सकाळी सकाळी माझी बॉस बाई तुरुतुरु चालत माझ्या टेबलापाशी आली," Anagha, the client has loved your script!"
"Oh! Ya? Great!"
ओल्या हॅण्डमेड पेपरवर हलकेच एखादा रंग सोडावा आणि तो झर झर पसरत जावा तसा बहुतेक माझ्या चेहऱ्यावर आनंद पसरत गेला.
आता जरा हे आमचं संभाषण तिच्या नजरेतून बघा...
Oh! Anagha is looking too happy! Let me tell her the fact of life!
"Anagha, don't be happy! You know, this client has this habit! They always tell us this first and then later in a day or two, they just change the brief! So don't just get carried away!"
माझ्या हॅण्डमेड पेपरवरचा रंग अधिकच पसरला.
"Don't worry! Am just happy for this moment! It has nothing to do with our client bombing the same script later!"
आता तुम्हीच सांगा, ते ते क्षण जो आनंद देऊन जातात, तो आनंद नंतर काय होणार आहे ह्या अनिश्चिततेमुळे मी का हरवून टाकू?
माझी लेक पहिल्यांदा उभी राहिली तो आनंद, " छ्या! आता ही पडणार!"...
जेव्हा एका संध्याकाळी सहज नजर, समुद्रात बुडणाऱ्या सूर्याकडे गेली आणि संपूर्ण आकाशात जे काही रंग आणि ढग ह्यांचे खेळ चालू होते ते,"हे काय! पुढच्या क्षणाला हे सगळं नाहीसं होऊन अंधार पसरणार!"...
किंवा एका दिवाळीच्या दिवशी रांगोळी खूप सुंदर झाली तेंव्हा "ही तर उद्या पुसावी लागणार!"...
"Ok ! As you wish! Am just warning you! I know this client better than you!"
आनंद बऱ्याचदा क्षणभंगुर असतात... तरी देखील त्या त्या क्षणी ते आनंदच देऊन जातात ना?
7 comments:
म्हंणून त्या त्या क्षणापुरतं भरभरुन जगावं माणसानं...तो क्ष्ण उजळून टाकावा आनंदानं..मग स्मरणात तो चमकत रहातो कायम काजव्यासारखा..आयुःष्याच्या सायंकाळी झाकोळलेल्या झाडाकडे पहाताना या छोटया छोटया काजव्यानी भरलेलं झाड पहाताना त्याचं मह्त्व लक्षात येतं आणि वाट्त> खरंच जगलो त्याला ’जीवन’ म्हणायला काही हरकत नाही.
खूप छान गुरु...खूप छान!
:) आणि धन्यवाद.
अनघा , अग त्याच्या नावातच `आनंद ' आहे. तो येताना नेहमीच आल्हाद , प्रफुल्लता घेऊन येतो. आणि आपले आयुष्य तर सतत त्यात होणाऱ्या बदलांनी भरलेले आहे. मग कुठलीही स्थिती हि कायम नसल्याने क्षणिक आहे- अगदी आपल्या आयुष्यासारखे . मग त्याचा उपभोग घेऊन , त्या शिदोरीवर पुढच्या क्षणास सामोरे जायला आपल्याला तेच बळ नाही का........!
आनंद हा बरेचदा क्षणभंगुर असतो म्हणूनच तो त्याच क्षणी भरभरून अनुभवायचा असतो.पुढच्या क्षणी - उद्या काय होईल या विचारांनी बहुतांशी हा आनंद हिरावलाच जातो.ते टाळणे ज्याला जमले तो सुखी. अनघा, पोस्ट मस्तच.
When life gives you a hundred reasons to cry, show life that you have a thousand reasons to smile.
अखलक,
that's really a great one! Thanks a ton!
क्षणभंगुर असला तरी आपण तो उपभोगातोच ना.. :) तो 'क्षण साधाया' नेमके जमले पाहिजे...
Post a Comment