नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 23 March 2012

कधी वाटू लागतं...

कधी वाटू लागतं...
आयुष्य सुंदर आहे.
जगण्यासारखं आहे.
सखेसोबती भेटतात...
हसणं होतं...
खिदळणं होतं...
आणि मग खरंच वाटू लागतं...
आयुष्य सुंदर आहे.
जगण्यासारखं आहे.

मात्र हसता हसता जेव्हां डोळे भरून येतात...
पाणी चोरता चोरता...
डोळे हकनाक उघडे पडतात...
तेव्हा मात्र वाटतं...
ह्या डोळ्यांचं आणि हृदयाचं कधी पटलंच नाही...
त्यांचं एकमेकांशी कधी जमलंच नाही.
आणि फिरून एकदा तो क्षण सरतो...
लाट डोळ्यांआड सरकते...
कुठून ना कुठून...कोणी ना कोणी हसवून जातं...
आणि मग पुन्हा वाटू लागतं...
आयुष्य सुंदर आहे.
जगून बघायला काय हरकत आहे ?

16 comments:

rajiv said...

आयुष्य सुंदर आहे.
जगून बघायला काय हरकत आहे ?
..
..
..

किती सोप्पा पर्याय ठेवलायस, रोजच्या लढाईवर जाण्यास प्रवृत्त करणारा ..!!

Mohana Prabhudesai Joglekar said...

समर्पक शब्दात व्यक्त केल्या आहेत भावना. कविता आवडली.

हेरंब said...

:((

:))

Raindrop said...

sundar.जगून बघायला काय हरकत आहे ? It is anyday better than the alternative.

Pankaj - भटकंती Unlimited said...

होय, आयुष्य खरंच सुंदर आहे. आपली फ्रेम महत्त्वाची.

Gouri said...

खरंच, काय हरकत आहे? मस्त!

http://padgavkaranchya-kavita.blogspot.in/2009/10/blog-post_4398.html

BinaryBandya™ said...

जगून बघायला काय हरकत आहे ?

sahich

Anagha said...

:) राजीव, विचार सोपा आहे...

Anagha said...

मोहना, आभार. :)

Anagha said...

हेरंबा, रडता रडता हसलास ना ?!! माझी सवय लागली वाटतं ?! :) :)

Anagha said...

वंदू, :) :)

Anagha said...

पंकज, कॅमेऱ्याच्याच भाषेत बोल हा तू ! :) :)

Anagha said...

:) गौरी, सुंदरच आहे न ती कविता ? वेळीच बरं आठवतं तुला कायकाय ! :) :)

Anagha said...

बंड्या, बऱ्याच दिवसांनी अवतरलायस ? :) :)
आभार रे.

सौरभ said...

:D :D :D

Unknown said...

khup mast :):)