तिचं भलं होणार तरी कसं?
इतक्या वेणा...
इतकी पोरं...
एकेक यातना...
कित्येक खुणा.
हिचं भलं होणार तरी कसं?
पोरांना पडली नाय.
ओरबाडणे ह्यांचे संपत नाय.
आता खरं झेपत नाय...
हौस हिची संपत नाय.
मनोमन विचार करते...
पुढचा 'कल्की'च, खात्री बाळगते.
भलं हिचं होणार तरी कसं?
निपुत्रिकच झाली असती...
निदान जास्ती जगली असती.
उगाच पोरं काढत राहिली...
कसला कृष्ण...
कसला राम...
एकेक पोर...
लचके तोडतं...
एकेक घोट हिचं रक्त पीतं...
पोरांना हिच्या...
भस्म्यारोगच हाय...
मग सांगा आता...
हिचं भलं होणार तरी कसं?
आता म्हणतात...
खूपच भडकलेय...
म्हणे आता खूप तापलेय.
पण सांगा उपयोग काय?
वेळ तर उलटून गेली...
विनाश तर व्हायचा हाय...
पोरांची पोर...
नातवंड...
फारफार तर पतवंड...
चारपाच पिढ्या...
एक दोन युगं....
रात्री खिन्न शांततेत...
कधी नीट तुम्ही ऐकलंय काय?
तिची घरघर...
तिचं हसू....
पुटपुट तिची नीट ऐका...
कधीतरी तिच्या जवळ बसा...
माज थोडा कमी करा..
मान थोडी खाली वाकवा...
कान जरा भूईला लावा...
काय बोलते माय एकदा तरी ऐका...
'कल्की' येणार हाय...
माझा 'कल्की'च येणार हाय...
तोच मला वाचिवणार हाय...
वेडी ही माय...
10 comments:
`वाचाल' तर वाचाल ........ !
व्वाह व्वाह व्वाह.... best Earth song I'd say... thought provoking...
Anagha, I am in love with your blog!!!
धन्यवाद...
:)
तुझ्या "'दशा' अवतार"-मुळे आज सकाळी मी केसच विंचरायचे विसरलो... माझा मित्र माझी 'दशा' पाहून म्हणाला "काय रे! आज आंघोळ केली नाहीस वाटतं!!"
श्रीराज, उगाच मला दोष देऊ नकोस!!! अवतार तो अवतारच!! :D
I never realized you are good at this.
Mala anand Zala. Raju
राजू, तू इथे आलास...वाचलंस आणि तुला आनंद मिळाला... ह्याचा मला आनंद झाला. :)
मस्तच एकदम. का हो, तुम्ही असं सुंदर लिखाण कसं करायचं याचे क्लासेस घेता का? मी जॉईन होईन म्हणतो. वर्ग face-to-face नसतील आणि ऑनलाईन असतील तरी चालेल. :-)
हीही! ते शीर्षासन सांगितलं होतं ते जमू लागलं का संकेत? ;)
Post a Comment