नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 29 September 2010

वाटचाल

मध्ये एक विचार वाचनात आला.
स्वर्ग आणि पाताळ किंवा नरक असे काही नसतेच.
जे काही आहे ते आपल्या मनात आहे.
मनात स्वर्ग. आणि मनातच नरक.
प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती....
एकेक पाऊल स्वर्गाकडे किंवा नरकाकडे.
त्वरित निर्णय...पाऊल कोठे?
आयुष्याच्या प्रवासात कधी एक पाऊल स्वर्गाकडे आणि पुढच्याच क्षणाला दोन पावले नरकाकडे.
तर कधीकधी खात्रीपूर्वक वाटतं...हा मार्ग स्वर्गाकडेच...
परंतु...दहा पावलं चालून गेलं कि लक्षात येतं की इथे तर न टाळता येणारा भुयारी मार्ग आहे...जो आता नक्की नरकाकडेच नेणार आहे.
म्हणजे होकायंत्र हवं.
दूरदृष्टी हवी.
एक पाऊल....
आणि बेरीज वजाबाकी...
स्वर्ग-नरकाच्या वाटचालीची.

22 comments:

Raindrop said...

bechara wondering paay :)

Soumitra said...

अहो अनघा,
आज काई आंधळी कोशिंबीर आणि लंगडी एकत्र खेळताय काई?
read u r article about SWARAG & NARAK , madam foot will work as brains says, & brain will work as u r heart says so better put u r heart to find the way to Heaven, let brain listen to u r heart to right way to happiness isnt it madam???

Anagha said...

वंदू, पाऊल चांगलं आहे ना माझं? :)

Soumitra said...

u r 100% right madam, so let good heart rule the brain & not vice versa let brain listen to u r heart so it will command only good actions.
regards

Raindrop said...

yaar bhawaan ne diya hai 1.5 kilo brain to use karne ke liye hi diya hoga na???? hamesha heart ki nahi sunate!

there is something above brain and heart....called wisdom...sometimes it comes with age or experience or sometimes one is born with it. let it decide who should rule at what time. some days are brain days n some are heart days :)

ye hamara manana hai. aap is se sahmat ho zaroori nahi...but there's a thought :)

ps: for those lacking wisdom....there is always the one rupee coin...flip...

rajiv said...

वाचून तर आपण एकदम `सावधान' मधेच उभे राहिलोय गेले काही तास .. !~ म्हणजे आपण आता पुढचे पाउल कुठे टाकवे....? डावीकडे का उजवीकडे ....?
छया ....छया ! साफ गोंधळूनच टाकलेय ग तू ..!

Anagha said...

hehe!! :D
राजीव, विचार करून टाकावं इतकंच! मी मगाशी सौमित्राला म्हटलं तसं तर नेहेमी होतंच नाही का?

rajiv said...

विचार कराव्वा हे ठीक. आपण विचार करूनच टाकतो. तेंव्हा टाकलेले प्रत्त्येक पाउल हे बरोबरच हा विश्वास घेऊन असावे. ते बरोबरच पडणार मग.

Anagha said...

सौमित्र, हे मी न्यायमूर्ती रानड्यांचे विचार वाचले होते. मुर्तीपुजेसंदर्भात. आपली प्रत्येक चांगली कृती आपल्याला स्वर्गीय आनंदच देते...आणि चूक मनाला वेदनाच! नाही का?

Shameless said...

vichaaranchi vaat kadhi kadhi chuktay...kadhi svarg tar kadhi narka...mhanoon vichaar kamee aani karm jaast...te manaala svachh thayvtaat...Anagha your feet got me thinking right up to Bhagvad Geeta...thank u! keep writing...keep sharing :)

Anagha said...

ते बरोबरच दिपा, फक्त माणसे देवपूजेच्या मागे लागून विचार करतात कि त्यामुळे स्वर्ग लाभेल...परंतु आपले कर्मच आपल्याला त्या मार्गी घेऊन जाते. नाही का?

THEPROPHET said...

मन से रावण जो निकाले राम उसके मन में है!
ह्या टाईपचं तत्वज्ञान वाटतंय!

Anagha said...

तसंच वाटतंय हे विद्याधर, मनात राम...मनात रावण...कोणाला पूजावे हा ज्याचा त्याचा निर्णय. नाही का?

Shriraj said...

अनघा पेच आहे खरा...स्वर्गाकडे जाणारा रस्ता कठीण. तो रस्ता कदाचित आपल्या बिरबलाला (aka सौरभ) माहित असावा. मी त्याच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय ;D

nileshnaik said...

khup chhan anaghx!! :)

nileshnaik said...

masta..!agadi barobar bollis tu!!

Anagha said...

श्रीराज, बिरबल विचार करतायत. :)

Anagha said...

निलेश, तुला माझं doodle आवडलं असेल न?!

Deepak said...

मन स्थिर असेल तर पावले सरळच पडतील पण... मनावर ताबा ठेवणे म्हणजे
हिमालय शिखर पार करण्या एवढे कठीण असते... पण काही वेळेला ते सहज पार करता येते...
चला प्रयत्न करूया.

Anagha said...

दीपक, आपली प्रत्येक कृती, आपला प्रत्येक विचार हा शेवटी चांगल्या वाईटाचा हिशोब. नाही का?

सौरभ said...

>> जे काही आहे ते आपल्या मनात आहे.

ह्यावर पक्का भरोसा आहे ना... मग पाऊल कुठे जातय हा विचार व्यर्थ आहे.
पाऊल पडेल तेथे स्वर्ग किंवा नरक बनवण्याची धडाडी असावी.
(म्हणुनच कदाचित नववधुच्या गृहप्रवेशाला एक विशेष महत्व असावं. ती कोणत्या घरी जाते ह्यापरीस कोणत्या पावलांनी येते ह्यावर घराचं काय होतं हे ठरतं.)
गणपतीच्या दिवसात गौरी आणली जाते तेव्हा रीतीनुसार एक संवाद होतो, जिच्या घरी गौरी आणली जाते ती आणि गौरी आणणारी...
आलीस गौराई?
आले गं बाई...
कोणाच्या पावलानं?
धनधान्य, सुखसमृद्धीच्या पावलानं...

so step ahead with Pride and Confidence...

Anagha said...

सौरभ, किती छान! दिवसाची सुरुवात ह्या प्रतिक्रियेने केली आहे! आता दिवस एकदम मस्त जाईल माझा! :) धन्यवाद!