खूप वर्षांपूर्वी तळहात बघून मैत्रिणीच्या आईने भविष्य सांगितलं होतं...
"नशीब, ही रेघ अजून खाली नाही वाकली. नाहीतर आयुष्यात तुला कधीतरी नक्की वेड लागलं असतं."
त्या रेघेच्या टोकावर आता सैतान तांडवनृत्य करत आहे...ती रेघ टोकाला अजून वाकावी म्हणून...खोल खोल दाबतोय तिला...
आणि मी...मी खालून धरून ठेवलीय माझी हृदयरेषा...ती अगदी तसूभरदेखील खाली वाकू नये म्हणून...
ह्या आमच्या बळ युद्धात...माझा विजय दृष्टीक्षेपात आहे...
आणि सैतानाला पराजयाची चाहूल देखील न लागावी हे उत्तम.
3 comments:
कुठच्या वैज्ञानिकाला जर स्त्रीच्या मनाचा आभ्यास करायचा असेल तर त्याला मी तुझ्या ब्लॉगचा पत्ता देईन् :)
श्रीराज,
तुझी आजची कमेंट वाचून मी एकटीच हसत बसले होते!!!
:)
ऑफिसमधल्या माझा मित्राला प्रश्न पडला कि मी स्वतःचा ब्लॉग वाचून एव्हढी का हसतेय !!
चल...म्हणजे कोणाला तरी आज मी हसवलं. माझ्या खात्यात नक्की एक पुण्य जमा झालं असेल :)
Post a Comment