नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 13 December 2010

तपस्या

आमच्या कर्मभूमीतील वॉशरुममधील अगदी ताजी ताजी घटना.

तसं बघायला गेलात तर अगदी मुंबईच्याच भाषेत सांगायचं तर इथे बहुतांशी मुली 'हॉट'च आहेत.
आमच्या ऑफिसमधील एक मुलगी. बायकांच्या वयाबद्दल तसं काही नक्की सांगता येत नाही. अंदाजे २८/२९ असावं. मी वॉशरुममध्ये शिरले तेव्हां बाई बेसिनला एकटं सोडून दाराकडे नुकत्या वळल्या होत्या. माझ्या कानांनी आवाज आधी टिपला आणि डोळे नंतर पोचले. गंगा वाहात होती आणि ही 'शंकरी' निघाली होती.
"Please close the tap, Shanti."
"याsss" एक खोल आवाज काढत 'हॉट' शांती वळली. 'कोल्ड' गंगा बंद झाली. घटना फारशी काही न आवडल्यामुळे माझ्याकडे दुर्लक्ष करत शांती निघून गेली.

पुढे?
पुढे काही नाही हो!
एव्हढंच वाटलं कि अगदी परदेशात MBA केलं म्हणजे माणूस सुशिक्षित होत नाही.
कितीही पैसे घाला. डॉक्टर, इंजिनीयर घडवा. पण म्हणून काही माणूस, सुशिक्षित म्हणण्याच्या लायकीचा होत नाही!

गंगा काहींच्या हाताशी असते! कधी धोधो वाहती, कधी कायम आटलेली. सगळ्यांसाठी ती वाहती रहावी म्हणून ती ताब्यात ठेवणे गरजेचे.

मग मनी प्रश्न असे उभे रहातात की...
आमची शांती, घरची गंगा देखील अशीच वाहती ठेवून आली आहे काय?
आमचे चौहान साहेब, त्यांच्या पॉश केम्स कॉर्नरवरील बंगल्यातील शवरची वाहती गंगा थोपवून आले काय?
आमचे टॉल, डार्क हडसम आशुतोष, सकाळी जेव्हां जिममधून निघाले तेव्हां त्यांनी तेथील वॉशरुममधील गंगा नक्की बंद केली काय?

ना काही सर्टीफिकेट...
फायलीत अडकलेलं.
ना एक हुद्दा...
विझिटिंग कार्डावर छापलेला.


'सुशिक्षित'...
एक गुण.
by default न मिळणारा.
अंगात बाणवून घेतलेला....
तपस्येने.

25 comments:

THEPROPHET said...

आपल्याकडे लोक सुशिक्षित म्हणवतात..पण खर्‍या अर्थाने सुशिक्षित किंवा सुसंस्कृत होत नाहीत :(

सारिका said...

माझ्या समोरच्या झोपडपट्टीतील लोकंसुद्धा जवळचीच पाईपलाइन फोडून दिवसभर पाणी वाया घालवत असतात..सुशिक्षित आणि अडाणी सगळ्यांनीच हा पाण्याचा अपव्यव थांबवला पाहिजे..

Deepak Parulekar said...

तसं बघायला गेलात तर अगदी मुंबईच्याच भाषेत सांगायचं तर इथे बहुतांशी मुली 'हॉट'च आहेत. ++++1

गंगा का वाया घालवतात या 'हॉट' मुली???

Anagha said...

बरोबरच आहे तुझं सारिका. पण असं वाटतं ना कि आपण जेव्हां स्वत:ला सुशिक्षित म्हणवतो, तेव्हा आपल्यावर तर ही जबाबदारी अधिकच येते. :)

Anagha said...

तसंच आहे ते दीपक...सामाजिक जबाबदारी शून्य!

Anagha said...

नुसता सुशिक्षिततेचा आव रे विद्याधर! बाकी जबाबदारीची जाणीव शून्य!

AJ Khare said...

Good one...अगदी परदेशात MBA केलं म्हणजे माणूस सुशिक्षित होत नाही +1

हेरंब said...

आयला असल्या शांत्यांच्या घरी पाणीकपात केली पाहिजे पहिली !!

भानस said...

कोण किती शिकला किंवा एखाद्याला कितीही शिकवले सुसंस्कृत बनवायचा प्रयत्न केला तरी त्याच्या मनाने जोवर स्विकार केला नाही तोवर हे असेच चालणार. बेफिकिरी नेमकी न शिकवताही कशी अंगात भिनते कोण जाणे... :( ( माफी, खूप उशीर केलाय... )

सौरभ said...

शांतीने वाचलं तर वैतागेल... अशांती माजवेल.

Anagha said...

बोडकं तिचं! सौरभ, रोजच्या ऑफिशीयल मेल्स चेक करते का हाच एक प्रश्न आहे! ती माझा मराठीतला ब्लॉग कशाला वाचायला येतेय! ! :p

Anagha said...

'बेफिकिरी नेमकी न शिकवताही कशी अंगात भिनते कोण जाणे...' किती बरोबर आहे तुझं भाग्यश्री! :(

Anagha said...

आभार, खरे साहेब. :)

Anagha said...

हेरंब, तरीहि डोक्यात शिरायचं नाही त्यांच्या!

Gouri said...

अनघा, माझे काही सहकारी. आम्ही परदेशात बरोबर होतो. तिथे रस्त्यात कचरा टाकणार नाहीत, नळ उघडे टाकणार नाहीत, सिग्नल नसताना रस्ता ओलांडणार नाहीत. तिथून मायदेशी परतल्यावर दोन आठवड्याच्या आत त्यांची इथली बेफिकिरी बघून मी थक्क झाले. सुशिक्षितपणा फक्त गोर्‍या साहेबाच्या देशात, तिथे कुणी आपली लाज काढू नये म्हणून राखीव. आपल्या देशात आल्यावर काहीही चालतं!

Anagha said...

गौरी, मला वाटतं, अब्दुल कलामांचं एक भाषण आहे ह्याच विषयाला धरून... नक्की आठवत नाही पण त्यांचंच होतं कि दुसऱ्या कोणाचं...

Shriraj said...

अनघा, जबरदस्त फटका!! म्हणजे अगदी षटकारच म्हणायला हवा... आधी काहीशा विनोदी अंगाने जाणारा आणि नंतर फटकारणारा

Anagha said...

:) आभार श्रीराज.

नीरजा पटवर्धन said...

असं खूप बघायला मिळतं हल्ली मुंबईत. आणि सगळीकडेच.
भाग्यश्रीची कॊमेंट आवडली.

कधीतरी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/ इथेही चक्कर टाका. :)
(आवताण पाठवायला दुसरी जागा माहित नाही म्हणून इथे.)
- नीरजा

Anagha said...

नीरजा, खरं तर एकदा आले होते मी तुझ्या ब्लॉगवर...आणि ठरवलंही होतं कि हे मी नीट वाचेन...पण तसं झालं मात्र नाही! माफी ग! नीट वाचायला हवं ना म्हणून असं झालं. मला ते असं उगाच वरवर नाही ना होत वाचायला! म्हणून मग हे असं होतं! आता वाचतेच गं मी लवकरात लवकर. आवताणाची गरज नाहीये गं! :)

रोहन... said...

ह्यादेशातील सुशिक्षित लोकांना सुसंस्कृत करणे हीच या देशाची खरी गरज आहे... :)

Anagha said...

बरोबर आहे तुझं रोहन, सुशिक्षित आणि सुसंस्कृत ह्यातील तफावत वाढत चाललेली आहे.

Raindrop said...

do u think it would have been different if you'd have said 'hey, i think u left that tap on by mistake' instead of 'please c;ose that tap'...kadhi kadhi hote pan asi chuk na?

Anagha said...

वंदू, वाहता नळ नीट बंद करणे ही एक अंगवळणी पडलेली सवय आहे. म्हणजेच डोळे आणि कान ही दोन्ही इंद्रिये जबाबदारी टाळत असतील तर कोणीतरी अश्याच शब्दांत जाणीव करून देण्याची आता गरज आहे. आणि जर का ते चुकून घडलेलं असतं तर मॅडम 'सॉरी' म्हणाल्या असत्या...पण तसे झालेले नाही...:)

Raindrop said...

right :)