एक दिवस, गाडीच्या उघड्या खिडकीतून तिने, हात बाहेर काढले आणि हलवायला सुरुवात केली...जसं काही गाडीतून कोणी गोरी बाहेरच्यांना हातच करतेय. तेव्हढ्यात शिटी वाजली. मी डोकं बाहेर काढलं...मागून पोलिसांची गाडी. जवळजवळ ५ ते ६ दुबईचे पोलीस, मळकट करड्या गणवेषातील. त्यांच्या चेहेऱ्यावरची एकही रेघ कधी हलत नाही. आजही नव्हती हलत. ती हात हलवतच होती. एका पोलिसाशी माझी नजर मिळाली...त्याने भुवया उडवल्या, तिच्या हातांकडे बघत. त्यांचा चालक सोडून सगळ्यांची नजर त्या सुंदर हातांकडे! सगळ्यांच्या कपाळाला आठ्या. मी त्यांच्या नजरेचा रोख पकडला आणि तिच्या हातांकडे बघितलं. आपल्याला बघून कोण गोरी हात करतेय हे बघायला पोलीस बहुधा पुढे आले होते. त्यांच्याकडे बघितलं. एकाने पुन्हां शिटी मारली. काय चाललंय, खाणाखुणांतून विचारणा झाली. तिने हात वर केले आणि हलवून दाखवले. आठ्या अधिकच जमा झाल्या. 'हात बाहेर काढू नका, आतच ठेवा' आज्ञादर्शक खुणा झाल्या. लेक खोखो आणि मी आपली त्यांच्याकडे बघून हसले. आता काय कोणी लहान मुलगा थोडीच हात बाहेर काढत होता...उगाच शिट्या मारायला! मी गोरीचे हात मागे घेतले. पोलिसांची गाडी निघून गेली.
मॅनिक़्किनचे हात! नवऱ्याने शूटसाठी आणलेले.
12 comments:
hahahahahha atishay sunder entire scene is in front of eyes, tu khooop sunder lihites keep writing ok
ए सौमित्र! खूप मजा केली होती आम्ही ते दोन हात घेऊन!! आता त्यांच्यावर नजर पडली कि आम्ही दोघी सगळं आठवून हसत बसतो!
:)
तिचे डिकीतले हात, गाडीतले तुम्ही, खिडकीतुन बाहेर काढलेले तिचे हात, वैतागलेले पोलिस, मॅनिक़्किन आणि पुस्तकांच कपाट... आधी सगळीच भेळ, काहिच झेपलं नाही.
आता मॅनिक्किन काय आहे ते समजल्यावर कळलं. :D
lollzz... तोवर भारीच गोंधळ उडाला होता.
सौरभ, थोडा गोंधळ मी मुद्दामच ठेवला होता, जसा पोलिसांचा गोंधळ उडाला होता!...पण हे लिंक लावणं, is a good idea! I hope, सगळ्यांना शेवट वाचला कि कळेल! :)
कसलं मस्त वर्णन केलंय हो!
धन्यवाद विद्याधर! :)
chitrikaran aflatun zalay!!!
mla vatla mi kuthcha chitrapat pahtoy...foreign madhye shoot kelela :)
श्रीराज, त्या पोलिसांचे चेहेरे आठवून अजून हसू येतं मला! :)
mast chitra :)
nakkich , baher haat kadhaichi idea sharadchich asel....
अरे! अखलक, अजिबात नाही हा! माझाच प्रताप होता तो! हा नुसता खो खो हसत बसला होता!!! विचार तू मैत्रेयीला! :D
वंदू, आभार! :)
Post a Comment