ऑफिसला तीन दिवस लागून सुट्टी. ईद, गणेश चतुर्थी आणि रविवार. ईदची सुट्टी डोक्यावरच्या कामाच्या वाढलेल्या ओझ्याने खाल्ली, ती बाब निराळी. शनिवारी बाहेरून जेवण मागवायला गेलो तर,"मॅडम, तास दीड तास लागेल."
"का बरं?"
"आज हमारी ईद है ना!"
"आज ईद है? अरे भाई, ईद आज नही है! आज तो गणेश चतुर्थी है!"
"नही मॅडम! आज ईद है!"
"तो फिर हमने कल छुट्टी किसकी ली?"
"वो हमें मालूम नहीं! पर हमारी ईद आज है!"
"अच्छा, अच्छा ठीक है! ईद मुबारक!"
"ईद मुबारक!"
गडबड आहे! गणेश चतुर्थीच्या दिवशी जो चंद्राकडे बघतो, त्याच्यावर चोरीचा आळ येतो ना? मला हे कळल्यापासून किती गणेश चतुर्थ्या मी चंद्रोदयानंतर खाली मान घालून घालवल्या! हो की नाही? मग आता हे आपले मुसलमान बांधव न घाबरता नेमके आजच्याच दिवशी, माना ताणून चंद्राकडे बघणार! त्यांच्यावर चोरीचा आळ नाही का येणार?
"बाबर, ईद मुबारक."
"Thank you!"
"बाबर, तू ना आज चाँद की तरफ देखना नहीं! निघत को और बच्चों को भी बोल दे!"
"क्या?! अरे तो खाना कैसे खाएंगे हम?"
"अरे, आज गणेश चतुर्थी है! और आज के दिन कोई चाँद को देखता है ना तो उसके उपर चोरी का इल्जाम आता है!"
"अनघा! तू भी ना!"
बाबर खो खो हसत सुटला! गणपतीला तर मानतो!
ऐकलं नसेलच माझं आमच्या दुबईतल्या, जिवाभावाच्या पाकिस्तानी मित्राने!
;)
8 comments:
बिच्चारा , इकडे आड तिकडे विहीर ....!
अल्ला व गणपती यांच्या कात्रीत धर्मसंकटात पडला ....!
पण बहुतेक `पूर्णब्रह्म' विजयी झाले असणार.
म्हणतात ना ` अन्न हे पूर्णब्रह्म' !
अरे हा... ईद तर गणोशोत्सवाच्या आदल्या दिवशी होती. हम्म्म पण ईद आणि गणपती एकाच दिवशी आल्यावर हा प्रोब्लेम येणारच... चंद्राचं प्रतिबिंब बघायच... म्हणजे चंद्र बघुन नं बघितल्यासारखाच... दोन्ही दगडांना एक पक्षी मारला जाईल.
अनघा, आता माझी खातरीच पटलेय...हा सौरभ खरंच बिरबलाचा अवतार आहे
हो ना श्रीराज? :)
चांगली आहे हं सौरभ आयडियाची कल्पना! :)
राजीव, खरं तर देव एकच आहे असे म्हणतात नाही का? मग असं त्रांगड निर्माण झाल्यावर हे सगळे देव करतात तरी काय? :)
अगं ते वरून आपली गंमत पाहतात आणि गालातल्या गालात हसतात... :)
भाग्यश्री, मला पण असंच वाटतं! आपले पापाचे घडे भरण्याची वाट बघतायत ते!!
Post a Comment