नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 28 April 2010

डोस विषाचा

असंभव, कुंकू, अग्निहोत्र, अवघाची संसार, कुलवधू, अनुबंध....
सगळी संध्याकाळ ह्या मालिकांचा म्हणजेच त्या त्या कुटुंबाच्या समस्यांचा पाठपुरावा करण्यात घालवणे म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा अपमान करण्यासारखेच आहे.
एकंदर ह्या मालिका थोड्या फार बघून माझ्या एक लक्षात आले की गेला बाजार ह्या मालिकांमध्ये एखाददुसरे चांगले, सभ्य व्यक्तिमत्व असते आणि दुष्ट माणसांचे पेवच फुटलेले असते. मग त्या बिचाऱ्या चांगल्या माणसाचे एकंदर आयुष्य कसे खूपच खडतर आहे हे आपण रोज बघायचे. ह्या सगळ्यातून होते काय की चांगले वागले तर आयुष्यात खूपच त्रास आहे, यश मिळवण्यात खूपच कालावधी जाऊ शकतो आणि वाईट वागलो तर पटापट यश मिळते अशी एक समजूत होऊ शकते.
उगाच झगडत बसण्यापेक्षा वाईट मार्गातून जर यश म्हणजेच पैसा पटकन मिळत असेल तर कश्याला डोक्याला ताप करून घ्या? नाही का?
रोज हातोडीने खिळा ठोकून एखादी चित्राची चौकट भिंतीत पक्की घुसवावी तसंच ही संकल्पना आम जनतेच्या मनात बिंबवायचे काम ह्या मालिका रोज करत असतात.
माझी बहिण म्हणते तेच खरं. ह्या मालिकांमुळे हल्ली कौटुंबिक कलहाचे प्रमाण वाढीस लागलेय!
कपट कारस्थान हा दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक होऊ बघतोय.
ह्या मालिकांसारखाच.

1 comment:

Pankaj - भटकंती Unlimited said...

शिवाय सगळ्या मालिका एखाद्या परदेशी माणसाने भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने पाहिल्या तर त्याचा काय समज होईल?
> भारतीय बायकांना काहीच काम नसते. फक्त दिवसभर भारी चमचम साड्या नेसायच्या आणि कट-कारस्थाने रचायची.