शूssssssss....
.
..म्हणजे कसं छानशी रात्र आहे....
चांदण्यांची...
मंद मंद वारा आहे...
समोर संथ संथ जलाशय आहे...
अगदी चंदेरी....
आणि पौर्णिमा हवी की
कोरीव चंद्रकोर?
असं वाटतंय कि ती अशी हसरी कोर असते ना तशीच हवी काळ्याभोर रेशमी आकाशात.
आणि जुन्या कृष्णधवल
मराठी सिनेमातलं आकाश...
म्हणजे एखादा करडासा तरंगता ढग,
त्या रुपेरी कोरीच्या सोबतीला....
आहे की
नाही सुंदरशी वातावरण निर्मिती?
आणि आहेतच आपल्यासाठी आपले सुधीर फडके,
अरुण दाते,
सुरेश वाडकर,
आशा भोसले...
अगदी मस्त मस्त!
14 comments:
व्वाह!!! अगदी माहोल. सगळ्यात खास म्हणजे "तू तेव्हा तशी".
अनघे, चल पटकन मस्त कॊफी कर. दोघी मिळून तुझ्या गॆलरीत बसू. सगळे दिवे मालवून टाक, चंद्रकोरीचा कळतनकळत झिरपणारा प्रकाश त्यात विरघळणारे सूर ओघळू देत... रात्रतंद्री... मस्त मस्त!
'तू तेव्हा तशी' माझं प्रचंड आवडतं गाणं.. तीनदा ऐकलं आत्ता :)
हेरंबा, मस्त आहे ना?! काय शब्द आहेत! काय संगीत आहे! काय आवाज आहे! व्वा व्वा!! :)
हो ना सौरभ?! मग चला! या पटकन मायदेशी परत!!! :)
कित्ती छान श्री!!!!! मस्त एकदम!!! ये पाहू तू इथे!!! पटकन! :)
:)
काय ग वंदू? ऐकलंस का 'तू तेंव्हा तशी...'? :)
" निवडुंग " त्यातील सर्वच गाणे सुंदर आहेत की जबाब नही !
आणि तू तेंव्हा अशी म्हणजे कळसच................................
फार सुंदर .........
खुप दिवसात ऐकले नव्हते ..
शुक्रतारा........
सखी मंद झाल्या .......
जिवलगा राहिले दूर घर माझे...............
क्या बात है !!!!
कल्पना छान आहे तुमची आणि भानस यांची सुध्दा +++++
तुमचे आभार......आणि सदीच्छा....!
लोभ असावा
समीर पु.नाईक
समीर, आनंद मिळाला ना?! खूप बरं वाटलं! आभार हे कळवल्याबद्दल! :)
yes i listened to the song pan mala kahi kalalach nahi tar ardhyawarach stop kele :)
वंदू, फटके मारते ये इथे! भटीण!!!! :)
:-|
आम्ही नाही ऐकलेलं!!
विद्याधर, तू पण नाही ऐकलेलस 'तू तेव्हा तशी?!' कि अशी कोणी भेटली कि मगच ऐकणार आहेस?! ;)
Post a Comment