नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 29 December 2010

पाटी

पाटी कोरी आहे. सोळाव्या वर्षी आयुष्याच्या पाटीवर काही लिहायला घेतलं होतं.
परंतु पाटी उघड्यावर राहिली आणि अकस्मात आलेल्या जोरदार वादळत सगळी पाटी धुवून निघाली. अगदी कोरी झाली. ह्या घटनेला आता वर्ष होत आलं.
वर्षाच्या सुरुवातीला श्री गणेशाय नम: म्हटलं तर आहे.
पण कधी कधी डोकं रिकामं तर कधी मन रिकामं...आणि मग पाटी रिकामी.
आज पुन्हा पाटी हातात घेतली तर हे असं....
प्रयत्न जारी आहेत....कारण रिकामी पाटी बघितली की मन अजूनच रिकामं. अगदी भकास बिकास...

17 comments:

हेरंब said...

:(

पाटी भरून वाहो या शुभेच्छा !!

Anagha said...

आभार आभार हेरंब!!! :)

Shriraj said...

अनघा, माझ्याही शुभेच्छा तुझ्या 'पाटी'शी :)

Anagha said...

हेहे श्रीराज! हसवलसच तू मला!!!! :D आभार आभार!

सौरभ said...

बाई: बंड्या...
बंड्या: हजर...
बाई: गृहपाठ केलास?
बंड्या: हो बाई. तुम्ही शिकवल्याप्रमाणे पाटीवर आम्ही सरस्वती काढली आहे. आता हि पाटी कधीही कोरी राहणार नाही. चला पुढचे धडे चालू करुयात. :-)

Anagha said...

मला कित्ती आवडते ही सरस्वती!!!!!! एकदम!!!! छानशी पूजाच करुया आपण तिची!!!! म्हणजे मग भरलेलीच राहील नेहेमी!!! हो ना? धन्यवाद सौरभ! :)

Sanjay Kelaskar said...

पाटी आहे ना मग कसल मन रिकाम,डोक रिकाम वगैरे, लिहीत चला भरभरून लिहा ह्याच शुभेच्छा

Raindrop said...

Romans used wooden slate coated with black wax. They scratched to write on them. And to rub it off, they simply heated the slate on fire to smoothen the surface and the wax would be ready to use again.

One such 'agnipariksha' wiped ur slate clean too. But you have diverted all your energies into constructive creativity in the past one year. And unknowingly, this time you chose another pati....your blog. hopefully this pati will just grow stronger under any kind of baptism. Fire or water.

Patli haan amhanna tumchi hi paati :)

Deepak Parulekar said...

अरे हो! खुप दिवसापासुन तुला सांगायचं होतं मलाही तो सरस्वतीचा फोटो खुप आवडतो! आमच्या शाळेत पण सेम अस्साच होता.!!
बाकी तुझी पाटी नेहमीच पटते मला !

Anagha said...

हो न दीपक? आमच्या शाळेत पण आमच्या समोरच्या भिंतीवर हाच फोटो लावलेला असे. धन्यवाद रे प्रतिक्रियेबद्दल.:)

Anagha said...

'Meaning of Real Life'...प्रतिक्रियेबद्दल आभार...

रोहन... said...

आजची तुझी 'पाटी' पटली नाही... :( मी काय म्हणतोय तुला पटले का?

Anagha said...

:) हो. रोहन, भा. पो.

भानस said...

बयो," गया दिन बित गयी रात भी, दोनोंके संग बित गयी पुरानी बात भी " पुरे झाल्या या रिकाम्या पाट्या... कामाला लाग. पुढले धडे वाट पाहत आहेत ना... :)

Anagha said...

हेहे!!! ढ्याटढ्याण!
भाग्यश्री, अभी लिखत है हम! :p

THEPROPHET said...

अशाच पाट्या टाकत राहा :D

Anagha said...

hehe!! That's a good one Vidyadhar! :D