आपल्याला न ही मोठी माणसं बऱ्याचदा चुकीचच शिकवतात!
'माझं तुझं करू नये.' आठवतंय न हे ऐकलेलं?
मग आता त्याचीच सवय झालीय न मनाला!
म्हणजे बघा, गाडी चालवत असताना सिग्नलपाशी झीब्रा क्रोसिंग ही कसं माझंच वाटतं आणि तो लाल सिग्नलही कसा माझाच वाटतो.
मस्त रस्ताही माझाच कचऱ्याचा डबा वाटतो.
आणि तोंडातली पानाची लाल पिंक भिंतीवर थुंकताना रस्त्यावरची ती भिंतही माझीच असते!
आणि अगदी छोट्यात छोटी गोष्ट म्हणजे ऑफिस मध्ये हातातला कॉफीचा रिकामा मग मागे सोडताना शेजारच्या सहकाऱ्याचं टेबल देखील कसं माझंच वाटतं!
असं झालंय बघा माझं!
मग म्हणायचं हे अतिक्रमण होतंय!
कोणाची चुकी आहे ह्यात?
चुकीची शिकवण!
दुसरं काय?!
3 comments:
मोजक्या शब्दांत अचूकपणे मुद्दा मांडता तुम्ही.
धन्यवाद संकेत! मला असं वाटतं कि कमी शब्दात सांगितलं ना कि मुद्दा समजवून घ्यायला सोप्प जातं! :)
Agree with Sanket
Post a Comment