नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 24 October 2010

मी माझा...

सूर्यास्ताच्या थोडं आधी...आज अपघात बघितला. बाईकवरुन काही क्षणांपूर्वी डावीकडून पुढे निघून गेलेल्या जोडप्याला झाला होता. जमाव होता, पोलीस आलेले होते. डोक्यावर सुरक्षा कवच चढवलेला, ३० ते ३५ वर्षांचा तरुण, मोबाईलवरुन कोणाला घडल्या अपघाताबद्दल सांगत होता. त्याच्या बरोबर असलेली, तरुणी रस्त्यावर तळमळत होती. रक्तबंबाळ. पुढे दोन गाड्या थांबवलेल्या होत्या. भोवती गर्दी जमलेली होती. जमावाने गाडीतल्या लोकांना खाली उतरवले होते. वातावरण तापत होते.

पहिली गोष्ट मनात आली ती ही...चालक तरुणाने स्वतःचे शीर तर वाचवलेले होते. त्याच्या सहचारीणीचे तसे नव्हते. त्यामुळे जो काही अपघात झाला, त्यात तो तरुण तर शिरसलामत, धडधाकट स्वतः च्या पायांवर उभा दिसत होता. तरुणीचा प्रवास वेगळ्याच रस्त्याला गेला होता.

असे का? नेहेमीच बाईक चालवणारे तरुण स्वतः कवच घालून आणि पाठीपुढे बसलेले त्यांचे कुटुंब, विना संरक्षण का दिसून येते? ह्यात त्याचा स्वतः च्या वाहनशैलीवरील प्रचंड विश्वास दिसून येतो की अख्या जगात त्याचे स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या कोणावरही तितके प्रेम नसते? अगदी आपल्या बायकापोरांवर देखील? की बायका आपले वाऱ्यावर भुरभुरणारे केस आवरून, आपले डोके कवचात अडकवायला नकार देतात? की ते लोखंडी आवरण परिधान करणे म्हणजे आपल्या जोडीदाराच्या वाहनशैलीवर अविश्वास दाखवणे, असे त्यांच्या मनात येते? शक्य आहे. काही सांगू शकत नाही.

आशा आहे, आज यमराजाने पाश सैलच सोडला असेल...घट्ट घट्ट आवळलेला नसेल.

11 comments:

रोहन... said...

आज काय अपघात पोस्ट्स आहेत का?? तिकडे दिपकने सुद्धा बाईक वरून अपघात झालेल्या एका मुलाची छोटीशी प्रेम कथा लिहिली आहे... :)

सौरभ said...

bad bad!!! बाईकर्स लोकं खरंच उगीच जीव धोक्यात घालतात. स्वतःचापण आणि दुसऱ्याचापण. किमान मागे कोणी बसले असताना तरी काळजी घ्यावी.

Alka Vibhas said...

:((
car च्या seat belt बाबतही असाच निष्काळजीपणा दिसतो. police दिसला की एका हाताने belt पकडून काहीजण फक्त तो लावल्याचे नाटक करतात.

Shriraj said...

अनघा, खरंच हे किती चुकीचं आहे ना :(

Anagha said...

रोहन, काल ठाण्याहून परत येताना हे बघितलं...हेल्मेटबद्दल नेहेमीच डोक्यात येत असतं...ती रस्त्यावर तडफडणारी बाई नजरेसमोरून जाईना...म्हणून हे....

Anagha said...

सौरभ, आणि त्यातून साडी नेसून बायका ज्या प्रकारे बाईकवर बसतात, त्यात एका क्षणाची चुकी पुरेशी असते...

Anagha said...

अलका, असं वाटतं, कि आपण सुरक्षित आणि जिवंत राहावं ही काय त्या पोलीसाची जबाबदारी आहे काय? नियम पाळून आपण काय त्याच्यावर उपकार करत असतो?

Anagha said...

श्रीराज, पटतंय ना? आपण एकूणच नियमबाह्य वागणे ह्यातच सगळे शौर्य असल्यासारखे वागत असतो!

THEPROPHET said...

:(((

Anagha said...

विद्याधर, मी हेल्मेट घातलेले असूनही head injury साठी हिंदुजाच्या ICU मध्ये चार दिवस काढून आलेय...पण तरीही हेल्मेट हे हवेच!! :)

Raindrop said...

i know ...but sometimes despite the helmet or the seatbelt...we are more worried about the hairstyle or navin kori saadi ka padar getting crumpled....it is one of those times that tells us....sadi padar can goto hell...but seatbelt is a must.