आज शहरात जागोजागी एका बँकेची, नवीन होर्डींगस पाहिली.
त्यावर भल्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, 'अपने ख्वाबोंको तारीख दिजीये.'
उदाहरणार्थ एक तरुण बाई खुशीत सांगत होती,"माझा नवरा मला दोन हजार तेरा साली बहामाला घेऊन जाणार आहे."
आणि क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या पोराला बापाने, दोन हजार चौदा साली लॉर्ड मैदानावर घेऊन जाण्याचे वचन दिले होते!
कुठूनतरी अवकाशातून माझ्या कानावर आदळला तो सनी देवलचा 'दामिनी' चित्रपटातला आक्रोश!
"तारीख पे तारीख! तारीख पे तारीख!"
म्हणजे आता बघा.
ह्या बँका घरातील कमावत्या माणसांना सांगणार, 'अपने ख्वाबोंको तारीख दिजीये.'
आणि माणसं त्या जाहिरातींवर विश्वासून कुटुंबियांच्या आणि त्याचबरोबर स्वतःच्या स्वप्नांना काहीतरी एक तारीख देणार.
आणि मग त्यांच्याकडून ही जाहीर केलेली तारीख काही अपरिहार्य कारणांमुळे पुढेपुढे ढकलली गेली की घरातील छोटेमोठे सभासद, सनी देवल चा डायलॉग मारणार,"तारीख पे तारीख! तारीख पे तारीख!"
बघा बुवा! मला तरी वाटतं, स्वप्न बघा पण त्याच्यावर तारीख टाकण्याची घोडचूक करू नका! ते धोकादायक आहे!
लहानपणी आपणच नाही का आईबाबांचं डोकं खायचो! "पण तुम्ही तर म्हणाला होतात ना की, सुट्टीत आपण गावी जाऊ!"
(इथे 'सुट्टी' ह्या शब्दावरचा आपण दिलेला जोर कृपया आठवावा!)
2 comments:
स्वप्नांना तारिख देणं म्हणजे फसवणूकच वाटते.
निदान, ती सुट्टी हमखास येत असे व आपण गावालाही जात असू. पण स्वप्नांना तारखेत जखडायचे आणि तेही नव्या तारखेसाठी... :( आणि कदाचित ती स्वप्न आधीच पुरी होण्यासारखी असली तर... थांबून राहायचे. गंमत अपार्ट, निदान स्वत:ला तरी फसवू नये इतके पाहता आले तरी खूप झाले.
Post a Comment