"मला नाही लागत भांडी घासायला. माझी लेक घासते नाहीतर खरकटी भांडी ती डिश वॉशरला लावते."
हा संवाद दोन वयस्क स्त्रियांमधील. अमेरिकेतील एका संगीत कार्यक्रमात त्यांची प्रथमच भेट झालेली होती. आयुष्यात पुन्हा भेटण्याचा योग काही येणार नव्हता. त्यामुळे मनीचे गूज सांगण्यात काही धोका नव्हता.
दोघींची वये बघता आयुष्यातील वादळे त्यांनी झेललेली असावीत. तशी ती कोणालाच टाळता येत नाहीत. थोड्या फार फरकाने कधी चक्रीवादळे असतात तर कधी एखादा वाऱ्याचा झपाटा. आज आता आपल्या मुलांकडे, नातवंडाचे दर्शन म्हणून वा केवळ विश्रांती म्हणून हे आईवडील परदेशात पोचलेले असतात. हा संवाद विचारात घेता नक्कीच त्या त्या महिलेच्या अनुभवातून ही वाक्ये त्या त्या महिलेने बोलली असावीत. त्यातील ज्या बाईला त्यांची मुलगी भांडी घासायला देत नाही त्यांना मी ओळखते. परंतु ज्यांच्या अंगावर हे काम पडते त्यांना नाही ओळखत. व आयुष्यात कधी ओळख होण्याची शक्यता शून्य. त्यामुळे त्या कोणाकडे रहात होत्या, सुनेकडे की मुलीकडे हे समजणे कठीण.
आता डॉक्टर बाईंच्या मनात डोकावू. तिथे काय घालमेल चालू आहे?
मी एव्हढी डॉक्टर आहे तरी उतारवयात मला भांडी घासायला लागतात.
माझी सून मुद्दाम माझा अवमान करण्यासाठी मला हे काम देते. (किंवा) माझी मुलगी स्वत: टीव्ही बघत बसते आणि जावईबापुंसमोर मला भांडी घासायला लावते!
मी आता म्हातारी झाले. आणि म्हणून मला ही कामे झेपत नाहीत.
भारतामध्ये अनादिकालापासून वर्णभेद केले गेले आहेत. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्यानुसार कामांचे वाटप झाले. आणि मग शूद्र, उच्चवर्णीय लोकांकडे मजुरीची कामे करू लागले. सुदैवी असतील तर त्याचे त्यांना श्रम मूल्य मिळू लागले. मात्र सध्या बऱ्याच प्रमाणात, निदान शहरात तरी, मुलींना त्यांचा शिक्षणाचा हक्क मिळाला आहे व लादले गेलेले जातीचे बंधन थोड्या प्रमाणात तरी शिथिल झाले आहे. इथे भारतातील शहरांबद्दल बोलले जात आहे हे लक्षात घ्यायला हवे. दुर्दैवाने हे चित्र काही माझ्या संपूर्ण देशाचे नाही. मग आता ह्या शिकल्यासवरलेल्या मुली घरकामाला कुठून येणार? देशाच्या ह्या प्रगतीविषयी आनंद मानायचा कि दु:ख हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून.
तसेच परदेशी, अमेरिकेसारख्या देशात तर रोजच्या ह्या धुणीभांडी, केरलादी करणाऱ्या बाया मिळणे म्हणजे तर अगदी दुरपास्तच. अगदी अफाट पसरलेल्या समुद्रात एखादी काडी. तिथे एखाद्या बलाढ्य कंपनीचा अध्यक्ष देखील कधी घरात भांडी घासताना किंवा कधी मुलांचे लंगोट बदलताना हातोहात सापडू शकतो. आणि त्यात तो कोणावर उपकार करत आहे अशी भावना शक्यतो नसते. अर्थात ideal situation मध्ये.
मग आपल्या डॉक्टर बाईंच्या प्रश्र्नाला उत्तर काय? त्यांच्या उच्च शिक्षणामुळे त्यांच्या विचारात काय प्रगल्भता येण्याची गरज आहे?
एक. मी डॉक्टर असले तरी देखील मला झेपत असल्याने, माझ्या मुलीला / सुनेला मदत म्हणून मी जर 'हे काम' केले तर त्यात कमीपणा काहीही नाही.
दोन. माझी सून / मुलगी मुद्दाम माझा अवमान करण्याकरता मला हे 'हीन दर्जाचे काम' देत आहे असे मानणे हे चुकीचे.
अर्थात बाई पूर्ण अनोळखी असल्याकारणाने काही गोष्टी येथे गृहीत धरलेल्या आहेत. उदाहरणार्थ, बाईंची मुलगी/ सून ही सज्जन माणसे आहेत. बाई इतर वेळी अतिशय मदतशील व हसतमुख आहेत.
७५ वर्षांची व आयुष्यभर स्वकमाईवर जगणारी एक भारतीय महिला अभिमानाने माझी लेक मला 'हे काम' देत नाही हे सांगताना, हे काम हीन दर्जाचेच आहे असे मानते.
'हिणकस काम' मला दिले जाते ही अतिशय क्लेशकारी गोष्ट आहे असे मानून दुसरी भारतीय महिला समवयीन बाईबरोबर दु:ख वाटून घेते.
आपली मानसिकता बदलायला हवी.
श्रमाचे मूल्य आपण कबूल करायला हवे.
श्रम करणाऱ्याचा स्वाभिमान राखला जायला हवा.
आपल्या, आपल्या मुलांच्या व आपल्या प्रगतीशील देशाच्या भवितव्यासाठी.
म्हणून हा उहापोह.

12 comments:
dignity of labour halu hali india madhe vadhayala lagli aahe....especially in the metros where there is a dearth of house maids/keeprs. but in smaller towns and where domestic help is easily available even 'bathing your own child' is considered beneath one's status.
the only solution is to set an example in our own house by doing your work once in a while.
thought provoking post anagha....and so true.
वंदू, देशात सुधारणा तर व्हायला हवी! आणि ही सुधारणा म्हणजे फक्त सुबत्ता नव्हे. तर त्या बरोबरच वैचारिक प्रगल्भता देखील यावयास हवी. ही काळाची गरज आहे, असे मला वाटते.
uuhhmmm heavy duty marathi bowling kar diya...sabhi kuch oopar se gaya...abhi fone pe simpullly kya bola wo bata dena :)
हम्म पटलं.. पण त्या बाईंना ते काम न आवडण्याचं एक कारण ते काम हीन वाटण्यापेक्षा भांडी घासण्याचा कंटाळा येत असेल हेही असेल.. नाही?
रच्याक... भांडी घासणे, इस्त्री करणे वगैरे वगैरे कामं प्रचंड कंटाळवाणी असतात ब्वा..
Vandu, I hope over the phone I could explain all that gyan I gave in my first comment! :)
हेरंब, डॉक्टरीणबाईंच्या वाक्यरचनेवरून तरी वाटलं नाही की हा फक्त आळशीपणा आहे! आणि ही कामं कंटाळवाणी आहेत म्हणून पुरुषमंडळी टाळू तरी शकतात! नाही का? ;)
बेसिकली...
आर्ग्युमेंट बर्याच आयडियल ऍझम्प्शन्सवर आधारित आहे, तत्कारणात मी मत मांडत नाही...
पण श्रमाचं मोल हा मुद्दा मात्र पटला आणि पूर्णतः मान्य...कुठलंही काम हीन नाही..पण..
घरकाम करायला बोर होतं फार... :-S
>> ही कामं कंटाळवाणी आहेत म्हणून पुरुषमंडळी टाळू तरी शकतात! नाही का?
गलत जवाब.. मेरे हाथोंके धब्बोंकी जुबां-ए-बयानी सुनो. ;)
विद्याधर, म्हणूनच फक्त त्यातून तेव्हढाच 'cut' घेतला. वर्षानुवर्ष ही आपली मानसिकता बनलेली आहे. Slow poisoning सारखं.
एक मित्राच्या हाताला घरकाम करून अगदी घट्टे पडलेत! आणि एक मित्र घरकामाला बोअर होतोय?! ;)
हेरंब, अमेरिकेन product आहे ना 'Jergens'! फासायला सुरूवात कर पाहू! उगाच कारणं देऊ नकोस! ;)
मी डॉक्टरीण बाईंचे समर्थन करतो. त्यांनी भांडी घासू नयेत. उगीच भांड्यांच्या साबणाच्या ऐवजी डेटॉल वापरलं तर घरातले सगळे सलाईनवर जातील... म्हणा डॉक्टर घरचाच असेल. :-P
>> ही कामं कंटाळवाणी आहेत म्हणून पुरुषमंडळी टाळू तरी शकतात! नाही का?
नाय नो नेव्हर... अमान्य अमान्य अमान्य...
बाकी, कामाच्या बाबतीत वैचारीक प्रगल्भता मुद्दा १००% योग्य/मान्य/सहमत. समर्थन... अनुमोदन... चिकन... मटन... बटन...
गेल्या अकरा वर्षांनी बरच काही शिकवलं गं बाई मला... :D
इथलं जाऊ दे पण आपल्याकडेही बरेचदा मला वाटे घरच्या सगळ्यांना आपल्या स्पर्शाची गरज असतेच... मग ती भांडी असोत नाहीतर फरशी... श्रम स्वत: केले ना की त्यांचे मोल व ज्यांच्यामुळे ते करावे लागले त्यांचीही किंमत कळते.. :)
मात्र स्त्री-पुरूष भेदाभेद यातील कंटाळवाण्याला लागूच होत नाही... माझी नंबर एक शत्रू- इस्त्री आहे. :))
Post a Comment