नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 31 December 2010

हे की ते?

गंमतच!
"Ana, we all think you are non-emotional!"

माझ्या सुरेखश्या नावाची हे अशी वाट लावतात ही वेगळीच गोष्ट! पण हे non-emotional म्हणजे एकदम भारीच! म्हणजे आम्हांला शाळेत शिशूवर्ग, बालवर्गात निकालपत्र म्हणून एक छानसा हिरवट रंगाचा, बाईंच्या हस्ताक्षरातील कागद मिळत असे. अगदी आता कधी कुठे रद्दीत दडलेला हाताशी लागला तर हृदयाची धरावा आणि डबडबलेल्या डोळ्यांनी वाचावा असा काहीसा...
हळवी भाबडी अनघा...
सगळा तो हिरवा कागद फिरलाच नजरेसमोर...आणि ह्या इथे वातानुकुलीत माझ्या छोट्याश्या चौकानात येऊन माझ्यासमोर अवतरला...

शिकवलं बाबा ह्या आयुष्याने...बरंच काही...अगदी ह्या प्रोफेशनल आयुष्यात जगायलाच शिकवलं!

19 comments:

Raindrop said...

that means u r such a wonderful actress....now oscars door naahi :)

Anagha said...

hmmmm :)

सौरभ said...

hehe... I second the Raindrop's comment... :-P
पुढच्यावेळी कोणी असं म्हटलं की एकदम कानावर हात आकाशाकडे बघत "नही...." असं ओरडायचं आणि मांजराच्या डोळ्यात असतात तसे निरागस भाव डोळ्यात आणत "ये सुननेसे पहले तुम गुंगे क्यो नही हुए?" कळकळीने विचारत मुसमुसायचं.
how emotional!!! I'm touched...

हेरंब said...

हेहे.. मलाही प्रोफेशनल लाईफमध्ये माझ्या नावाची वाट न लावता मला हाक मारणारा/री अजून भेटायचाय :)

Shriraj said...

:)आम्हाला तू भेटतेस ते या ब्लॉगमधून... तुझे लेख वाचून तू 'non -emotional ' वगैरे काही वाटत नाहीस बरं का...

Anagha said...

सौरभ, एकदम बॉलीवूड स्टाईल करू ना?!
:(
:'(
:)
:D
:p

Anagha said...

बघा ना श्रीराज! आता काय बोलणार?! :)
म्हणजे मी हे सोंग इथे हापिसात झकास वठवते असेच म्हणायचे! :)

Anagha said...

'हॅरी', तुझ्या नावाची तर एकदमच वाट लावत असतील तिथे??!! :p

सौरभ said...

बिल्कुल... निरुपमा रॉयला टक्कर देईल असा परफॉर्मन्स द्यायचा एकदम. ;))

Anagha said...

:( शहाण्या निरुपा रॉयच आठवली का तुला?! दुसरी कोणी नाहीच ना आली तुझ्या डोळ्यांसमोर?! :p

BinaryBandya™ said...

त्याला एकदा ब्लॉगची लिंक द्या ...

Anagha said...

हेहे! बंड्या, ह्या अांग्लाळलेल्या ना काय करणार आपले ब्लॉग? :D

रोहन... said...

अनघाजी... कसला कागद आला? मला हल्ली कुठलाही 'रंग' वगैरे ऐकायला आला की एकदम विचित्र विचार सुरू होतात...

तोंड वाकडे करायची सवय असल्याने अ चा अँ आणि ह चा हॅ ..
अनघाची अँना आणि रोहनचा रोहॅन... :D

Yogesh said...

मलाही प्रोफेशनल लाईफमध्ये माझ्या नावाची वाट न लावता मला हाक मारणारा/री अजून भेटायचाय :)+१२३

Anagha said...

'योगी', प्रतिक्रियेबद्दल आभार! :p

Anagha said...

'रोहॅन' का अगदी!! :) आभार रे प्रतिक्रियेबद्दल.

Anonymous said...

खात्रीने सांगू शकते पक्की emotional आहे ही बाई :):)

बाईंच्या हातचा तो हिरवा कागद... सेम पिंच गं... माझ्या बाबांनी जपून ठेवलेत ते सगळे कागद, मलाही दहा मिनिटावर हाताळायला देत नाहित.. त्या त्यांच्या आठवणी नी साठवणी आहेत म्हणतात :)

Anagha said...

:) माझ्याकडे आहेत काही माझ्या धाकट्या बहिणींचे मी जमवलेले. आभार गं प्रतिक्रियेबद्दल. :)

THEPROPHET said...

ह्म्म्म्म्म