सायन + मजेंटा + येलो + ब्लॅक
निळा + मजेंटा + पिवळा + काळा
काल होता पिवळ्या पौर्णिमेच्या चंद्रावर लालबुंद सूर्य
क्षितिजावर तरंगती काळी पक्षीमाला.
आज मात्र फक्त ५०% ब्लॅक.
अजस्त्र पसरलेलं रिकामं करडं आकाश
रखरखीत...निष्प्राण...
उकिरड्यावर पडलेल्या तरुण गर्भाशयासारखं...
माझा ४ कलर जॉब तू अवेळी black and white छापलास!
3 comments:
हृदय कापून गेले..........
सगळा अनर्थ सांगून गेले
न उरली वाचा , न उरले शब्द
उरले फक्त हृदय ते स्तब्ध .....
कधीकधी 'तू' खूपच छान मला वाटायचास..
जेव्हा विजेला मोठा आवाज करायला सांगायचास..
कारण तेव्हा 'ती' घाबरून असायची मला बिलगलेली….
आठवते का तुला मी 'आभाराची पावती' पाठवलेली..
can actually feel the sadness of the b/w job :(
Post a Comment