देव आपली काळजी नेहेमीच घेतो.
त्या त्या वेळी नाही कळत.
आपण प्रत्येक वेळी हट्ट करतो, रडतो....
पण तो त्याला जे त्यावेळी योग्य वाटतं तेव्हढंच देतो.
आपण मग असमाधानी होतो.
त्रास करून घेऊन स्वतःची शक्ती आणि वेळ वाया घालवतो.
परंतु पुढे चालून आल्यावर, मागे वळून बघितलं की मात्र हेच जाणवतं की तोच बरोबर होता. आपल्या त्या मागणीत आपलं भलं कधीच नव्हतं!
बरोबरच आहे.
तो वर बसलाय नं! त्याला aerial view दिसतो!
आपल्याला फक्त समोरचं तेव्हढच, छोटं छोटं चित्रं दिसतं; परंतु त्याला मात्र दूरदूरचं!
google earth च्याही वरून!
3 comments:
Khup chahan...Mastach!!
आपल्याला फक्त समोरचं तेव्हढच, छोटं छोटं चित्रं दिसतं; परंतु त्याला मात्र दूरदूरचं!
google earth च्याही वरून..
>>>> :D मस्त.. आवडले... :)
आपल्याला फक्त समोरचं तेव्हढच, छोटं छोटं चित्रं दिसतं; परंतु त्याला मात्र दूरदूरचं!
google earth च्याही वरून!
ही पोस्ट माझ्याकडून वाचायची राहून गेली होती ..
श्रीराज कडून मिळाली लिंक ..
छान लिहलंय
Post a Comment