परवा सकाळी घड्याळाचे काटे ९चा इशारा करत डोळे वटारत होते. माझं आणि त्याचं कधीच पटलेलं नाही! त्यामुळे नेहेमीसारखीच माझी धावपळ चालू होती.
"आई, मला पैसे हवेत."
"अगं, माझ्याकडे आत्ता नाहीयेत. आणि मला एटीएम मध्ये जाऊन काढायला पण वेळ नाहीये. तुझ्याकडे देऊ का मी कार्डं? काढशील का तू?"
"दे."
रात्री ती मला कार्ड परत करायला विसरली आणि मी ते परत घ्यायला विसरले.
मग कालचे माझे आणि माझ्या लेकीचे एसमेस...
मी ऑफिसमध्ये. अदमासे दूपारचे ११ वाजले होते. माझ्या मोबाईलने त्याच्या पोटातील हालचालीचा एक आवाज काढला. लेकीचा एसेमेस आलेला होता..
So we got done with our lecture! and we came to watch a movie and I remembered I have your card, we went to Crossword and 2 books called me, So I had to buy them. They started crying when I said I can't buy them. So I didn't have an option.
मी...
ag, pn mi visarale card tuzyakadun ghyayalaa tari tu dyayachs naa kaal raatri parat!
लेक...
:)
रात्री जेवताना....
"काय ग, बाजारात आणि काय काय रडत होतं तुझ्याकडे बघून?"
"आई, खरं तर ना, चार पुस्तकं रडत होती, आम्हांला घरी घेऊन चल म्हणून. पण मी त्यांना समजावून सांगितलंय, मी एकदम तुम्हां चौघांना घेऊन गेले ना, तर माझी आई चिडेल माझ्यावर. म्हणून ना आज मी फक्त दोघांना घेऊन जाते आणि परत पुढच्या आठवड्यात येऊन तुम्हांला दोघांना घेऊन जाईन. चालेल? मग कुठे ती थांबली रडायची!"
"हो का? मला वाटलं, कोण जाणे आणखी कोण कोण रडतंय! जीन्स, पर्सेस, दागदागिने, टॉप्स....म्हणजे मग संध्याकाळपर्यंत माझं कार्डं रडू लागलं असतं..आणि रात्री मी रडले असते!"
"नाही ग आई. फक्त पुस्तकंच रडतात नेहेमी माझ्याकडे बघून!"
पुस्तकप्रेमी आजोबांची लाडकी नात बोलली! आणि त्याच बाबांची मी लेक! मग हसण्यापलीकडे काय करणार मी?
:)
26 comments:
भन्नाट लेक आहे तुमची ..
awwwww this is soooo cute :) mala pan ashich pustaka radun radun boalvtaat....especially airport war :)
माहितेय मला वंदू! आणि मग तुझं कार्डं रडतं ना? :)
बायनरी बंड्या, ध्यान आहे खरं भन्नाट! :)
heyyyy you have a 50th follower....who is this lucky person....must get felicitated :) half century person kon aahe baghu zara :)
वंदू, अतुल राण्यांचा विजय असो! :)
पुस्तके रडतात - "मला घरी न्या म्हणून "
idea बेस्टच आहे ..
आता मीही कधी पुस्तकांच्या दुकानात गेलो की बिचारी पुस्तके मला रडतानाच दिसतील ...
vijay aso vijay aso :)
three cheers for Atul Rane :) and this lovely space called 'restiscrime' that we all love to visit everyday!!!!!
मस्त आहे हे...
पण सहसा पुस्तकं मी घरी आणली की रडतात...कारण मी मुंबईला विकत घेतो आणि तिकडेच त्यांना एकटं टाकून इकडे येतो! :)
बायनरी बंड्या, माझे बाबा ना एक कापडी पिशवी खिशातच ठेवायचे! आणि रस्त्यावरील त्यांचे ठरलेले विक्रेते होते...बाकी बाबा काहीही खरेदी करायचे नाहीत, पुस्तके सोडून! :)
ओ! हे काही बरं नाही विद्याधर! एकटेपण किती असह्य होत असेल त्यांना! बिच्चारी! :)
आमच्याकडची पुस्तके तर `हात' लागला की रडतात .....
सारखे सारखे हात लावतात म्हणून ....
आणि `आम्हाला पण आमची space हवी म्हणून .... :)
पॉलिश्ड् फळ्यांवरील हाक मारणारे
वटारलेले डोळे
त्यांना पाहून कोणा-कोणाचे
कार्ड वळवळे
Kaay sundar shaili t lihita tumhi..
Pahilyaandach alo blog var.. aataa vaachnaar nehamee..
श्रीराज, माझ्या डोळ्यासमोरच आली डोळे वटारलेली पुस्तकं!! हेहे!!:)
नचिकेत, आनंद झाला तुझी प्रतिक्रिया वाचून! :)
माझ्याकडे बघून मात्र पुस्तक हसतं, घरी ने म्हणून हट्ट करतं... मी त्याला नीट नसल्यास लायब्रीचा धाक दाखवते... अशी बरीच चर्चा केली की मग नव-याचं card रडायला लागतं.
अलका, भेटीबद्दल धन्यवाद! म्हणजे कोणाचं तरी कार्ड रडतच! नाही का?
:)
नेमकी कुठली पुस्तके रडत होती ते तरी सांग... :)
रोहन, मॅडमनी भारतीय लेखकांना पाठींबा देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांचीच पुस्तक हट्ट करतात मॅडमकडे! किश्वर देसाईंचे 'Witness the night' आणि करण बजाजांचे 'Keep off the grass घेऊन आल्यात.
:)
मला पाहुन पुस्तकं रडली नाहित, उलट फिदफिदलीच... पण त्यातल्या त्यात जर कोणी रडलंच तर मी त्याला गोष्ट सांगायचो, हसणाऱ्या पुस्तकांची. मग ती दंतमंजनच्या जाहिरातीत देतात तशी फावडा स्माईल द्यायची... :D
:-) Majaa aali vaachaayalaa!! Malaa asa kuni card kaa naahi det buwa? :-)
Aani Vandu fakt pustakach radun bolavtaat kaa?
hehe!! इरू, वंदू डोळ्यासमोर आली...शॉपिंगवरून आपला ओरडा खाणारी! :D
हो! सौरभ, मला वाटतं तुझी पुस्तकं तुझ्यासारखीच असतील! नाही का? सतत हसवणारी! :)
माझ्याकडे बघून पुस्तकं रडत नाहीत, उलट वैतागतात. माझ्यामुळे प्रकाशकांचा धंदा बसतो ना. संगणक क्षेत्रात असल्यामुळे pirated गोष्टींवर खूप विश्वास. त्यामुळे कोणतंही पुस्तक ebook स्वरूपातच (आणि त्यातही फुकटच! पैसे देऊन ebook कोण घेणार?) वापरण्याकडे माझा कल. ;-)
व्वा! संकेत, मग ते मुंबईच्या सिग्नलला मुलं विकत असतात, त्यांच्याकडून देखील घेत नाही वाटतं तू पुस्तकं? :)
Post a Comment