"ते तू त्या दिवशी मला गोष्ट सांगत होतीस न...?"
"कुठली?"
"ती कोण ती बाई....तिला तेव्हां अभ्यास करायचा होता...आणि बायकांना त्या वेळी allow नव्हतं..."
"हा हा!...अगं त्या न्यायमूर्ती रानडेंच्या पत्नी!"
"हा..मग त्यांनी आणि त्यांच्याच सारख्या इतर बायकांनी इतका त्रास करून घेऊन आपल्याला शिक्षण घेणं इतकं सोप्पं करून दिलं...की आता ते कधीतरी खूप कठीण होतं हे सगळं गोष्टीच्या पुस्तकात वाचलं किंवा तू सांगितलंस की कळतं. मग आता आम्ही नीट शिकायचं नाही किंवा शिकलो तर त्याचा समाजाला आणि स्वत:च्या पायावर उभा रहायला जर वापर केला नाही तर मग काय उपयोग?"
"अगं, तू रमाबाई रानड्यांचे कष्ट लक्षात ठेवलेस हे खूपच मोठी गोष्ट!"
"आणि एक तर त्या ज्या बायकांनी इतके त्रास काढले ही बेसिक गोष्ट मिळवायला, त्यांचे आत्मे आम्हांला haunt च करतील ना....!"
"अं?"
"मग काय तर? ते आत्मे म्हणतील आम्ही एव्हढं केलं तुमच्यासाठी आणि तुम्हांला इतकं easily मिळतंय म्हणून त्याचं महत्वच कळत नाहीये!"
"हेहे!"
"आणि दुसरं म्हणजे..."
"काय?"
"दुसरं म्हणजे...मी माझ्या नवऱ्याशी equality वरून भांडूच शकणार नाही! ...मी जर पैसे कमवले नाहीत तर तो मला म्हणेल ना की आधी पैसे कमवून दाखव! मग बोल equality च्या गोष्टी!"
"ह्म्म्म. म्हणजे दोन्ही गोष्टी तुझ्या लक्षात आल्या तर. एक म्हणजे शिक्षणाचं महत्व आणि पैसे कमवण्याचं महत्व!"
"हा!"
"बाई गं, हे तुझ्या वेळीच ध्यानात आलंय बरं का...मला जरा उशिराच कळलंय!"
"हेहे! मी आहेच मुळी तुझ्यापेक्षा हुश्शार!"
13 comments:
एका शतकापूर्वीच्या पिढीचे ऋण, आजच्या स्त्री ने मनात सांभाळले हे कौतुकास्पद वाटले !!
आत्मसन्मानासाठी `आर्थिक स्वावलंबन' अंगिकारणे हि स्त्रीची व काळाची गरज ...!
पण मग स्त्रियांच्या शिक्षणात अडसर असलेल्या पुरुषांकडूनच आता शिक्षित स्त्रीकडून अर्थार्जनाची अपेक्षा केली जाते या मानसिकतेला काय म्हणावे ...?
पुरोगामी का शोषणाचा नवा मार्ग ....?
दांभिक पुरोगामी पणाच्या नावाखाली जास्त भयावह शोषण. आजही स्त्री कितीही शिकली, पैसा कमावला एवढेच काय समाजात नाव कमावले तरीही शोषणाला बळी पडत राहतेच.
दोन दिवसांपूर्वीच कुठेतरी वाचले आमदार पत्नीला आमदार पतीकडून बेदम मारहाण... आणि ही कायम चालतेय... कुठे सुटलाय भोग???
खरं आहे गं भाग्यश्री...पण मला आपला आनंद झाला, लेक एव्हढा विचार करतेय हे बघून! आणि वाटलं की शिक्षणामुळे आपण जागरूक झालो तर कदाचित शोषण रोखू शकू...अशी आपली माझी आशा... :)
आत्मसन्मानासाठी `आर्थिक स्वावलंबन' अंगिकारणे हि स्त्रीची व काळाची गरज ...! राजीव, किती बरोबर आहे हे!
हुश्शार मायलेकींचे हुश्शार संवाद :)
:) हेरंब, मी पांघरलेली आणि लेकीची खरीखुरी हुशारी! धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल. :)
मुलगी शिकली, प्रगति झाली. सबला नारी, सबपे भारी... well, I think पैसे कमावण्यापेक्षा त्याचा योग्य पद्धतिने विनियोग करण्यासाठी अधिक कौशल्य लागतं. म्हणुनच कदाचित तिजोरीच्या चाव्या घरातील स्त्रीश्रेष्ठींकडेच असतात. :)
हा! ते बरिक खरंच हा सौरभ! :)
@ भानस: ह्यावर एक उपाय आहे ... प्रत्येक स्त्रीने व्यायाम सुरु करायला हवा.
अनघा, तुझा हा लेख वाचताना मला काय दिसत होतं माहितेय...तू आणि तुझी लेक बिछान्यावर पडल्या-पडल्या हे सगळं बोलताय आणि मग तू चष्मा सावरत म्हणतेस -
"बाई गं, हे तुझ्या वेळीच ध्यानात आलंय बरं का...मला जरा उशिराच कळलंय!"
हेहे! श्रीराज, तसंच काहीसं! :)
:)
>>हुश्शार मायलेकींचे हुश्शार संवाद :)
+123456789
हेहे!! विद्याधर, हा कुठला फोन नंबर? ;)
Post a Comment