शिवाजी पार्क. पहाटे साडे पाच. मैदान अजून आळसावलेलंच. कोणी दोरीच्या उड्या, कोणाचा प्राणायाम, कोणाच्या उठाबश्या तर कोणाचे सूर्य नमस्कार. धागा समान...आरोग्य. नऊवारीतील आज्या येऊन कट्ट्यावर टेकू लागतात आणि गप्पा रंग धरू लागतात. "काय ग, काल कुठे होतीस?"
पन्नाशीच्या पुढील पुरुष मंडळींच्या जोरदार हाळ्या ऐकू येऊ लागतात. आजूबाजूच्या रहिवाश्यांसाठी ह्या हाळ्या म्हणजे रोजचा गजर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुणाई मनात असते. पांढरीशुभ्र अर्धी चड्डी, लालबुंद टी शर्ट, कानात आणि पायात कुठल्या संगीताची धून, मग सुरकुत्यांचा काय संबंध? रात्रभर वस्तीत गस्त घालून आताच कुठे, मुटकून झोपलेल्या श्वानांचा ह्या जाग्या होणाऱ्या जगाकडे एकूणच काणाडोळा. भल्या पहाटे उठून 'आरश्या, आरश्या सांग, जगात सर्वात सुंदर कोण' ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणारी एखादी सुंदरी अचंबीतच करते. व्यवस्थित बसवलेला केशभार, नाजूक कपडे आणि लाल ओठ!
ही सर्व व्यक्तिचित्रं, रोजची. गप्पा मारता मारता, ठरवलेला टप्पा चटकन गाठला जात असावा. त्यांना न्याहाळता न्याहाळता ३ चकरा विनासायास मारून होतात. सहा वाजून गेलेले असतात. मोबाईलचा गजर, निघा आता, म्हणून संतापाने थरथरायाला लागतो.
लगबगीने वाहन घरापर्यंत आणावं तर....
आमच्या गल्लीत दोन गाई भेटाव्यात. रस्ताच्या मधोमध गप्पा रंगलेल्या. ही वेळ त्यांची आणि त्यांच्या मालकाची प्रातर्विधी आटोपण्यासाठी समुद्र गाठण्याची. ह्यांच्या रंगलेल्या गप्पांना कंटाळून बहुधा मालक घाईघाईत पुढे निघून गेला असावा. दोघी जश्या बहिणी, काळ्याभोर, टपोरे पाणीदार डोळे. एकीने माझ्याकडे तिरपी नजर टाकावी... दुसरीने तिचं वाक्य पूर्ण करावं. समस्त स्त्रीजातीबद्दल आदर बाळगून शांतपणे हॅंड ब्रेक लावून गाडी उभी केली. गप्पा मारण्यात ह्यांनीच का मागे पडावे? त्यांच्या सासरमाहेरच्या, तक्रारीच्या, शिळोप्याच्या जेव्हा गप्पा आटोपल्या तेव्हा कुठे त्या दोघी समुद्राच्या दिशेने निघाल्या. मागून गाडीत मी. त्यातील एका गाईने मान वळवून माझ्याकडे प्रेमाची नजर टाकल्यासारखे मला तरी वाटले, बाई!
...झाला सुरू दादरवासियांचा दिवस...
हाय, हॅलो...विचारपूस....आजी आजोबा, काका काकी, मामा मामी...गाई म्हशी...फुल्टू Cosmopolitan!
23 comments:
गाईम्हशी जमल्या बाजारी,
खोळंबुन ठेवली रहदारी...
पण काहिही बोला... स्त्रीया कुठेही भेटल्या तर स्थळवेळ विसरुन गप्पा मारायला लागतात. :P :P
गाईम्हशी जमल्या बाजारी,
खोळंबुन ठेवली रहदारी...
hehe!! suchali vatat?? :p
गाईचे झक्कास वर्णन ...हसायलाच आलं
आणि त्या सुंदर्या असतात ना...त्या पक्क्या लबाड असतात..त्यांच्याकडे बघावं तर आपल्या इज्जतीचे धिंडवडे... आणि नाही बघितलं तर आपण भावखाऊ ठरतो ...
hehe!!!! Shriraj....bhavkhau tharela br!!nahi ka? :p
तेच करतो हल्ली...ढुंकूनपण नाही बघत :D :D
तो तुझा 'हल्ली' एकदम लक्ष वेधून घेतोय! :p
netkya ani thodya shabdamadhe tu aajchi pahat mandlis ti pan akhicha akhi jivant, sunder lihile ahes nehmipramane gaini tar goshti cha kalas gathla ahe hehehe keep writing
सौमित्र, ही शिवाजी पार्कवरची पहाट तशी तुझ्याही ओळखीचीच असेल, नाही का?
ho na pan amcha swiming pool chi pahat barech varsh baghitli pan ata sadhya swimming pool band mhanje amchi pahat pan band hehehe
खरंच! किती वैताग आहे हा! कधी सुरु होणार आहे हा स्विमिंग पूल? :(
@श्रीराज(काका): "हल्ली" तु(म्हा)ला आता तो ऑप्शनपण राहिला नाही.
मागचा सगळा backlog जवळ जवळ भरून काढला.. दोन दिवस लागले.. प्रयत्न करणार आहे रोजच्या रोज भेट देण्याचा.. पण रात्र थोडी आणि सोंगं फार असाच प्रकार झाला आहे एकंदरीत.
मजा येते वाचताना..
खूप लिहीत रहा..
भेटायला आवडेल..
एक चक्कर मारतेस दुबईला? लेकीसह ये.
अलका, किती दिवसांनी आलीस! खूप बरं वाटलं! अगं, तुझी पुढची भारतभेट कधी आहे सांग पाहू?? :)
सौरभ, श्रीराजच्या दुःखावर एकदम डागण्या! :p
@ Saurabh :D :D :D
>>पण काहिही बोला... स्त्रीया कुठेही भेटल्या तर स्थळवेळ विसरुन गप्पा मारायला लागतात. :P :P
मी ह्याहून जास्त सहमत होऊ शकत नाही! :D
hehe! विद्याधर, तुम्हांला हसायला विषय मिळावा म्हणून मारत असतो आम्ही non stop गप्पा!! :p
ohhh I miss Shivaji Park!!!
Milind Soman jogging at 1 am and all of us sitting at Barista to catch a glimpse :)
hehe!! vandu!! :p
किती छान लिहितेस ग तू....एकाच दिवसात सगळ्या पोस्ट वाचयच्या का??
ह्म्म्म...आज ससा माझ्याबरोबर गेला समोर बाबाची पण गाडी होती पण त्याला वेळ नव्हता आणि आमच्या गाडीने वळण घेतल्याबरोबर त्या डब्ब्या पाण्याने भरल्या.....त्या आणि सोडेपर्यंत तश्याच.....आणि आई परत येताना तशीच.....अगदी पहिल्यांदी त्याला सोडताना विचारात पडली होती...तशीच.....सरावाने वळणं सिग्नल घेत......:(
aadhichi comment chukine paste jhali....ti publish karu nakos..
mast lihilay..pan he kaay ithe saglyanni ugach saglya gappa srijatiwar ka dhakalyat...majhe barech mitra majhyashi (ani tyanchya mitranshi pan) phone war kiti wel badbad kartaana mi pahate.....ye to nainsafi hain....
हो ना अपर्णा! अगदी बरोबर! मी ह्या पुरुषांना ना उगाच तासंतास गप्पा (चकाट्या शब्द बरोबर आहे का? ;-) ) मारताना बघितलंय! ह्यांना ना घरी जाऊन कामं नसतात आणि काही नसतं! उगाच आपले मिटींग्सच्या नावाखाली टाइमपास करत असतात! आणि मग मला कधी ते मिटिंगचं सोंग कधी संपेल आणि मी घरी जाईन असं होत असतं! :) ( संतापला का माझा मित्रवर्ग? :-) )
:D :D
Post a Comment