नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 20 October 2010

धडाम धाड...

धाड धडाम.....धडाड...खाड खाड...
आता मध्यरात्री ही बाई काय करतेय? स्वतः झोपत नाही आणि दुसऱ्याला स्वस्थ झोपून देत नाही! तिला काही ऑफिस नाहीये उद्या! पण मला आहे ना!
धाsssss ड!
पडलं वाटतं कपाट!
धाड धडाम.....
पहाटे उठायचंय, सगळी कामं आटपायचीयत आणि तेव्हां कुठे ते मस्टर मला दिसणार आहे!
धाड धाड!
हिला काय म्हातारीला?! वैताग नुसता!
फ्र्र्ररर्र्र्र! स्र्रर्र्र्रर्र्र्र!
कपाट आताच हिला सरकवायला हवंय का? सकाळी नाही का होणारेय हे काम?

शेवटी एकदाचे उघडले मी डोळे! ऑक्टोबर, हा काय पावसाचा महिना आहे?
ढगांचा गडगडाट! विजांचा कडकडाट!
परत एक वीज येऊन चमकून गेली आणि घड्याळ दिसलं.
एक वाजला होता.
झोपेचं खोबरं.
आता पुन्हा कधी लागेल कोण जाणे.

सकाळी दाराची घंटी वाजली.
वॉचमनकाका दारात उभे. हातात नोटीस.
वाचली तेंव्हा कळलं....
दोन दिवसांपूर्वीच आजींना हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं...आणि मध्यरात्री त्या देवाघरी निघून गेल्या होत्या.
सही करून कागद काकांना परत केला. गुपचूप कॉफीचा मग आणि ताज्या वर्तमानपत्रांचा गठ्ठा हातात घेऊन खिडकीपाशी जाऊन बसले. गरम कॉफीचा घोट घेतला...

आजी जेव्हा दूरवरच्या प्रवासाला निघाल्या होत्या, तेव्हां, अज्ञानाने का होईना, त्यांनाच मी बोल लावले होते!

10 comments:

Raindrop said...

aajibai bye bye bollyat tula zataana ani tu tyannach bol lavales??????

Anagha said...

hehe!! Vandu! :)

Shriraj said...

Aaj Vandana ani tuzya post-cha vishay sarkhach hota :(

Anagha said...

Shriraj, tichi mani mau chi post ka re??

Anagha said...

विद्याधर, मीही :-| झालेले!

सौरभ said...

आजींच कडाक्यात i mean गडाड्यात... sorry धडाक्यात स्वागत झालं म्हणजे देवाघरी. आज्जी जेथे आहेत तेथे नक्किच खुश असतिल. RIP आज्जी. :)

Soumitra said...

apratim, what you see & what you hear can't always be a reality. There is always an option open for something else in life.keep writing.Regards
Soumitra
P.S Was too busy with shoots past 3 days.

Shriraj said...

Ho, Vandana-chya mau-chi :(

Anagha said...

हो हो सौरभ! नक्की! त्या ना बिचाऱ्या वृध्दत्वाने थोड्या वेडसर झाल्या होत्या...त्यामुळे तिथे आता अगदी मजेत असतील! :)

Anagha said...

kharach Saumitra...ashi gafalat baryachada hote!