नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 21 October 2010

एक होता ससा

हातात चिमुकला हात. सकाळचे सव्वा सात आणि पंधरा मिनिटांचा रस्ता. दोन शिंग डोक्याला, इस्त्रीचा गणवेश, काळे बूट... हा आहे पाच वर्षांचा बडबड्या ससा. आता तो निघाला आहे शाळेत. उड्या मारत जिने उतरावे आणि रस्त्याला लागावं.

इतक्या सकाळी सिग्नल तर बंद. मग अगदी जपून रस्ता ओलांडावा, आईवर विसंबून. मग लागावा फुटपाथ. टुणकन उडी मारून चढावा. जसं काही नीट पाऊल उचलून टाकलं तर त्या फुटपाथाला वाईटच वाटेल. परत टुणूक टुणूक. आईला अगदी प्रश्र्न पडावा, मी सश्याला का शाळेत सोडतेय? मग दूर दिसू लागतं वडाच झाड. पारंब्या, जश्या वाढलेली दाढी. ससा मग दुरूनच, "आले मी! वडकाका, कसे आहात तुम्ही? आणि आता मला दोन दिवस सुट्टी हां. शनिवार रविवार आहे ना! वाट नका बघू माझी!" वडकाका ह्या सश्याची वाट बघतच असायचे. मग थोडे खट्टू व्हायचे. पण तरी, पानं हलवायचे, तरंगत्या कोवळ्या पारंब्यांनी, अगदी निरोप पण घ्यायचे. मग पुढे पेट्रोल पंपवाले काका. सश्याचा एक टाटा त्यांना. आली आता गणपतीची गल्ली. तेंव्हा तिथे गणपती त्याच्या देवळात रहायचा. आता त्या अजस्त्र मंदिरात राजकारणी रहातात. "बाप्पा. टाटा!" ससा टुणूक टुणूक.

दुरून लागली दिसायला सश्याची शाळा. आता मात्र त्याच्या उड्या थांबल्या. ससा चिमुकल्या पावलांनी चालू लागला. पुढच्या मिनिटाला ससा आणि सश्याची आई शाळेच्या दारात उभे. आणि काय म्हणावं? गेली पंधरा मिनिटं उड्या मारणारा ससा, आईचं बोट घट्ट धरून. डोळे डबडबलेले!

"पिल्लू, जा आता."
"तू येशील ना घ्यायला आई?"
"हो तर! मी येणार नाही असं होईल का पिल्लू?" आईचे डोळे पण डबडबलेले.

आता ससा उड्या नाही मारत. शाळेच्या भल्या मोठ्या द्वारातून आत शिरतो. पुन्हा पुन्हा वळून आईकडे बघतो. इमारतीत शिरण्याआधी वळून अजून तिथेच उभ्या असलेल्या आईकडे बघतो. सश्याचा चिमुकला हात आईला टाटा करतो.
परतीचा रस्ता...एकट्या आईला जड.

ससा दुसरीत गेला...ससा तिसरीत गेला...तरी ह्यांचे डोळे डबडबलेलेच!

सकाळचे सव्वा सात ते साडे सात....
हा रिवाज...
ससा आणि त्याच्या आईच्या आयुष्यातला.

35 comments:

Raindrop said...

awwwwwww :) kitti god....such a sweet capture of sasa's metro life :)

Anagha said...

वंदू, अजून डोळ्यासमोरून हलत नाही, तो गणवेषातील ससा!

Soumitra said...

tu na ugach JWT madhe ahes, You should start writing agdi swachandpane , nehmi lihites tashi, very very sweet story , Keep writing hats off to you & your imagination.

Anagha said...

सौमित्र, आठवली ना तुला तुझी छोटुशी लेक? :)

rajiv said...

अनघा, तू पण न...., चित्रातला एकही बारकावा शिल्लक ठेवत नाहीस, शब्दांत उतरवताना .
वड्काका= "पानं हलवायचे, तरंगत्या कोवळ्या पारंब्यांनी, अगदी निरोप पण घ्यायचे."
खूप छान. वाचता वाचता .. आम्ही पण सशाची शाळेतून येण्याची वाट बघयला लागलो..:)

Gouri said...

खरंच, सश्याला शाळेत सोडायलाच हवं का आईला?
तिला परतीचा रस्ता केवढा जड जातो ते अगदी डोळ्यापुढे दिसतंय. शब्दात जादू आहे तुझ्या अनघा.

Anagha said...

गौरी! धन्यवाद! खरं तर काय गं, ३/४ तासांची शाळा! आणि तरी हे असं! :)

Shriraj said...

मग हा ससा 'आसवांशी' पैज लावायला केव्हा शिकला??? :)

Anagha said...

hehe श्रीराज, जवळजवळ पाचवीपर्यंत चाललं हे सश्याचं! :)

Anagha said...

धन्यवाद राजीव! :)

रोहन... said...

मस्त गं अनघा... :) आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात येणारे हे क्षण.. तू किती अलगदपणे टिपले आहेस.. :)

Anagha said...

रोहन, तुमचे ससे यायचेत नाही का अजून? ;)

Pankaj - भटकंती Unlimited said...

का असा असा हा शब्दच्छल? अगदी निशःब्द करणारा. पुढल्या आयुष्याच्या वास्तवाची जाणीव करुन देणारा. तरीही खूप आवडलंय.

Anagha said...

पंकज, येतील येतील तुमचे पण ससे येतील! मग बघू किती शब्द फुटतात! :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

आमच्याकडे कसलं आलंय एवढे सुंदर शब्दभांडार? आम्ही आपले फक्त भटकायला शिकवणार, रांगडेपणाने. ससा वगैरे बापजन्मात कधी सुचणार नाही.

Anagha said...

म्हणजे मस्त मस्त! रानोमाळ ससेच ससे! :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

ससे नाही, बछडे- वाघाचे बछडे.

Anagha said...

बरं बाबा! वाघाचे बछडे, सिंहाचे छावे, हत्तीची पिल्लं इत्यादी इत्यादी! :D

THEPROPHET said...

लय भारी!

Anagha said...

धन्यवाद विद्याधर! :)

BinaryBandya™ said...

अप्रतिम लिहिले आहेस ...
ससा डोळ्यासमोर अगदी उभा राहिला ..

Anagha said...

धन्यवाद रे बायनरी बंड्या! :)

सौरभ said...

हाहा... मज्जा मज्जा... इवलासा टिवल्याबावल्या करणारा ससा, एकदम खासा... माव्याच्या मऊ बर्फीसारखा. लई ग्वाड लई ग्वाड. :D :D :D

Anagha said...

:) सौरभ, धन्यवाद!

Deepak said...

खूप खूप छान !!! खूप आवडलं, अगदी लहान झाल्यासारखं वाटलं... धन्यवाद...

Anagha said...

दीपक, आभार! :)

अपर्णा said...

किती छान लिहितेस ग तू....एकाच दिवसात सगळ्या पोस्ट वाचयच्या का??

ह्म्म्म...आज ससा माझ्याबरोबर गेला समोर बाबाची पण गाडी होती पण त्याला वेळ नव्हता आणि आमच्या गाडीने वळण घेतल्याबरोबर त्या डब्ब्या पाण्याने भरल्या.....त्या आणि सोडेपर्यंत तश्याच.....आणि आई परत येताना तशीच.....अगदी पहिल्यांदी त्याला सोडताना विचारात पडली होती...तशीच.....सरावाने वळणं सिग्नल घेत......:(

Anagha said...

अपर्णा, अजून ती घालमेल ताजी आहे मनात! मग 'कन्या सासुरासी जाये' तेव्हा काय होणार माझं? :)

Anagha said...

आणि अपर्णा, धन्यवाद गं! काल गडबडीत राहूनच गेलं म्हणायचं! :)

अपर्णा said...

aga dhanywaad kay...post tujhi aahe..

ani mulgi hawi mhanun rusanaar majha man hya eka karnasathi jaude aaplyala mulgi nahi te bar aahe asa mhanata....
pan tula mahit aahe ka mulga aso ki mulgi ghaalmel tich....
bagh mi kadhi tari lihila hota...wel milala tar waach...
(BTW mi sarak ekeriwar aale aahe tujhyashi..hope ki u r ok..)

http://majhiyamana.blogspot.com/2010/02/blog-post_19.html

Anagha said...

अपर्णा, मैत्रीण झालीयस ना? मग 'अहो अनघा' कसं म्हणणार आहेस बाई? :)

हेरंब said...

अप्रतिम.. कसलं सुंदर लिहिलं आहेस !! सश्याच्या आईची घालमेल इथपर्यंत जाणवली..

अशाच एका सश्याच्या बापाने सश्याच्या आईच्या भाषेत त्याच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या होत्या.. त्या वाच जमलं तर.. http://www.harkatnay.com/2010/05/blog-post_26.html

Anagha said...

धन्यवाद हेरंब. :)

संकेत आपटे said...

छान, सुंदर, मस्त

Anagha said...

आभार संकेत! :)