जवळजवळ सात आठ वर्षांपूर्वीची गोष्ट.
नवी नोकरी होती.
एका शॅम्पूसाठी फिल्म करायची होती. ३० सेकंदांची. हातात त्याची ब्रीफ होती. स्क्रिप्ट सुचली. लिहून टाकली. बॉस बाईला मेल केली. पुढच्या दहाव्या मिनिटाला बाई माझ्या टेबलापाशी हजर.
"Who wrote that script?"
"I wrote. Why? What happened? Not good?"
"It's very nice! I thought you are an art person! So...."
हसले. "In fact that's the reason I can write my own scripts! Because I can see them! In pictures!"
"Ya. That's very good! I am going to tell this to our creative head!"
स्मितहास्य. तेव्हढंच केलं मी.
परवा दुसऱ्या एका वरिष्ठाने जेंव्हा म्हटले,"I always like to read your scripts. They are nice."
हे ऐकलं आणि ती आठ वर्ष जुनी गोष्ट आठवली.
एखादी छानशी स्क्रिप्ट लिहिण्याचा अनुभव नेहेमीच आगळा.
अर्थात एखाद्या स्क्रिप्टचा प्रवास खरोखरीच्या फिल्म (TVc) पर्यंत जेव्हां होतो तो आनंद नक्कीच वेगळा. जशी दुधात साखर!
बालमोहन विद्यामंदिरच्या मराठी शिशुवर्गापासून, आंतरराष्ट्रीय जाहिरात क्षेत्रातील इंग्रजीपर्यंतचा माझा मराठमोळा creative प्रवास चांगलाच झाला म्हणायचा.
17 comments:
awesome... share the experience next time too, but the only difference - you would be the Senior most person appreciating your junior... and I'm sure that time will come soon... :)
keep on Rocking \m/
धन्यवाद सौरभ! बघू....पुढे काय होतं ते! :)
लिखाणाचे बाळकडूच जीने प्यायले आहे , आणि गुगल येण्यापुर्वीच जन्मली असूनही जिच्या कानात वाऱ्याबरोबर मराठी भाषा शिरली आहे ,पण लेखणीतून मात्र transliteration न वापरता इंग्रजी भाषा पण पाझरते, तिच्याबद्दल आपण पामर वाचकाने काय लिहावे..... फक्त शाबासकीच द्यावी !
ब्राव्हो !
सौरभ+१... :)
राजीव, हरभऱ्याच्या झाडावर चढलेय हं मी!!!! पडेन आता!!!
:)
छान .
तुमचे अनुभव लिहित जा आम्हाला वाचायला आवडेल ...
आम्हीही काहीतरी चांगल्या गोष्टी शिकू ...
गणपतीच्या सुट्टीत थोडा वेळ मिळाला व कार्ल मार्क्स वरील तुझ्या बाबांचे पुस्तक वाचायला सुरवात केलीय. सगळे नाही पण जवळपास १००-१२५ पाने वाचलीयत. एक तर मार्क्स समजायला तसा जरा अवघडच. पण त्यांनी अतिशय सोप्या मराठी भाषेत, विषय व आशय इतका सोप्पा करून लिहिलंय कि खरे तर उरलेले पुस्तक कधी वाचून संपवतो असे झालेय.
ते वाचतानाच कळतंय कि तुझ्या लेखणीतील शाई कुठल्या दौतीतली आहे ते ....!
राजीव!!! बाबा, कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी!!
बोंब ! अनघा, अग आम्ही काय चढवणार. स्वतःच्या मेहनतीने व गुणांनी तू हरभऱ्याच्या नाही, प्रगतीच्या झाडावर चढतीयस.
नाहीतर सौरभ, श्रीराज,भानस, रोहन, प्रसाद, इ. थोडेच जमा झाले असते झाडाखाली.... ?
राजीव अगदी माझ्या मनातलं बोलले
भाग्यश्री, आमची ही रोजची चढाओढ असते गं! :)
तू तयार केलेल्या स्क्रिप्ट्स सांग कि... म्हणजे आम्हाला सुद्धा त्या फिल्म (TVc) बघता येतील आवर्जून... :)
रोहन, मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच स्क्रिप्ट्स फक्त कागदावर रहातात. :)
Hi Anaga,
found your blog a few days back... barech lekh vaachale tumche. khupch chhan ahet.. Balmohan cha ullekh vaachun aaplya gharachyach konachatari blog vachtey asa vatala. mi pan Balmohanchach product ahe, pan mala kahi tumchyasarakha lihayala jamat nahi.. aso.. keep it up..
Neela
धन्यवाद नीला. तू नेहेमी वाचतेस हे वाचून खूप आनंद झाला. आणि तू देखील बालमोहनची आहेस हे वाचून तर अधिकच! अशीच भेट देत जा. :)
तुमच्या वरिष्ठांच्या वाक्यात ’scripts' च्या ऐवजी 'posts' हा शब्द घाला. ती माझी प्रतिक्रिया. :-)
:D आभार संकेत!
Post a Comment