माझं पुस्तक किती पानांचं असेल?
५०, ६०, ७५, ८० की १००?
कदाचित वाचता वाचता अचानक पुढे पानंच नसतील....
मग मी नीट लिहितेय का हे माझं आयुष्याचं पुस्तक?
एक एक पान...खरडतेय? कि लिहितेय?
काही खुणा ठेवतेय?
प्रत्येकाला जन्म घेताना एक काम दिलेलं असतं.
मी जन्म घेताना मला जे काम दिलं गेलं असेल ते मी सुरु तरी केलंय का?
की आजपर्यंत मी नुसतीच लांबण लावलीय?
मुद्याला अजून हातच घातलेला नाही?
2 comments:
सुंदर!
प्रस्तावना कधी संपणार ... मुख्य विषय कुठे सुरू होणार ... आणि पुस्तक किती पानांचं - तिन्ही अस्वस्थ करणारे प्रश्न.
chala aata pustak lihayla suruwat kara! :)
Post a Comment