नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 24 April 2010

तुझं आपलं हे रोजचच झालंय!

आपण थोडे जरी काही निर्माण केले की लगेच कौतुकाची अपेक्षा करतो...
अगदी कौतुक नाही तरी लोकांनी बघावे अशी आपली इच्छा नक्कीच असते.
मग ते एखादे चित्र असेल, कविता असेल किंवा अगदी साधं आंबट वरण असेल!
विचारतो की नाही आपण समोरच्याला,"कसं झालंय? झकास?"
पण मग देव रोज उठून इतक्या प्रचंड प्रमाणात निर्मिती करत असतो तर मग त्याचं रोज कोण कौतुक करतं ?
त्याची पाठ कोण थोपटतं?
आपण तर ढुंकूनही बघत नाही त्याच्या निर्मितीकडे!
असं होतं! रोज उठून तुम्ही चांगलंच काहीतरी बनवायला लागलात की!

1 comment:

रोहन चौधरी ... said...

म्हणून निसर्गाकडे जावे... एकदा का आपण त्यात विलीन झालो ना की आपले खुजेपण कळते आपल्याला बरोबर... :)