कॉलेजमध्ये, मला वाटतं, तिसऱ्या वर्षी आम्ही रंगांचा अभ्यास केला.
काळा, पांढरा, प्रायमरी, सेकंडरी, टर्षरी, 'हाय' की (high key), 'लो' की (low key)....
लाल, निळा आणि पिवळा हे प्रायमरी रंग.
लाल+निळा = जांभळा, लाल+पिवळा = केशरी, निळा + पिवळा = हिरवा हे सेकंडरी रंग.
आणि एक प्रायमरी + एक सेकंडरी = एक टर्षरी.
एकाच प्रकारची चित्रं आम्ही ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांमध्ये रंगवली. म्हणजे जर एखादा चेहेरा घेतला तर तोच चेहेरा प्रायमरी रंगात, तोच चेहेरा सेकंडरी रंगात आणि तोच टर्षरी रंगात.
ही थियरी आज मला का आठवली?
काल 'बाबा'ची भिंत ह्या ब्लॉगवर एका चर्चेत भाग घेतला....तेंव्हा हे डोक्यात आले...
महाभारतात मनुष्य स्वभावाच्या अनेक छटा दिसतात. अगदी कृष्णाच्या स्वभावात देखील ह्या रंगांची मिसळ दिसते. मानसशास्त्रातील व्याख्यांना उत्तम उदाहरणे इथे मांडलेली सापडतात. येथील सगळी व्यक्तिचित्रे आपल्यासमोर माणसे म्हणून जिवंत होतात. ती कधी चुकतात तर कधी बरोबर असतात. युद्धात क्षम्य म्हणून कृष्णाच्या सर्व लबाड्या आपल्याला मान्य. आणि भावाभावांमध्ये भांडणे होऊ नयेत म्हणून पाची भावांना एक पत्नी दिलेली आपल्याला मान्य. दुर्गा भागवतांनी त्यांच्या 'व्यासपर्व' पुस्तकात ह्या व्यक्तिमत्वांचा सुरेख अभ्यास मांडला आहे.
परंतु रामायण देवदानवांचे आहे. माणसांचे नाही. त्यामुळे देवांना देवासारखे वागणे भाग आहे. रामाचा जन्मच मुळी सर्व देवांवर विजय मिळवणाऱ्या रावणाचा वध करण्यासाठी झालेला होता. मग बाकी कथा त्या कार्याला मदत व्हावी अशी पुढे सरकते. काळा आणि पांढरा हे दोनच रंग इथे दिसतात. आणि त्यातही पांढऱ्या रंगाचा इथे अतिरेक दिसून येतो. राम आणि सीता पूर्ण पांढरे, रावण पूर्ण काळा. पांढऱ्या शुभ्र सीतेला, किंचितसा झालेला काळ्या रंगाचा स्पर्श, एका धोब्याच्या मते, तिला करडी छटा देऊन गेला. रामाला मग तिचा त्याग केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण राम हा पांढराच असू शकतो. येथे मनुष्याच्या करड्या रंगछटा मान्य नाहीत. सापडत नाहीत.
आणि मग महाभारत अधिक गुंतागुतीचे आणि अधिक 'इंटरेस्टिंग' होऊन जाते. बॉलीवूडच्या अनेक कलाकृतींचे मूळ महाभारतात सापडते. सगळा मालमसाला उपलब्ध.
आज आपलाच चेहेरा कोणत्या रंगसंगतीत आपण रंगवतोय हे स्वतःला तरी कळते का? आणि आपल्या जवळच्या माणसाचे चेहेरे नेहेमीच आपल्याला एकाच रंगात का आवडतात? ते सुद्धा पांढऱ्याच?
त्यांना का नाही वेगवेगळ्या रंगांचे स्वातंत्र्य? कधी साधे सरळ 'प्रायमरी', तर कधी थोडे मजेशीर 'सेकंडरी', कधी गुंतागुंतीचे 'टर्षरी...
कधी 'हाय' की, तर कधी 'लो' की....
लहान तोंडी मोठा घास घेतलाय का?
15 comments:
अनघा छान हां. छान interpret केलंयस पुराणकथांच्या बाबतीत Starhawk-चा हा विचारही फार छान आहे -
"The test of a true myth is that each time you return to it, new insights and interpretations arise."
That's very nice Sriraj! आणि हे मला नेहेमीच महाभारताच्या बाबतीत वाटते! नाही का?
अनघा.. ते महाभारत भारी झालाय.... :) रंगुनी रंगात... रंग माझा वेगळा... :) कि अवघा रंग एकाची झाला?
महाभारतात इतके काही आहे की ...
व्यासानंतर कोणी काहीच लिहिले नसते तरी चालले असते (व. पु -पार्टनर)..
खरेच महाभारतात इतके रंग नक्कीच असावेत ...
तुमची रंगाची थिअरी पटली ..
खरंय बायनरी बंड्या,
कितीही वेळा वाचलं ना महाभारत, तरी नेहेमीच त्यात काही नवं सापडतं!
मी मध्ये कुठे तरी वाचलं होतं की महाभारत हे खरं तर फक्त व्यासांनी नाही लिहिलेलं...ते वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेलं आहे...
रोहन, धन्यवाद!
बापरे,
मी ही सगळ्या खालच्या पोष्टी वाचत असताना ही पोस्ट आली...आणि निसटून गेली! :)
अगदी मस्त ऑब्झर्व्हेशन आहे!
पण मला का कुणास ठाऊक...रामायणातला राम जास्त जवळचा, मर्त्य आणि बिलिव्हेबल वाटतो!
तसाच यादवी घडल्यावर कोसळून जाणारा कृष्णही!
The Prophet, आणि कर्ण हृदय पिळवटून टाकतो! :(
कोण जाणो कशी होती ती पात्र. प्रत्येकजण त्याच्याकडे असेल आणि रुचेल त्या रंगाने त्यांना रंगवतो.
@रोहन... परफेक्ट कमेंट...
now that I know why Pacific blue is called pacific blue....every colour is as unique as its name...it doesn't matter how many colours mixed together to form that one shade....
Mahabharat is the biggest shade card I have ever seen....so nice of you to out it all in words :)
Hey Vandu! Welcome back! And you are so true! I just remembered the colour book we have in the office!! हजारो, लाखो रंग छटा! hehe!!
The Prophet, तुमचे माझ्या ह्या घरी स्वागत आहे... :) मधून मधून येत जा....चहाबरोबर काही 'interesting serve' करू शकेन अशी आशा आहे! :)
खरंच आहे हं तुझं सौरभ. मला वाटतं हीच ह्या महाकथांची गंमत आहे....प्रत्येकजण त्यात आपापला 'take' घेऊ शकतो! नाही का?
चित्र एकदम छान. भावली मनाला लगेच. :-)
आभार संकेत! :)
Post a Comment