युट पोस्ट !! :D

Anagha said...

बायनरी बंड्या, आभार! मज्जा जरा! :)

Anagha said...

:D हेरंब, तुमचे पण हे प्रकार चालू असतील ना? कित्ती मज्जा! :)

Deepak Parulekar said...

मालकाशिवाय शू इतर कुणाच्याही हवाली करण्यात येणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.
:)
मंडळ आभारी आहे !

भानस said...

अगं, हे असे पडलेले सिंड्रेला शू गोळा करून विकत बसतो पाहा एक जण टिळक ब्रिजवर...जा घेऊन ये जाऊन त्याच्याकडून. शहाणी माझी बाय ती... :D

Anagha said...

काय गं, मला आणि माझ्या सिंड्रेलाला टिळक ब्रिजवर पाठवतेस?! :( :)

सौरभ said...

हि पोस्ट मला सारखी वाचाविशी वाटत्ये. केवढी मस्त आहे. smiling smiling smiling (^_^)

Anagha said...

:D :D :D

THEPROPHET said...

माझ्या सगळ्या भाच्या चटकन डोळ्यासमोर आल्या :D
बाय द वे, एक विषयांतर पीजे..
सिंड्रेलाचं आवडतं गाणं???
- मला जाऊ द्या ना घरी.. आता वाजले की बारा :P:P

Anagha said...

हेहे!! विद्याधर छानच आहे पीजे!!! :D