नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 30 June 2010

'वाढ'दिवस - सत्यकथेवर आधारित

काल एका आईने लेकाचा वाढदिवस केला.
मावश्या आल्या. काका आला. मामा आला.
केक मावशीने आणला.
काकाने पण आणला.
मामाचा तर भाचा लाडकाच होता.
तो केक बरोबर फुले घेऊन आला.
घरभर फुलं.
पिवळी, लाल, जांभळी आणि निशिगंधाची लांबसडक कांडी.
घमघमाट घरभर.
संगीत घरभर.
माणसं घरभर.
लेकाचे मित्र घरभर.
लेक सगळ्यांचा लाडका.
सत्तावीस वर्षांचा.
कोणाशी बोलू? कोणाशी हसू?
तिला आवाज ऐकू येईनासा झाला.
कोपऱ्यातून पार्टी सुंदरच दिसली.
दर वर्षासारखी सुंदरच रंगली.

मग केक कापला. प्लेटा भरल्या.
हसायला, डुलायला.
वेळच नाही पुरला.

प्रथम घड्याळ भानावर आलं.
हळूहळू घर रिकामं झालं.
आवरा आवर केली..फ्रीजमध्ये भांडी गेली.
केक सकाळी बिल्डींग मध्ये वाटू.
आईने विचार केला.

ती रात्र चिवट होती.

पहाटे पहिला केक दुधवाल्याला गेला.
नंतर कचरेवाली, इस्त्रीवाला....वॉचमनला देखील न विसरता दिला.

एकंच झालं...
इस्त्रीवाला कपडे घ्यायला थोडा वेळ थांबला.
"आंटी, किसका बर्थडे था?" विचारता झाला.
"मेरे बेटे का."
"हां? कहाँ है?"

चोंबडा नुसता.
आंटी तरतर आत निघून गेल्या.

कामवालीने टोपलीत फुलांचा हार कोंबून भरला.
काल मावशीने लाडक्या भाच्याच्या फोटोला, घातलेला ताज्या गुलाबाचा हार
नाहीतरी आता कोमेजुनच गेला होता.

13 comments:

सौरभ said...

मी स्तब्ध आहे... एकच मूक प्रतिक्रिया...

Shriraj said...

माझीही अवस्था तीच झालेय, सौरभ.

Guru Thakur said...

आठवणींचा धसका
आणिक भय स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते
जग स्वप्नांचे....

Raindrop said...

me too :(

(now i can imagine how my dad celebrated moms birthday after she was gone)

manasi said...

apratim..... shabdach nahiyet bhavana vyakta karayla

Sach Deshmukh said...

आठवणींचा पाचोळा हा,
अजून वेचतो आहे..
उत्सव मांडून त्यांचा आता,
मी ही जगतो आहे..

Anagha said...

सचिन, खूप चांगली, साध्या शब्दांत, खोल वेदना सांगून जाणारी ही तुझी चारोळी...मला त्या आईच्या डोळ्यातील दुखः परत एकदा दाखवून गेली...

Alka Vibhas said...

जाने क्या सोच कर नहीं गुजरा
इक पल रात भर नहीं गुजरा

वृंदाली.. said...

Satyakatha vachalyavar dolyatun ghalaghala pani ala evhdach mhanu shakte mi..

हेरंब said...

बाप रे भयंकर !!!!!!! हादरून गेलोय मी !!! :((

Anagha said...

माझंही काही वेगळं नव्हतं झालं हेरंब. :(

संकेत आपटे said...

डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

Anagha said...

संकेत, सत्यकथा आहे ना, म्हणून हे असं होतं. :(