सकाळचे साडे पाच. भला मोठा हॉल. सूर्याची किरण अजून न पोचलेला. म्हणजे तसा अंधारलेलाच. डाव्या हाताला खिडक्यांची रांग. रोजची ठरलेली जागा. अगदी समर्थ व्यायाम मंदिराचा जिना चढताना त्यावरच सर्व लक्ष. जशी काही ती जागा नाही मिळाली तर आसनं नीट होणारच नाहीत! स्वच्छ पंचा अंथरलेला. आणि केली त्यावर आसने सुरु.
पद्मासन...वज्रासन....आणि इतर.
"हं. डावा पाय दुमड. उजवा पाय डाव्या बाजूला टाक आणि वळ. उजवा हात मागे ने. पाठी कमरेवर ठेव."
झालं. इकडचा पाय तिकडे आणि तिकडचा हात इथे. सर्वांगासन झालं. हलासन झालं. भुजंगासन झालं. चक्रासनातले, मस्त हात वर ताणून शरीर मागे फेकून हात भुईला लावून पण झाले. आणि शीर्षासन सुद्धा झालं.
"अहो, सरोज मॅडम. ती मुलगी मुद्दाम कठीण कठीण आसनं करून दाखवते. आम्हांला जळवायाला. तिला सांगा चार पोरं काढ आमच्यासारखी, मग बघुया किती काय अंग वळतंय ते."
दुर्लक्ष...दुर्लक्ष...आपण आपलं ठेवावं आपल्या कुटील आसनांवर लक्ष.
"सरोज मॅडम, माझं शवासन घेता का आज?"
"हं. हो आडवी. तुझं शवासन चांगलं झालं असं कधी म्हणता येईल? तर जेव्हां मी तुझा पायाचा अंगठा उचलायला गेले तर तो मला जड वाटेल...आणि तुला हलकं वाटेल....शरीराची जाणीव विसरून जाशील....हं, चल....हा तुझा पायाचा अंगठा....हा पाय....सोडून द्यायचा आहे.....हा हात सोडून द्यायचा आहे.........सगळं शरीर विसरून जायचं आहे.....हे डोकं....सोडून द्यायचं आहे..........
जाग आली तेव्हा समोरचं घड्याळ सांगत होतं की चांगली पंचवीस मिनिटं उलटून गेलेली आहेत. म्हणजे तेव्हढी एक मस्त डुलकी लागून गेलेली आहे. उठले. पंचा घडी केला. टाकला झोळीत. सरोज मॅडम कुठे आहेत बरं? "मॅडम, मी निघते." "हं. चांगलं झालं न शवासन?" "अं? हो हो!"
वर्षभरात मुंबईत इथे तिथे सदाशिव निंबाळकरसरांबरोबर प्रात्यक्षिकं देऊन झाली. त्यांच्या पुस्तकांत फोटो येऊन झालं.
त्यावर वीस वर्ष उलटवून देखील झाली!
मग आता काय राहिलं काय? सर्वात कठीण आसन!
शवासन! पाय पसरून झोपा...हात विसरा...पाय विसरा...आधी ते डोकं विसरा...म्हणजे शरीर आणि डोकं...डोकं विरहित शरीर...नाही जमलं हे...आजतागायत! डोक्याचा रथ कायम भरधाव. म्हणजे श्रीकृष्ण वाचतोय गीता...अगदी मुक्तीबिक्तीसाठी...आत्मा वेगळं, शरीर वेगळं टाइप. आणि डोकं लागलंय रोजच्या रस्त्याला... आज काय बरं कपडे घालायचे....किती वाजलेत कोण जाणे...उशीर होतोय की काय...मस्टर मिळेल ना.... हेच...तेच ते आमचे रोजचे सामान्य, अतिसामान्य विचार! ...म्हणजे कसं आत्मा तरंगायला हवा...आणि शरीर जड व्हायला हवं...पण...पण मला कसं कळणार ते?...कोणी उचलायला गेलं तर कळेल ना....की शरीर जड झालंय की नाही! म्हणजे जेव्हां आत्मा बाजूला खुर्चीत जाऊन बसेल....आणि शरीराकडे बघेल...कोणीतरी शरीर उचलू पाहिल...आणि ते त्याला जड वाटेल...मग बाजूला बसलेल्या आत्म्याला कळेल की हा! आज कुठे जमलं बुवा हे शवासन! कित्ती वर्ष प्रयत्न करावे लागले!!!
पण हे तर जरा काही वेगळंच वाटतंय नाही का? म्हणजे...संधी फोडला तर शव+ आसन....
छॅ! सक्काळी सक्काळी! कैच्या कै!

17 comments:
सगळ्यात बेस्ट आसन आहे हे. मी किमान १२ तास करतो दिवसातले. :)
आज काय एकदम कैच्याकै... :D मस्त मस्त.. मला पण होती थोडी सवय मध्ये.. पण काहीच नियमित नाही... माझे धावणे नसले तरी उडणे आहेच... :)
सौरभ, हो ना, तू जातोस शवासनात ते जागतिक स्तरावर कळतंच कि आम्हांला...स्टेटस असतं न तुझं...meditating ! :)
रोहन, त्या तुझ्या उडण्याने काय होतंय! उडताना फर्स्ट क्लास शवासन होत असेल फक्त! हो ना? :)
हा हा.. हे असं शवासन (उर्फ निद्रासन) कित्येकदा केलंय मीही ;)
रच्याक, संधी सोडवायची काही गरज नव्हती.. :(
हेरंबा, :p सुटलाच तो!!! :D
छान आहे..शवासन..!
:) आभार सारिका!
पोस्ट एकदम मस्तच !!!! एकाच तर "आसन" आहे...जे करताना मला कधीही कंटाळा येत नाही.
पंकज, आभार...सगळ्यांचंच लाडकं पण कधीच न जमलेलं हे शवासन! :)
and what about all the mental asans that u still do?
hehe!! Vandu, if I stop doing all those mental asanas...I will lose my job for sure! :p
:( अगोदर हसायला आलं पण नंतर नेहमीसारखं अंतर्मुख केलंस
हे काही खरं नाही ना श्रीराज, तुम्ही मला हसवता आणि मी नाहक रडवते ना तुम्हांला??!!!! :(
अनघा, ठीक आहे ग :) रडणं ही गरजेचं असतं ना :D
मला हे आसन रात्री १० ते ६ दररोज आणि सुट्टीच्या दिवशी दुपारीही दोनेक तास करायला आवडतं! :P
वा वा! विद्याधर, आणि आता एक महिना सवयच झाली असेल ना हे आसन दुपारी करण्याची?! :)
Post a Comment