परवा लता मंगेशकरांचा ८१वा वाढदिवस झाला.
लहानपणी आईने लावलेल्या LP आणि EP ऐकत आम्ही मोठ्या झालो. कानाला खूप गोड वाटणारी गाणी आणि त्यांना लगडलेलं बालपण.
बाबा औरंगजेब. संगीताशी वैर. फक्त सैगल ह्या एकाच माणसाला गाता येत असं ह्यांचं कट्टर मत. आईने तिच्या तुटपुंज्या पगारात एक फिलिप्सचा रेकोर्ड प्लेयर आणला आणि त्याबरोबर २ फुट X २ फुटांचा विविध तबकड्यांनी, भारून टाकलेला डबा. मग महिन्यातून निदान एक दिवस तरी कधी तलत, कधी मदन मोहन, कधी लता, कधी आशा तर कधी सैगल घरी हजेरी लावू लागले. त्या सुरांवर आम्ही तिघी तरंगलो. स्त्री साम्राज्यापुढे औरंगजेबाचे काही चालले नाही. ते पुस्तकात डोके खुपसून डोळे उघडे आणि कान बंद ठेवण्याचे नवीन तंत्र शिकले!
आज त्या स्वरसम्राज्ञीचा तो स्वर्गीय आवाज ऐकावा आणि पुन्हा त्या बालपणात जाऊन पोचावं एव्हढीच इच्छा.
सादर आहे हिंदी आणि मराठी, मिश्र गाण्यांची छोटी EP...
आशा आहे, हा सूर तुम्हांला देखील तरंगवेल...
रसिक बलमा -
आयेगा आनेवाला -
नैना बरसे -
तुम ना जाने किस -
जिंदगी उसी की है-
बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला -
प्रेमा, काय देऊ तुला -
12 comments:
dhanyawad
Ohhh this is absolutely amazing :) u na....sometimes u just amaze me....kahaan kahaan se dhoondh ke laati ho ye sab??? kitni mehnat but so much worth it.....I started listening to 'tum na jaane kis jahaan mein kho gaye'...as I am just recovering from a little domestic fight :)
I am sure people are definitely going to go straight and click on the song that suits their current state of mind :)
Wonderful post :)
ए वंदू! किती मज्जा ना? :D I just hope like me they are allowed to listen to songs in their office ...or at least they have earphones!! :)
मानसी, आशा आहे तुझी माझी आवड जुळेल! :)
thanks for sharing lovely treasure with all of us, tonnes of sweet memories attached to it. Regards
विद्याधर, किती सुंदर आहे ना हे संगीत!? केव्हढं काही देतात आपल्याला ही माणसं!
सौमित्र, झाल्या ना सुंदर आठवणी ताज्या?! :)
जुनी गाणी, जुन्या आठवणी
कधी विसरलेत का कोणी
चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेल्या
असतात सावल्या दोन्ही
श्रीराज, गाणी ऐकून एक कविता स्फुरली वाटतं? :)
अनघा हा एकत्रित परिणाम आहे - लताच्या गाण्यांचा आणि तुझ्या लेखाचा :)
(माझा प्रश्न मुर्खासारखा वाटेल, हरकत नाही)
पण EP आणि LP म्हणजे???
did you miss ज्योती कलश छलके?? ;)
LP ही मोठ्या आकाराची तबकडी असे जिच्यावर जास्ती गाणी मावत. आणि EP ही छोट्या आकाराची तबकडी; कमी गाण्यांची. आणि 'ज्योति कलश' आईच्या कुठल्याही तबकडीवर नव्हतं ना, म्हणून आठवलं नाही! :)
Post a Comment