नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 14 September 2010

....हुकूमावरून

आज सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली.
एका अडतीस वर्षाच्या विधवा बाईला 'ऑन लाईन गेम्स' खेळण्याबद्दल शिक्षा झाली!
का विचारताय?
बाईसाहेब दिवसाचे चोवीस तास फक्त कम्प्यूटरवर खेळत असायच्या. त्यांना त्याचे इतके व्यसन लागले की घरातील त्यांची दोन लहान मुले आणि दोन कुत्रे ह्यांचा त्यांना विसर पडला.
महिनोंमहिने हे चारही जीव फक्त बंद डब्यातील अन्नावर जगत होते. घर अतिशय वाईट अवस्थेत होते. शेजाऱ्यांच्या लक्षात आले. बाईंवर केस फाईल झाली. आणि आता कोर्टाने बाईंना खेळायला मनाई केलेली आहे! त्यांना मन रिझवायची गरज वाटलीच तर त्या आपल्या दोन जिवंत छकुल्यांशी खेळू शकतात. किंवा आपल्या कुत्र्यांबरोबर त्या आपला वेळ घालवू शकतात.

व्यसन वाईट.
आणि ते कोणाला कसले लागेल, सांगता येत नाही.
जसे ह्या बाईंना ऑन लाईन गेम्स खेळायचे व्यसन लागले, तसेच आमच्या पुढाऱ्यांना राजकारण खेळण्याचे व्यसन लागले आहे.

तिथे एका आईला मुलांवर प्रेम करण्याचे आदेश दिले गेले.
मग इथे आमच्या पुढाऱ्यांना देशावर प्रेम करण्याचे आदेश द्यायला हवेत काय?

आणि ह्या आदेशांनी प्रेम होईल काय?

13 comments:

सौरभ said...

हाहाहा... चांगलय चांगलय... बाई स्वतःसाठीतरी जेवण बनवत होती का??? की फार्मविलमधे शेती करुन जे पिकवलं त्यावरच गुजराण करायची? :P ;)

Shriraj said...

अनघा, असं जर खरं झालं तर किती बरं होईल ना!

By the way, सौरभची कमेन्ट वाचून मला हसायलाच आले

Anagha said...

सौरभ, शक्यता नाकारता येत नाही....मॅडम तर देहभान हरवून खेळत होत्या! :)

Anagha said...

श्रीराज, सौरभच्या चटपटीत प्रतिक्रिया नेहेमीच आपल्याला हसवून टाकत असतात. नाही का? :)

Shriraj said...

हो खरंच! :)

भानस said...

नको ते प्रश्न विचारायची भारी वाईट्ट खोड... ना ना व्यसन जडलेयं हो तुला अनघे...

Aakash said...

सौरभ: बाईंनी अति तिथे माती आणि माती तिथे शेती < ह्या दोन म्हणींचा मेळ घालायचा प्रयत्न केला आहे. पण ह्या गडबडीत किड्स विल चा त्यांना विसर पडलेला दिसतोये. बाईंची कमाल वाटते पण.

असो बाईंचा गेम तिथल्या कायद्या व्यवस्थेने केलाच आहे. पण ह्या नेत्यांचा प्रश्न खरच कठीण आहे. एन.डी.ए मधून पदवी मिळवलेला कलमाडी जर देशाच्या अब्रू खातो, तर ह्या ८ वी पास "कफन चोर" नेत्यांची काय बात करायची?

Anagha said...

आकाश, वैताग आहे हे आपले नेते म्हणजे!! मला कधीकधी प्रश्न पडतो कि जेव्हा हे बॅनर्स छापले जात नव्हते, म्हणजे गांधीजी, टिळक, वल्लभभाई पटेल ह्यांच्या काळात, ते स्वतःची जाहिरात कशी करायचे?? त्यांच्या कार्यातूनच त्यांची ओळख आपल्याला झाली ना? मग ही किळसवाणी फडकी जागोजागी लटकवून हेनव नेते साधतात तरी काय??

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

बाई स्वत:देखील बंद डब्यातील खात असणार. कोणतीही सवय, व्यसन झाली की वाईटच. इंटरनेटवर ऑनलाईन गेम्स, चॅटींग ही तर व्यसनाधीन होण्याची प्रमुख ठिकाणं.

Anagha said...

कांचन, भेट दिल्याबद्दल आभार. :) मला वाटतं, एकट्या जिवाला ही व्यसने लागण्याचा धोका जास्त!

Anagha said...

भाग्यश्री, खरं आहे ग बाई तुझं! :)

संकेत आपटे said...

पुढार्‍यांना देशावर प्रेम करण्याचे आदेश दिले तरी देशाबद्दल त्यांना प्रेम वाटणार नाही. अहो, राजकारणात येताना काही prerequisites असतात. कोडगेपणा, बेमुर्वतखोरपणा, मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याची ऊर्मी वगैरे वगैरे. उमेदवारीच्या फॉर्मवर चेकबॉक्सेस असतात असे. एखादा जरी चेक केलेला नसेल तरी तिकिट देत नाहीत... ;-)

Anagha said...

हम्म्म्म. खरं आहे संकेत तुझं. :(