नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 21 December 2010

SMS

आजची सकाळ कशी छान आहे...कॉफी एकदम मस्त झालीय...लोकसत्त्तातील अग्रलेख किती सकारात्मक आहे...रेडिओवर किती गाणी छान लागली आहेत...कुंडीतल्या लिलीला किती सुंदर फुलं आली आहेत...कधी नव्हे ते आरसा देखील किती गोड बोलतोय...
म्हणजे कसं, एक नाजुकशी सर येऊन जावी...ढगांतून...सूर्याचे किरण नजाकतीत झेपावे...इंद्रधनुष्य उभारावं...त्यावर हलकेच बसावं...पुढेपुढे सरकावं...अगदी एक्सलेटरवर बसल्यागत...

आणि अकस्मात...
अकस्मात,
टिंग टिंग...
टिंग टिंग...
कोण ते? कुठे ते?
बघा...उचला...मोबाइल उचला....उघडा उघडा...इनबॉक्स उघडा....असा धीर सोडू नका हो! काय? कोणी पाठवलाय भल्या सकाळी तुम्हांला प्रेमभरा एसेमेस? अहो अहो...सांभाळा स्वत:ला...फेकू नका हो मोबाईल! काय झालं? कोणाचा एसेमेस?
हम्म्म्म...सकाळी सकाळी...सत्य! एक कटू सत्य!

रोज सकाळी माझी बँक, बॅलन्सचं सत्य मला एसेमेस द्वारा आणि मग मेलद्वारा सांगत असते.
म्हणजे जसं...
तोच तो खेळ...एक तारखेला जोडायला घ्यावे ते सुरेख इंद्रधनुष्य....
आणि मध्यंतरावरच त्याचा तुकडा पडावा!

कधी...
कधीतरी, असे होईल काय?
सोनेरी आकाशात एकच इंद्रधनुष्य नसेल...
असावे....त्यालाच जोडून दुसरे....त्यालाच जोडून तिसरे...आणि हे असेच पुढे पुढे...

जशी सप्तरंगी लाट....खाली जाईल तेव्हां मला माहित असेल...
खात्रीच असेल तिच्या पुन्हां उभारण्याची....
मग ओहोटीची भीती, कधीच नसेल....
रिकाम्या आकाशाचे स्वप्न, कधीच ना दिसेल...

हम्म्म्म...

17 comments:

Deepak Parulekar said...

Ting Ting, SMS:
Yur Account Has been Credited with Lots of Love, Joy and Happiness Forever!
Thank You For being a Lovely Friend!

Anagha said...

hehe! Deepak! Thanks a ton for 'ALWAYS' being there!! :-)

सौरभ said...

Deepak +1 big thumbs up :-)

Soumitra said...

Anagha would love to see u getting sms/messages for the award of bestseller short story book of all things you have written in past on this blog & all our good wishes are always with you.

Anagha said...

:p आभार सौमित्र!!! असेच रहा पाठीशी!! :)

रोहन... said...

फोनचा वैताग यायला लागला आहे मला हल्ली... :(

Anagha said...

हो ना रोहन?! सकाळी एका तासात पाच एसेमेस आलेत बॅलन्स सांगायला! :(

भानस said...

अगं मी काय दचकले माहितीये का शिर्षक वाचून. लगेच आठवले मी SMS केला तेव्हां तू चांगली जेवून सुस्तावलेली असशील तरीही...

सौमित्र+१... :)

हेरंब said...

>> लोकसत्त्तातील अग्रलेख किती सकारात्मक आहे...

म्हणजे नक्की सुमार केतकरने लिहिलेला नसणार ;)

>> सकाळी एका तासात पाच एसेमेस आलेत बॅलन्स सांगायला!

म्हणजे पाचपट झाला ना तुझा बॅलन्स ?? जबर्‍या !! ;)

Anagha said...

:) बोडकं माझं हेरंब! बँकवाल्यांची डोकी फिरलीयत! जगू देत नाहीत सुखाने! :)

Anagha said...

अगं भाग्यश्री, हापिस नाही का मला?! झोपतेय कसली मी! आभार गं SMS बद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल! :)

Anonymous said...

>>>>>> लोकसत्त्तातील अग्रलेख किती सकारात्मक आहे...

म्हणजे नक्की सुमार केतकरने लिहिलेला नसणार ;)
अगदी अगदी :)

बाकि

>>>Anagha would love to see u getting sms/messages for the award of bestseller short story book of all things you have written in past on this blog & all our good wishes are always with you

मला काही वेगळे लिहावेच लागले नाही :) अगदी असेच हेच मत माझेही :)

Anagha said...

तन्वी, :) आभार गं....खूप खूप!

Shriraj said...

:( Mazi hi tich katha ahe... lagna madhye maza account "twin towers"pramane kosallay :(

Anagha said...

हेहे! चालायचंच श्रीराज! संसाराला जे लागलायत! :)

THEPROPHET said...

अवघड आहे... तू कशावरही पोस्ट लिहू शकतेस अनघाताई.. :)

Anagha said...

:p कठीणच आहे! 'आवरा' झालंय का विद्याधर??
:)