'हूँ का चूँ,
चूँ का हूँ,
हे दोघे सख्खे भाऊ.
चें का फूँ,
फूँ का चें,
हे दोघे त्यांचे भाचे.
चार चिनी केंव्हा तरी जेवून गेले माझ्या घरी.
चार पराती वाढला भात,
एक एक काडी दोन हात.
नंतर त्यांनी ढेकर दिली,
ती चीनला ऐकू गेली.
तेव्हा पासून काय झाले,
नाही झुरळ घरात आले.'
विंदा करंदीकरांनी ही चिनी माणसाची ओळख करून देऊन बालपणीच धोक्याची जाणीव करून दिली होती. परंतु कधी चिन्यांशी गाठभेट होईल असे नव्हते वाटले!
आठवडाभर हे 'हूँ का चूँ' करून 'वढाय वढाय' मन घेऊन पहाटे पहाटे मायभूमीला स्पर्श केला आहे.
आता चपातीभाजी, वरणभात तूप लिंबू खाऊन 'हू का चू' करायची ताकद संध्याकाळपर्यंत मिळेल अशी आशा आहे!
:)
8 comments:
क्या बात है!!! विंदांची अशीपण कविता आहे??!! (नाक चिमटीत धरुन) सूSSS स्वाSSS ग्त्म्.. झक्कास... चल्ला आता ब्लॉगवर रोज अपडेट येण्णार्र... :)
Welcome back, Anagha! ......विंदांची ही कविता वाचून मी हसतच सुटलो :D ...सही आहे :)
:):)
अगं अहेस कुठे??? अलिस काय परत??? :)
हो. हजर झालेले आहे!! आता एक एक करून चीन सहलीचे अनुभव पोस्ट करण्याचा विचार आहे! :)
आलीस का गं परत? कोण कोण आले बॅगेतून? :D
विंदांची कविता सहीच आहे. आणि तुलाही नेमक्या वेळी आठवली. :)
अगं भाग्यश्री, मी दिलेल्या खोचं काय झालं?
मस्त आहे न विंदांची कविता! माझ्या बहिणींना लहानपणी मी विदांच्याच कविता मोठ्या नाट्यमयरित्या वाचून दाखवत असे! :D
Post a Comment